Skip navigation.

Bharat Says

Bharat's Open Heart

Posts tagged with "Friends"

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

'यारों दोस्ती बडी हसीन हैं, ये ना हो तो क्‍या फिर,
बोलो ये जिंदगी है, कोई तो हो राजदार, बे गरज तेरा हों यार..'


खरंच या कवितेच्या ओळी ज्याला सुचल्या असतील, त्याला मैत्रीचा किती गहिरा अर्थ समजलाय. मैत्रीसारख्या विशाल नात्याचं वर्णन करायला त्यानं वापरलेलं शब्दांचं कोंदणही केवढं अर्थपूर्ण.:smile:

मैत्रीचे वेगवेगळे पैलू अनुभवणाऱ्या माझ्या- तुमच्यासारख्यांना शब्द कमी पडावेत. एवढं अगाध आहे हे नातं. म्हणतात ना, रक्ताची नाती जन्माबरोबर येतात. पण, मैत्रीचं नातं मनानं स्वीकारलेलं, ना की लादलेलं. त्यामुळे त्यांचा रंगही तेवढाच गडद. पक्‍क्‍या धागान्यं बांधलेली घट्ट वीण. वय, जात, धर्म, वर्ण, लिंग या सर्वांच्या सीमा पार करून उरणारं हे नातं. 'ऐन ग्रीष्मातही सावली देणारं', 'दाटून आलेल्या काळ्याकिट्ट ढगात प्रकाशाचा किरण दाखविणारं', 'वाळवंटात ओऍसिस ठरणारं' आणि 'तापलेल्या जमिनीवर वळवांच्या धारा म्हणून बरसणारं'. एक ना अनेक उपमा देता येतील, नाही का?

सुखाबरोबरच दु:खातही कवटाळणारं हे नातं प्रत्येक जण अनुभवतो. 'कधी गुरु बनून हे नातं पुढं येतं', तर 'कधी पाठीवर शाबासकीची थाप बनून', 'आसवे पुसणारा हात बनूनही ते तुमच्या गालावर स्थिरावतं.' माणसातल्या माणुसकीचं दर्शन घडविण्याची ताकद या नात्यात मोठी.

आयुष्यात अनेक जोडीदार आपली सोबत करतात, पण जीवाचा मैतर मात्र एकच. बाग फुलवलेला माळी फुलं देतो, पण मैत्री फुलांच्या गंधाप्रमाण पुरा आसमंत धुंद करते. सुखाची पेरणी करते, आनंदाची पाठराखण करते. आपण फक्त अंतर्मुख व्हायचं असतं. 'फ्रेंडशीप बॅंड' हा फक्त दिखाऊपणा. पण, मैत्रीदिनाचं निमित्त साधून आपण स्वतःलाच एक विचारू शकतो, की आपल्या मैत्रीची वीण कशी आहे? आपणही आहोत का, या मैत्रीभरल्या पंढरीचे वारकरी?



असो, तुम्हाला मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! :hat: :drunk:

माझे ’आलु पराठे’

, ,

बि.सी.एस.च्या दुसऱ्या वर्षाला होतो तेव्हाचा किस्सा.

प्रभासचे आई-वडिल बाहेरगावी गेले होते. आणि याच संधीचा फायदा उठवायला आमची सगळी गॅंग प्रभसच्या घरी पिक्चर बघायला जमली होती. त्यासाठी कॉलेजला दांडी मारलीच होती, ते काय सांगायला नकोच. :smile: तर, हा असा फक्कड प्लान असल्यानं आम्ही येतांनाच भरपुर सि.डी. आणल्या होत्या सोबत. एकामागुन एक पिक्चर बघण्याचा सपाटाच लावला होता.

थोड्यावेळानी मात्र आम्हाला सगळ्यांनाच भुक लागली. प्रभास दिवसभर कॉलेजला असणार म्हणुन आईनं काहीच करुन ठेवलेलं नव्हतं घरात.त्यामुळं तर आमची अजुनच जास्ती पंचाईत झाली. काय करावं काही सुचत नव्हतं. मध्येच माझ्या डोक्यात आलं काहीतरी.. मी म्हटल,"प्रभास, घरात पोळीचं पीठ आणि बटाटे आहेत का?"

