Skip navigation.

Bharat Says

Bharat's Open Heart

August 2009

( Monthly archive )

एक उनाड दिवस आपला?

एखाद्या सकाळी जाग येते तेव्हा, छे! आज ऑफिस अजिबातच नको असं मन आर्जवानं सांगत असतं. त्याचं ऐकायचं. पण घरी मात्र थांबायचं नाही. कारण उगाच थांबताय म्हटल्यावर 'बरं वाटतंय ना?' इथपासून प्रश्न येतील. त्यापेक्षा काही न बोलता ऑफिसच्या वेळेत बाहेर पडायचं. मोबाइल ठरवून विसरायचा घरी किंवा सरळ बंद करून टाकायचा. कुठल्या तरी एकट्या समुदावर नाहीतर दाट झाडीतल्या हिरव्या डोंगराचा रस्ता धरायचा. बरेच दिवस स्वत:ला भेटलेलो नसतो आपण. मनसोक्त भेटायचं. गप्पा मारायच्या स्वत:शी. जाब विचारायचे, कबुल्या द्यायच्या. स्वत:चं कौतुकही करायचं. ठरवूनही मिळवता आलं नाही ते तिथल्या एकटेपणात सोडून यायचं. नव्या स्वप्नांची फुलपाखरं पकडायची. त्यांना नीट जपून हृदयाशी ठेवत नवे होऊन परतायचं...दिवस कुठे सरेल कळणारही नाही.

ही स्पेस स्वत:ला देऊन बघायला हवी अधून मधून. रोजच्या जगण्यात खूप वेगवेगळे रोल करतो आपण. शिस्तप्रिय बॉस, कर्तव्यतत्पर एम्प्लॉयी, प्रेमळ बाप, आज्ञाधारक मुलगा, कुटुंबवत्सल नवरा, संसारी बायको, आदर्श मित्र... कधी कधी सुजाण नागरिक वगैरे वगैरे...यापलिकडेही खूप काही असतो आपण. रोजच्या धबडग्यात आपली ही ओळखच विसरून गेलेली असते. आपलं आवडतं गाणं किती तरी दिवसात ऐकलेलं नसतं. आवडत्या लेखकाचं पुस्तक बाजारात येऊन जुनं झालेलं असतं. नाटक बघायला थिएटरला गेलो त्यालाही वर्षं उलटलेली असतात, जवळच्या मित्राशी निरुद्देश गप्पा मारलेल्या नसतात... आईच्या पायाशी बसून केसांत तेल नसतं मुरवलेलं... दूर असलेल्या भावंडांशी कामाशिवाय बोललेलो नसतो आपण...काहीच मागणं नसताना मंदिरात जाऊन हात नसतात जोडलेले...हे सगळं नुसतं आठवण्यासाठी तरी स्वत:ला भेटायला हवं. अशी भेट झाली तर काय हरवतंय आयुष्यात, ते कळेल तरी.

फ्रेंडशिप डे चर्चाः स्त्री-पुरुष मित्र होऊ शकतात?

असचा विचार करत बसलो होतो...आणि मनात आल...एक चर्चा करावी तुमच्या बरोबर.अत्तचा तुम्ही फ्रेंडशिप डे साजरा केला असेल..

मग मला पुढील प्रश्नच उत्तर द्या.


स्त्री-पुरुष मित्र होऊ शकतात?





August 2009
M T W T F S S
July 2009September 2009
1 2
3 4 5 6 7 8 9
10 11 12 13 14 15 16
17 18 19 20 21 22 23
24 25 26 27 28 29 30
31