Skip navigation.

Bharat Says

Bharat's Open Heart

June 2009

( Monthly archive )

मराठी माणसाने प्रेम व्यक्त करताना...




सहज विचार केला की मराठी माणसाने प्रेम व्यक्त करताना मायमराठी बाणा वापरला आणि शुद्ध मराठीत मागणी घातली तर तो काय म्हणेल?

गुलाबाऎवजी कमळाचं फुल घेऊन म्हणा -
"हे सुंदरी, काकवीने भरलेला हा कमलद्रोण मज हस्ति ग्रहण करून मी तुजला पूसतो की तुजिया मनोमुकुरी उभासलेला तो दिव्य राजकुमार मजरुपाने या भूतलावर अवतीर्ण जाहला आहे असे तुजला प्रतीत होत असल्यास तुजिया मुखाद्वारे होकारार्थी चित्कार येवू दे..."

होकार राहिल बाजूला, एकच चित्कार देवून सुंदरी मूर्च्छितावस्थेप्रत जाणार हे क्रमप्राप्त..!!!

पुलंचे किस्से...एक आठवण

कोल्हापुरी शेक्सपीअर

कोल्हापूर आणि तेथील एकूणच भाषाव्यवहार म्हणजे पु . लं . च्या मर्मबंधातील ठेव .
कोल्हापुरी समाजाइतकाच कोल्हापुरी भाषेचा बाज सांगतांना ते म्हणाले,
इथे रंकाळयाला रक्काळा म्हणतात पण नगा - याचा नंगारा करतात
कोल्हापुरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरीबाहेर येऊन आपल्या छातीवर हात बडवायला लावील असं आहे.

त्यानं शेतात ऊंस लावला याचं इंग्रजी रुपांतर इथल्या मुन्सफानं एकदा 'he applied US in his farm' असं केलं होतं आणि
त्यावेळच्या शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणं ' यू ' वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता.

पुलंचा हजरजबाबी विनोद

पुलंचा हजरजबाबी विनोद हा तर विलक्षण आहे. भारती मालवणकर ही दामुअण्णा मालवणकरांची मुलगी.
दिसायला खूपच सुस्वरुप. दामुअण्णांचे दोन्ही तिरळे डोळे मागल्या पिढीतल्या लोकांच्या परिचयाचे आहेत. दामुअण्णांच्या भारतीला पुलंनी प्रथम पाहताच
"ही मुलगी बापाचा डोळा चुकवून जन्माला आली आलीय"असे उद्गार काढले.

आमच्या कंपनी ची वेबसाईट!

मी आणि माज़या मित्रानी मिळून आमच्या कंपनी(software)ची वेबसाईट सुरु केली आहे.!! :up: www.cybrevo.com असा पत्ता आहे.

आम्ही वेब सर्वर वर जागा विकत घेतली, डोमेन-नेमसुद्धा नोंदवलं आणि संपुर्ण वेबसाईट पुर्ण केलीये.मग सर्वरवर अपलोड करुन चाचणी घेतली, कुठे काही गडबड नाहीये ना याची.

हि वेबसाईट सुरु करण्यामागे बरेच हेतु आहेत.एक म्हणजे तर...स्वताह: काम घेऊन आम्ही ती पूर्ण करणार आहे,आम्ही सगळे मिळून फ्रीलॅनसर महून काम करणार आहोत...म्हणजे करत आहोत.शिवाय आमच्या कामाची ओळख तयार व्हावी, व्यावसायिक संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी सुद्धा हि साईट कामी यावी अशी आमची अपेक्षा आहे.

तर मित्राणो तुमची काही सॉफ्टेरे ची काम असतील तर नक्की सांगा.आम्ही ती वेळेत पूर्ण करून देऊ.

त्या साठी तुम्ही मला संपर्क करू शकता...:smile:

bharat@cybrevo.com

सात जन्माचे सात फेरे ..पण...उलटे..भाग -१

hi तर मित्रानो...मी सांगितल्या प्रमाणे....या विषयाचा पहिला भाग घेऊन आलो आहे.:smile:

ठिकाण :- उपवर मुलाचे घर

वेळ :- सा.५.३०, घरात ...गडबड चालू आहे.

मुलाची आई ,मुलाला म्हणते....अरे लवकर आवर, मुलीकडचे येत च असतील आत्ता.मागच्या वेळी तू आसचा उशीर केला, त्या मुळे मुलीने तुला नाही म्हटले...काय तर म्हणे मुलाला वेळचे भान नाही आणि हे काय, कपडे नीट नेटके नेस...नाहीतर तू एकदा जीन्स आणि टी-शर्ट घातला म्हणून तुला नकार दिला.p:

एक अव्वाज येतो...."बंडू ची आई आई ऐकला का...आले पाहुणे मंडळी".:up:

आई बंडू ला "बोलवया शिवाय ह.Cल मधे येऊ नको":eyes:

गप्पा चालू होतात.मुलीचे वडील म्हणतात, मुलगा कुठे आहे.

आई बंडू ला घेऊन येते.

बंडू हातात..चहा आणि पोहे घेऊन येतो.:coffee:

आई :-पोहे आमच्या बंडू ने बनवले आहे.

मुलीचे वडील: - काय शिक्षण ज़ाल आहे तूझ?..श्व्यंपाक येतो का..?

बंडू आपला लाजत लाजत उत्तर देतो.:happy:

मुलीचे वडील:- नौकरी कुठे करतो? किती पगार आहे?

बाकी बरेचसे प्रश्न होतात...मग मुलाचे वडील म्हणतात..."आपण या दोघना जरा मोकळ सोडू...म्हणजे ते दोघे एकमेकन समजून घेतील"

आत्ता या दोघना मधे काय बोलणे होते ...ते पुढील भागात..
bye

पाऊस आला धावून...




उन्हाळ्याच्या काहिलीला वैतागलेल्या पुणेकरांना पावसाच्या सरींनी असे चिंब भिजवून टाकले.
June 2009
M T W T F S S
May 2009July 2009
1 2 3 4 5 6 7
8 9 10 11 12 13 14
15 16 17 18 19 20 21
22 23 24 25 26 27 28
29 30