प्रभास :- "हो, आहेत."
मी:- "काढ कणिक बाहेर, मी आलु पराठे बनवतो."
प्रभास :- "येतात का तुला नक्की बनवता?"
मी :- "हो मग!"
प्रभास:- म्हटलं, हा बाप्या एवढं आत्मविश्वासानी सांगतोय तर येत असतील.

मी कणिक भिजवली, ती मळली, त्याचबरोबर बटाटे उकडायला ठेवले. बटाटे उकडुन तयार होतायेत तोवर, मी पराठे ’थापायला’ सुरुवात केली. ती ओली कणिक... पोळपाटाला चिटकत होती तशीच.. बघावं तर मी कणकेचा सगळा डब्बाच रिकामा केलेला! पराठे बनवतांना वापरायला म्हणुन कोरडी कणिकच उरली नव्हती!! :D

ते बटाटे सुद्धा या मी पुर्ण उकडु दिले नाहीत. तसेच बाहेर काढले, त्यांचे काप केले आणि अक्षरशः हातानी ’पेरले’ त्या कच्च्या पराठ्यांमध्ये!

बाप रे!!! :yikes:

डोंबल्याचे ’आलु पराठे’.. भरपुर शिव्या पडल्या मला.. नाही तर काय?

तरी नशिब, पंकज आमच्या सोबत होता. आणि नशिब अजुनच बलवत्तर की त्याला खिचडी अगदी व्यवस्थीत (आणि हुकमीपणे) करता येत होती.
शेवटी पंकजनी तांदळाची खिचडी लावली, आणि आम्ही सगळे त्यावर तुटुन पडलो..!
पराठे होतेच सोबत.. लोणच्यासोबत खायला.. :wink:

दंगामस्ती.. अजुन एक!

, ,

माझा कॉलेजमधल्या दिवसांचा फ्लॅशबॅक कधीच संपणारा नाहीये. इतका धुडगुस घातला आहे आम्ही, आणि तो सुद्धा एवढा दणकेबाज की ते सगळं विसरणं शक्यच नाही!!
याच फ्लॅशबॅकमधला अजुन एक किस्सा... :wink:

बि.सि.एस. फर्स्ट इयरचा हा किस्सा. आम्ही - म्हणजे मी, महेश आणि प्रभास - लेक्चर्सना कधी बसायचोच नाही. म्हणजे तसं अधुन-मधुन तोंडं दाखवुन (आणि बघुन) जायचो, पण त्याचं प्रमाण फारच कमी होतं. आम्ही आपले कधी बोट क्लबवर, कधी कॉलेज कॅंटीन, बऱ्याचदा ’बाबा’-’शिबा’वर (ही आमच्या कॉलेजजवळची दोन छोटी, पण भरपुर पब्लिक असणारी हॉटेलं) असं कुठे-ना-कुठे पडीक असायचो. पण आमचा मित्र बंडु मात्र एकदम सिंसीयर कार्टं. झटुन सगळे लेक्चर्स करणार. सगळ्या लेक्चर्सना व्यवस्थीत नोट्स काढणार. मग आम्ही काय करायचो, रोज कॉलेज सुटलं की बंडुला गाठायचो. त्याच्याकडुन आम्हाला सगळ्या बातम्या कळायच्या. :cool: कोणी काय असाईनमेंट दिली आहे, कोणी काय शिकवलं इथ पासुन ते कोणत्या प्रोफेसरनी काय धमकी/ताकिद/सुचना दिली आहे ते सुद्धा!! मग हा बाळ्या आम्हाला चांगलाच पिळायचा..
"तुम्ही लटकलात रे आता.. उद्या सर करणार तुमची चंपी.."
"तुम्ही मेले, सरांनी प्रॅक्टीकलला बसु देणार नाही म्हणुन सांगितलंय.."
"अरे सरप्राईज टेस्ट सांगितलीये मॅडमनी.."
"अटेंडन्स लावणार आहेत बोर्डवर.."
ही आणि अशी अनेक वाक्य असायची त्याची. नाही म्हटलं तरी आम्ही थोडेफार तरी टरकायचोच. :worried:
पण ते घाबरणं तेवढ्यापुरतंच.. परत आमचं पहिले पाढे पंचावन्न!

