Skip navigation.

Bharat Says

Bharat's Open Heart

May 2009

( Monthly archive )

लेझी लम्हे

hi
गाढ साखरझोपेत असताना, एकदम घड्याळाचा किचाट गजर अंगावर धावून येतो आणि त्याचे दोन टोकेरी काटे उठल्यापासून आपला पिच्छा पुरवतात.:zzz: मग आवरायची झटापट सुरू होते. घराबाहेर पडण्याच्या सर्कशीला वेग येतो. कारण, हा सगळा संघर्ष असतो वेळेशी. कारण ऑफिसात वेळेवर पोचण्याचं टागेर्ट आपल्या रोज हिट करायचं असतं. अरे बाप रे!

पण.. उद्या हे काही नाही. नो.. नेव्हर!:cry:

अरे पाच दिवस वेळेने तुमचं खोबरं केलं. पण, यापुढचे दोन दिवस तुमचे आहेत. टुमारो यू आर द ऑलटाइम किंग.:hat:

कोणते हे दिवस ते आलंय का लक्षात तुमच्या? यू वॉन्ना हिंट?

ओके. अरे, शुक्रवार आल्यापासून आपण हवेत असतो. इसी दिन के इंतजार व्हाइट कॉलर्ड लोगों को हमेशा होता है..

आलं लक्षात?

येस.. इट्स अ वीकेण्ड टाइम. शनिवार, रविवारचा. आपल्या हक्काच्या सुट्टीचा.. आपल्या मजीर्चा.. फिकिरलेस, टेन्शनफ्री दिवस.

आठवड्याभराच्या झटापटीने आलेला हँगओव्हर अजून उतरलेला नसतो. त्यामुळे वीकेण्डला बाहेर पडणं तसं कंटाळवाणंच. त्यात हल्ली उन्हाचा कडाका वाढल्यामुळे हा कंटाळा वाढलेला. त्यापेक्षा घरातच रेंगाळणं कितीतरी सुखदायक. मग, सुरू होतं आळसाचं राज्य. एरवी त्याला पदोपदी झुगारणारे आपण यावेळी मात्र, त्याला आपल्या मानेवर बसवून झोकात मिरवत असतो. आळशीपणाचा अस्सल 'स्टॅमिना' वीकेण्डच तर दाखवतो आपल्याला. आठवडाभरातल्या थकव्याला डच्चू देण्यासाठी घरात नुसतं रेंगाळणं एकदम एण्टरटेनिंग असतं. या रेंगाळण्यातूनही आपण फ्रेश होतो हे तर त्याहून अजब. हं... पण, रेंगाळताना काय करायचं यासाठी हे वाचाच.

याची तयारी मात्र, आदल्या रात्रीपासूनच! अलार्मचा 'चिवचिवाट' एकदम बंद. उजाडलेल्या प्रकाशामुळे लवकर जाग नको म्हणून खिडक्यांचे पडदे काचांवरून सोडलेले. शांत झोप यावी म्हणून केसांना मस्तपैकी तेलमालिश केलेली.

मग सकाळी कधीतरी नऊ वाजता डोळे उघडतात. पण ऑफिस नसल््याचं आठवतं आणि जीव मोठ्या पातेल्यात पडतो. आता पुढचा प्रश्न, काय करायचंय एवढ्या 'भल्या'(!) पहाटे उठून? मग पुन्हा झोप. 'किती वाजले उठा आता?', असा एक त्यावेळी 'कर्कश्य' वाटणारा आवाज भुंग्यासारखा दर दहा मिनिटांनी कानात भुणभुण करत राहतो. मग, डोळे किलकले करत, कपाळावर शेकडो आठ्या पाडत उठल्यासारखं करायचं आणि आपल्याला उठवणारा तो 'भुंगा' गेला की, उशी कानावर रेटून झोपून जायचं.

दहावरून काटा सरकतो.. अगदी साडेअकरा होतात. मग, उठण्याचा विचार. उठायचं. गरमागरम, आलं घातलेल्या चहाचा झुरका मारायची तलब होईलच. 'एवढ्या उन्हाचा चहा?' असा आपलाच प्रश्न. पण, 'चहा प्यायला मूड असेल तर अगदी चवीचवीने चहा प्यायचा. गडबड कुठेही नाही.

तोपर्यंत बारा वाजलेले असतात, अंघोळीचा विचारही आता शिवत नाही. मग, रेडिओवरची गाणी ऐकत वाटलं, तरच पेपर चाळायचा. सुट्टी आहे आणि टीव्ही नाही? टीव्ही लावायचा आणि मिळेल त्या जागी पसरायचं. चॅनल सफिर्ंग आलंच. पण, न्यूज चॅनल सोडून. तोपर्यंत भुकेची जाणीव होईल. हवं तर काही ऑर्डर करा. तो येईपर्यंत घरातल्या आरबट-चरबट खाऊवर ताव मारायचा. मग, जेवण. पोळीभाजीचं जेवण नको वाटणं साहजिक आहे. पण, पर्याय नसतो. जेवणावर ताव मारला, की टळटळीत दुपारी तुमचा बेड तुमची वाट पाहात असतोच.

