Tuesday, 20. October 2009, 20:50:08
आता थोड्या दिवसन पूर्वी माझ्या रुमवर प्रभास,धन्या आणि मी असं तिघं क्रिकेट खेळलो.

कोणाचा तरी प्रोजेक्ट रिपोर्ट होता, ती आमची बॅट. आणि कागदाचा बोळा म्हणजे आमचा बॉल.. आणि आमचं क्रिकेट सुरु!! बऱ्याच दिवसांनी असं ’इन-डोअर क्रिकेट’ खेळलो! दंगामस्ती करत खेळलो आणि मी,प्रभास आणि धन्या - आम्ही तिघंही फ्लॅशबॅकमध्ये गेलो.
आम्ही जेव्हा बि.सी.एस.च्या तिसऱ्या वर्षाला होतो, तेव्हा टिळे सरांच्या क्लासवर दुपारी असंच क्रिकेट खेळायचो. बऱ्याचदा कॉलेजला दांडी मारलेली असायची. तिथुन निघुन थेट सरांच्या क्लासवरच टपकायचो आम्ही. मग कोणाचं तरी ’रायटींग पॅड’ आमचं बॅट बनायचं आणि सरांची बोर्ड पुसायची कापडं आमचा चेंडु तयार करायचे. सरांनी क्लास सांभाळायला ठेवलेला ललितसुद्धा असायचा आमच्या सोबत. नुसता धांगडधींगा चालायचा आमचा.
क्लासमध्ये प्रोग्रामींगची प्रॅक्टीस करण्यासाठी एक स्वतंत्र लॅब होती. तेच आमचं मैदान असायचं. कधी कधी काही पोरी तिथं प्रोग्राम करत बसलेल्या असायच्या.. पण आम्हाला कसलीच पर्वा नसायची.. कोणी तक्रार करेल वगैरे काही भितीच नाही ना!
सर यायच्या वेळी मात्र आम्ही सगळं परत जागच्या-जागी ठेवुन निमुटपणे प्रोग्राम करतोय असं दाखवायचो. टिळे सरांना घाबरायचो आम्ही सगळेच.
एकदा काय झालं, आम्ही असंच क्रिकेट खेळत होतो. कोण बॅटींग करत होतं आठवत नाही आता. एक मुलगी लॅब मध्ये प्रोग्राम करत बसली होती. शॉट मारतांना बॅट्समनच्या हातुन पॅड सटकलाच, आणि भिरभिरत गेला थेट ती पोरगी बसलेली त्या कॉम्प्युटरवरच! मुलगीतर वाचलीच थोडक्यात, कारण अन्यथा डोकं फुटलंच असतं तीचं, पण पॅड नेमके मॉनिटरच्या कोपऱ्यावर बसले. जरा अजुन अलिकडे बसले असते तर स्क्रीनचा नक्कीच चक्काचूर झाला असता! आणि मग हे क्रिकेट आम्हाला चांगलंच महागात पडलं असतं... पण वाचलो!
अगदी इंटरनल परिक्षेच्यावेळी सुद्धा आम्ही हे क्रिकेटायन सोडले नाही. पेपरच्या आधी आम्ही सगळे क्लासवर जमायचो. बाकीचे लोक तिथं अभ्यास करत बसलेले असायचे आणि आम्ही मात्र क्रिकेट खेळत असायचो. खुप एन्जॉय केलंय आम्ही हे असं ’इन-डोअर’ क्रिकेट.
तसं आम्ही ’आऊट-डोअर’ क्रिकेट सुद्धा भरपुर खेळलो आहोत, आणि त्याचे सुद्धा भरपुर मजेशीर किस्से आहेत.. पण ते नंतर सांगेन, पण नक्की सांगेन.
Tuesday, 20. October 2009, 20:41:33
Diwali
तर मित्राणो माझा दिवाळी साठी चा प्रवास बराच मजेशीर झाला.
पहिले एकतर बॅगचा इश्यू आणि नंतर बस चा किस्सा.
तर ज़ाल अस,मी शुक्रवारी सुट्टी घेतली आणि म्हटल काम करून सकाळी सकाळी तसचा जाउ घरी (म्हणजे नाशिक ला).म्हणून रूम वर सगळी पॅकिंग केली आणि मला समजल की बॅग लहान पडत आहे म्हणून मी माज़या एका office च्या मित्राला बॅग आणायला सांगितली.
मग मी पॅकिंग तशीचा रूम वर तेहून office आलो,म्हटल त्याची बॅग घेऊ आणि परत पॅकिंग करू आणि मग जाउ.मी आपला त्याची बॅग office मधे शोधतो आहे पण सापडत नाही,मित्राला call केला आणि सांगितल,अरे बॅग काही सापडत नाही,तर म्हणतो कसा अरे आहे तिथेच.मी आपला काम सोडून बॅगच्या मागे.तरी पण बॅग काही सापडली नाही

,मग अजुन एका office च्या मीत्रणे call केला आणि सांगितल माज़या कडे आहे बॅग, मी येतो सकाळी घेऊन आणि तुला पण शिवाजी नगर ला सोडतो.मग मी आपला निवांत झालो आणि कामाला लागलो.
सकाळी ४ वाजले तरी मित्रा चा call नाही sms नाही, मी परत टेन्षन मधे आलो.

त्याला मी आपला call वर call करत आहे पण तो काही माझा call काही उचलायला तयार नाही.मग मी आपला ४.४५ ला सकाळी office मधून रूम वर जायला निघलो.
थोडा वेळाने त्याचा call आला आणि सांगू लागला "अरे आमच्या Gate ची किल्ली watchman ने हरवली आहे,ती सापडली की मी येतो, तू जा रूम वर तोवर.मी गेलो रूम वर आणि तो आला,मग त्याने मला शिवाजी नगर ला सोडल.

