Friday, 13. February 2009, 00:03:39
Love, Relationship
नमस्कार मित्राणो,आज मी तुम्हा लोकाना एक स्टोरी सांगणार आहे.ही स्टोरी आहे माझ्या प्रिय मित्राची(परेश ची).
वेळ:-६ महिने पहिले,सकाळी ११
ठिकाण:-ICICI ATM,फक्डे हुआड,पुणे
पाञ:
हीरो:-परेश
हेरॉईन:-आत्ता पर्यंत हीरो फक्त बघतो आहे (हेरॉईन कडे)पण अजुन काही नाव समजले नाही.
बर आत्ता काय झाल...आपला हीरो होता लाईने मधे उभा.

.अचानक त्याला मागून आवज आला.
"लोकणा तर काही तर काही समजत नाही...कुठे ही कसि ही गाडी लावतात"

आता बाकी स्टोरी उद्या....
Monday, 9. February 2009, 14:38:38
Relationship, Love
Wednesday, 14. January 2009, 15:34:35
Love, Relationship
वा-याने गंधांचे थवे फ़ुलले
पक्ष्यांची शाळा भरली
संध्याकाळ बासरीने गुणगुणली
मला ती येण्याची चाहूल लागली
पाणी बेभान थिरकले
डोंगर संधीप्रकाशाने उजळले
दिवसाची घालमेल थबकली
मला ती येण्याची चाहूल लागली
सृष्टी चैतन्यात चिमुकली झाली
अंबरात सांज ऊतू गेली
पायवाटांत ओढ भिरभिरली
मला ती येण्याची चाहूल लागली
मेघ रेशमी गारव्याच्या अंथरुणात उतरले
डोळे संध्येच्या पंखांनी झाकले
अरुणाने रात्रीला हाक दिली
मला ती येण्याची चाहूल लागली
Friday, 2. January 2009, 21:59:10
Love, Relationship
असंही प्रेम असतं!!
असंही प्रेम असतं!!
अशाच एका संध्याकाळी,मन खुप जास्तच उदास झालं होतं....
काय करु? काहीच सुचतं नव्हतं...
उगाच मनात विचार आला, चल स्मशानात जाऊयात....
गेलो मग स्मशानात एकटाच!बसलो एका थडग्याजवळ जाऊन....
थडगे ताजे वाटत होते....मनात कुतूहल जागले....
थडग्यावरचे नाव वाचले...' महनाज़ खान ' '१९८६-२००७'...
म्हणजे माझ्याच वयाची असेल!
कसं ग्रासलं असेल मृत्युने तिला?काय कारण असेल?
आजार? खून? का... का बाळंतपणात दगावली असेल ती?
मनात उगाच प्रश्नांचे काहूर उठले...
तेव्हढ्यात एक मुलगा त्या थडग्यावर फुले ठेवण्यासाठी आला....
मी त्याला विचारले ' तू भाऊ का तिचा?'
तो म्हणाला 'नाही, मी तो, ज्याच्यासाठी तिने आत्महत्या केली!'
मी विचारले ' आत्महत्येचं कारण?'
तो म्हणाला ' मला ब्लड कॅन्सर झालाय! २ आठवडे उरले आहेत फक्त!'
मी चकीत झालो!
विचारले ' मग तिने आत्महत्या का केली? तू जिवंत असतानाही?'
तो म्हणाला ' ती माझ्या स्वागताच्या तयारीसाठी पुढे गेली आहे!'
.......मी निशब्द....
असंही प्रेम असतं!!
Showing posts 6 -
10 of 14.