वाटलं तर लोळायचं. तोपर्र्यत चार वाजतात. मग, जरा बौद्धिक ट्रायल घेत एखादं मॅगझिन, नॉवेल चाळायचं. कारण बौद्धिक कष्ट पडले की चहाची गरज वाटते. मग, चहा आला की मॅगझिनला सुट्टी. त्यानंतर, मित्रमैत्रिणींना आठवडाभराची फोनाफोनी, भरपूर गप्पा. यातूनच संध्याकाळचा बेत. अरे, एका फोनमुळे चकाट्या पिटायला पब्लिक जमू शकतं. नाहीतर इण्टरनेट आहे. अंघोळीचा विचार मनात आला तरच अंघोळ करा. मग, त्याच फ्रेश मूडमध्ये बाहेर पडा.

संध्याकाळी एक फेरफटका मारून यायचा. फेरफटका मारून आल्यानंतर गॅलरीत ठाण मांडून, फॉर अ चेंज म्हणून वाफाळलेल्या कॉफीचे निवांत घोट घ्यायचे. सोबत कांदा भजी असेल तर क्या बात है.

रात्री डिनर प्लॅन करायला हरकत नाही. 'स्पेशल समवन' किंवा फ्रेण्ड्स कोणीही चालेल. बाहेरचं जेवण नको असेल, तर पाणीपुरी, शेवपुरी असा मसालेदार मामला आहेच. आणि रात्री आइस्क्रीम. मग, बॅक टू पॅवेलियन!!!:ko:

दिवसभर रेंगाळूनही रात्री डोळे मिटू लागणारच. झोपायचं नसेलच, तर सॅटरडे धमाका किंवा सॅटरडे ब्लॉगब्लस्टर या टॅगलाईनखाली सतराशेसाठ पिक्चर्स चालूच असतात. नाहीतर रेडिओ आहेच.
bye

माझे ’आलु पराठे’

, ,

बि.सी.एस.च्या दुसऱ्या वर्षाला होतो तेव्हाचा किस्सा.

प्रभासचे आई-वडिल बाहेरगावी गेले होते. आणि याच संधीचा फायदा उठवायला आमची सगळी गॅंग प्रभसच्या घरी पिक्चर बघायला जमली होती. त्यासाठी कॉलेजला दांडी मारलीच होती, ते काय सांगायला नकोच. :smile: तर, हा असा फक्कड प्लान असल्यानं आम्ही येतांनाच भरपुर सि.डी. आणल्या होत्या सोबत. एकामागुन एक पिक्चर बघण्याचा सपाटाच लावला होता.

थोड्यावेळानी मात्र आम्हाला सगळ्यांनाच भुक लागली. प्रभास दिवसभर कॉलेजला असणार म्हणुन आईनं काहीच करुन ठेवलेलं नव्हतं घरात.त्यामुळं तर आमची अजुनच जास्ती पंचाईत झाली. काय करावं काही सुचत नव्हतं. मध्येच माझ्या डोक्यात आलं काहीतरी.. मी म्हटल,"प्रभास, घरात पोळीचं पीठ आणि बटाटे आहेत का?"

प्रभास :- "हो, आहेत."
मी:- "काढ कणिक बाहेर, मी आलु पराठे बनवतो."
प्रभास :- "येतात का तुला नक्की बनवता?"
मी :- "हो मग!"
प्रभास:- म्हटलं, हा बाप्या एवढं आत्मविश्वासानी सांगतोय तर येत असतील.

मी कणिक भिजवली, ती मळली, त्याचबरोबर बटाटे उकडायला ठेवले. बटाटे उकडुन तयार होतायेत तोवर, मी पराठे ’थापायला’ सुरुवात केली. ती ओली कणिक... पोळपाटाला चिटकत होती तशीच.. बघावं तर मी कणकेचा सगळा डब्बाच रिकामा केलेला! पराठे बनवतांना वापरायला म्हणुन कोरडी कणिकच उरली नव्हती!! :D

ते बटाटे सुद्धा या मी पुर्ण उकडु दिले नाहीत. तसेच बाहेर काढले, त्यांचे काप केले आणि अक्षरशः हातानी ’पेरले’ त्या कच्च्या पराठ्यांमध्ये!

बाप रे!!! :yikes:

डोंबल्याचे ’आलु पराठे’.. भरपुर शिव्या पडल्या मला.. नाही तर काय?

तरी नशिब, पंकज आमच्या सोबत होता. आणि नशिब अजुनच बलवत्तर की त्याला खिचडी अगदी व्यवस्थीत (आणि हुकमीपणे) करता येत होती.
शेवटी पंकजनी तांदळाची खिचडी लावली, आणि आम्ही सगळे त्यावर तुटुन पडलो..!
पराठे होतेच सोबत.. लोणच्यासोबत खायला.. :wink:

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे.........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे, आणि
त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे.......