तिथे गेलो, तर बस ला टाइम होता,एकदाचा टिकेट मिळाल आणि माझा पुणे--नाशिक प्रवास चालू झाला.
पण हे पण देवाला मान्या नसावे, नाशिक फाट्याला बस खराब झाली.

.तिथे परत बस कंडक्टर बरोबर भाडंण झाल तरी इश्यू काही स्लॉईवे होईना.तिथे परत १ तास वाया गेला.मी आपल खूप वैतगलो आणि शेवटी एका बस मधे बसलो आणि परत माझा प्रवास चालू झाला.
देवा कडे प्रार्थना केली म्हणतल परत आत्ता काही होऊ देऊ नको रे बाबा.
शेवटी मी आपला २.०० ला घरी पोहचलो.
Wednesday, 7. October 2009, 21:11:27
Funny
Tuesday, 6. October 2009, 17:30:13
Maharastra Election
१३ ऑक्टोबरला नक्की महाराष्ट्र विधानसभेच्याच निवडणुका होत आहेत ना ? मग प्रचारात ही चिखलफेक कसली सुरू आहे ? महाराष्ट्रापुढचे जे खरेखुरे प्रश्न आहेत, त्याबद्दल कुणीच का बोलत नाहीय ? की एकमेकांची उणीदुणी काढणे, हाच यंदाच्या निवडणूक प्रचाराचा मुख्य अजेंडा आहे.. ? वेक अप... प्लीज, वेक अप !
राज ठाकरे उंदीर... १० ऑक्टोबरच्या सभेत एक घाव, दोन तुकडे करतो - उद्धव ठाकरे
उद्धव आयत्या बिळावर नागोबा... माझ्या नादी लागू नका - राज ठाकरे
राज म्हणजे काही सुपरमॅन नाही, तो सुपारीमॅन आहे - नीलम गो-हे
बापकमाईवर जगणारा उद्धव या जन्मात मुख्यमंत्री होऊ शकत नाही - शिरीष पारकर
घरातलाच ‘ जीना ’ मराठी मतांमध्ये फूट पाडतोय - सामना अग्रलेख
सुपारीबाज, खंडणीखोरांच्या हाती सत्तेची चावी देवू नका - उद्धव ठाकरे
अरे काय, चाललंय काय, या महाराष्ट्रात ? १३ ऑक्टोबरला नक्की महाराष्ट्र विधानसभेच्याच निवडणुका होत आहेत ना ? मग प्रचारामध्ये ही चिखलफेक कसली सुरू आहे ? महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला ज्या समस्या भेडसावत आहेत, राज्यापुढचे जे खरेखुरे प्रश्न आहेत, त्याबद्दल कुणीच का बोलत नाहीय ? की एकमेकांची उणीदुणी काढणे, हाच यंदाच्या निवडणूक प्रचाराचा मुख्य अजेंडा आहे... वेक अप, यार . .. वेक अप !
महागाई, वीजटंचाई, शेतकरी आत्महत्या, दहशतवादी हल्ले, जातीय दंगली, कायदा व सुव्यवस्था, कर्जबाजारीपणा, दुष्काळ, कमी झालेला पाऊस, पिण्याच्या पाण्याची टंचाई, बंद पडणारे उद्योग, वाढती बेरोजगारी, सामान्य माणसाला परवडतील अशी घरे, महानगरांचा विकास, सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या, भ्रष्टाचार, वाढत्या झोपडपट्ट्या... समस्यांची आणि अडीअडचणींची ही यादी मारूतीच्या शेपटाप्रमाणे लांबच लांब वाढत चालली आहे. पण आमच्या राजकीय नेत्यांना ना या प्रश्नांची जाण आहे, ना सामाजिक भान आहे... खरं तर या मुद्यांवरून अख्खा महाराष्ट्र ढवळून निघायला हवा होता. परंतु यंदाच्या निवडणूक प्रचारात दुर्दैवाने मुद्यांऐवजी गुद्यांचीच भाषा केली जातेय. जीवन-मरणाचे प्रश्न राहिले बाजूला, मराठींचा कैवारी कोण आणि उत्तर भारतीयांचा मसिहा कोण, यावरूनच रणकंदन सुरू आहे. नेमका विरोधक कोण, सत्ताधारी कोण, कोणाचा कोणाला कशासाठी विरोध आहे, हेच उमगेनासे झाले आहे. काँग्रेस-आघाडी काय, शिवसेना-भाजप युती काय, रिडालोस काय, मनसे काय, अपक्ष काय आणि बंडखोर काय... कुणालाही हे प्रश्न सोडवण्यात रस नाही. प्रत्येकाचा इंटरेस्ट एकच - सत्ता कशी मिळवायची ? किमानपक्षी सत्तेत भागिदार कसे व्हायचे ? काहीच नाही तर पाठिंब्याच्या बदल्यात किंमत कशी वसूल करायची ? जनहिताचे ना कुणाला सोयर ना सूतक... महाराष्ट्रापुढे आ वासून उभे असलेले हे सगळे प्रश्न राजकीय पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यांच्या आणि वचननाम्यांच्या गोधडीत छानपैकी गुंडाळून ठेवले आहेत.
हे टाळायचं असेल तर प्लीज... प्लीज वेक अप ! गुद्दे विसरा आणि शेवटच्या आठवड्यात तरी मुद्यांवर बोला बाबांनो.. !!
सौज्जन --महाराष्ट्रा टाइम्स