काय चालल काय आहे...
Monday, 2. November 2009, 21:57:15
---मावळत्या विधानसभेची मुदत आज, मंगळवारी संपत असून निवडणूकनिकालानंतर बारा दिवस उलटले तरी बहुमत मिळविलेल्या काँगेस -राष्ट्रवादी आघाडीला अद्यापही सरकार स्थापनेचा मुहूर्त सापडलेला नाही.
---सत्यसाईबाबांच्या चरणी लीन होण्यासाठी कमरेत वाकलेले काळजीवाहू मुख्यमंत्र्यांपासून अनेक वरिष्ठ नेते, भारत- ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याचा मनमुराद आनंद लुटण्यात व्यग्र असलेला राज्याचा ‘जाणता राजा’, मंत्रिपदांच्या साठमारीत भान हरपलेले दोन्ही काँग्रेसचे गावोगावचे सरदार आणि केरळमधील पोटनिवडणुकांच्या धामधुमीत अडकलेले काँग्रेसचे राज्याचे प्रभारी ए. के. अँटनी, झारखंडमधील उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत मग्न असलेल्या सोनिया गांधी .. हे आहे राज्यकारभाराची धुरा जनतेने ज्यांच्या खांद्यावर विश्वासाने टाकली त्या नेत्यांचे निवांत चित्र.
---या साऱ्या ‘राजकारणा’च्या दलदलीत सरकार स्थापन करून राज्यकारभाराची गाडी रुळावर आणण्याची काळजी एकाही नेत्याला असल्याचे दिसत नाही.
---महागाईमुळे जनता होरपळत असताना यांना मात्र खातेवाटपात रस आहे.
---जनता "राज्याला कोणी सरकार देता का सरकार!!"