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे, आणि
मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे...........

एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सूर त्याचा आणि शब्द माझे असावे.........

एक उनाड दिवस...

काल प्रभास रुमवर आला होता.’प्रोजेक्टची काही कामं करु’ असं ठरलं होतं आमचं. त्यानुसार दुपारी आला होता,मग जरावेळ काम केलं. म्हणजे काही कोड बदलले, काय-काय अजुन करायचं आहे त्याची उजळणी केली आणि मग गप्पा मारत बसलो. काम राहीलं बाजुलाच.

माझा रुम पार्टनर सुद्धा आला तेवढ्यातच. मग तो सुद्धा गप्पांमध्ये सामिल झाला. मध्येच निघालं पत्ते खेळुया. सगळ्यांनीच ही आयडिया उचलुन धरली. मग मी आणि प्रभासनी पटकन जाऊन जवळच्याच दुकानातुन पत्त्यांचा कॅट घेऊन आलो. "काय खेळावं?" हा प्रश्न लगेचच मिटवण्यात आला.. ’पाच-तीन-दोन’ खेळायचं ठरलं. मी आणि प्रभास तर बऱ्याच मोठ्ठ्या कालावधीनंतर खेळत होतो पत्ते! त्यामुळं पत्ते वाटतांना मी सगळेच वाटले. :D आणि बसलोय मग तिघंही हात करत.. प्रत्येकाचेच प्रमाणापेक्षा जास्ती हात. माझी अवस्था तर दयनिय होती.मी तर बिचारा इस्पिक कोणता, किलवर कोणता, चौकट कोणता आणि बदाम कोणता ह्यातच गोंधळ घालत होतो. :D संध्याकाळ पर्यंत खेळलो पत्ते.

मग आम्ही गेलो ’दुर्गा’वर.. कोल्ड कॉफी प्यायची ठरलं होतं.. पण आम्ही मयुर कॉलनीमधल्या दुकानात गेलेलो. तिकडं जरा गाडी लावायला नीट जागा तरी आहे. रामबाग कॉलनीमधल्या दुकानावर आधीच खुप गर्दी असते आणि शिवाय तिथं पार्किंगच्या जागेचे वांदेच होतात. मग ट्रॅफिक पोलिसची गाडी आली की धावाधाव.. त्यापेक्षा म्हटलं इकडंच जाऊ. शिवाय या दुकानात बसायला जागासुद्धा मिळते. आरामात बसुन, गप्पा मारत मारत त्या कोल्ड कॉफीचा आस्वाद घेतला. मला फार आवडते ही कोल्ड कॉफी. मला कोणी भरपुर कप जरी ऑफर केले ना, तरी ते प्यायला मागे-पुढे बघणार नाही मी. :smile:

कॉफी पिली, आणि मग निघालो आम्ही भटकायला. मयुर कॉलनीमधुन कर्वे रोडनी करिष्मा सोसायटी पर्यंत, तिथुन मेहेंदळे गॅरेज - डेक्कन - म.न.पा. - शिवाजी नगर - युनिवर्सिटी रोडनी पाषाण, तिथुन बावधन मार्गे चांदणी चौक.. मला चांदणी चौक बघायचा होता. म्हणुन मग तिकडं गेलो. तिथुन मग पौड रोडनी बालगंधर्व ला. भला मोठ्ठा राऊंड मारला आम्ही प्रभास च्या ब्लॅक ब्युटीवरुन. :cool: हुश्श्श...!

बास्स.. एवढं सगळं केल्यावर हौस फिटलीच आमची. मग सरळ घरीच. पण दिवस मात्र घालवला अगदी उनाडपणे. :yes:

जीवनाचे दर्शन - एका शब्दात



संपूर्ण जीवनाचे दर्शन मी एका शब्दात पाहिले आहे. जीवनामध्ये मी कोणतेही काम एकट्याने कधीही केले नाही. माझा जन्म, पालनपोषण आणि शिक्षण दुसऱ्यांच्या आधारामुळे पुर्ण झाले आहे. मी कोणतीही मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करतो. तेव्हा त्यामध्ये मुलीनाच करत होत्या. मी मात्र त्यांना फ़क्त संगीत देत होतो, नाचत नव्हतो. त्यामुळे मला माझे संपूर्ण जीवनाचे दर्शन, एका शब्दामध्ये साठले आहे असए वाटते. त्या एका शब्दाच्या आधारे, सहाय्याने मी आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहे. तो शब्द आहे - मदत.

कोणालाही आपण मदत करुन बघा. आपल्याला आपल्यामध्ये एका नवीन प्रकारचा बदल झालेला अनुभवास येईल.

- रिचर्ड शेजर्स
May 2009
M T W T F S S
April 2009June 2009
1 2 3
4 5 6 7 8 9 10
11 12 13 14 15 16 17
18 19 20 21 22 23 24
25 26 27 28 29 30 31