असं करता-करता परिक्षा जवळ आल्या. मग जरा आमचं (अगाध) ज्ञान थोडं(?) तोकडं पडु लागलं आणि आम्ही बंडु महाराजांनाच साकडं घातलं "आम्हाला मॅथ्स शिकवा" म्हणुन.
महाराज लगेच तय्यार!! तरी सुद्धा त्यांची थोडी भाषणबाजी ऐकावी लागलीच!
"तरी तुम्हाला सांगत होतो, लेक्चर करा म्हणुन.. पण ऐकताय कुठं तुम्ही माझं?"

मी आणि महेश मग कॉलेजच्या लायब्ररीत बसुन बंडु सरांकडुन शिकवणी घेऊ लागलो. प्रभास मात्र घरीच बसुन अभ्यास करायचा.
आम्हाला मॅथेमॅटिक्सचे तीन पेपर्स होते - एम.१, एम.२ आणि एम.३ असे. आम्ही या तीनही पेपर्सचा अभ्यास या महाशयांच्या ’गाईड्न्स’खाली गिरवायला सुरुवात केली.
कधी बंडु आमची उणी-दुणी काढायचा.. तर कधी आम्ही त्याची..
आणि परिक्षा उजाडलीच! पेपर्स दिले..
प्रत्येक पेपर नंतर आम्ही चौघं उत्तरं टॅली करुन बघायचो आणि आमचे डोळे फिरायचेच.. प्रत्येकाचं काहीतरी वेगळंच उत्तर असायचं..!
त्याच धास्तीत आम्ही रिझल्टला सामोरे गेलो. आणि..
पेपर्सपेक्षा तर निकालच जास्ती धक्कादायक निघाला की!! :no:
बंडु सोबत मी आणि प्रभास - असे आम्ही तिघंही ’निकालात निघालो’.. महेश तेवढा वाचला.
मी एम.१ मध्ये नापास..
बंडु एम.३ मध्ये नापास..
प्रभास पण एम.३ मध्ये नापास..
आणि बंडुचा परमप्रीय मित्र अमोल.. या तीनही पेपर्समध्ये नापास!!

मला तो लॅंब्डा नडला.. प्रभासचं तसंही मॅथ्सशी आधीच वाकडं असल्यानं एम.३ राहिला त्याचा.. पण बंडुचं काय झालं काय माहीत? त्याचं तर गणित चांगलं होतं..
नंतर आम्ही कसे-बसे हे विषय सोडवलेच.. अगदी ’क्रिटीकल’वर सोडवले.. पण हुश्श..!
आता मात्र हे सगळं आठवलं की फट्कन हसु येतं..

माझा मित्र परिवार....

hi
आज मी तुम्हाला माझऽ मित्र/मैत्रीण बद्दल सांगणार आहे....

प्रभास:-देवाने याला बुद्धी भर भरून दिली आहे...वात्रट आणि खट्याळ पनात याचा कोणी हात धरू शकणार नाही...:lol: :lol:

परेश:-याला विसरायची एवढी सवय आहे...कधी कधी वाटत लग्न ज़ल्यावर हा नक्की बायकोला विसरून येणार कुठे तरी...:yikes:

महेश:-हा तसा एकदूम शांत प्राणी ..."अरे बोला काही तरी"..अस सांगाव लागत..आणि बोलायला लागला तर...वाटत आप्ण अस का सांगितल याला...Homer: Doh!

अभिजीत:-याला तर नाइट व.Cचमन ची ड्यूटी द्यावी ...रात्र भर मोबाइल व.Cर बोलत असतो...आणि ते पण गल्ली मधे फिरता फिरता..:knight:

सचिन गुजराती:-एक भणंट माणूस...याचा काही नेम नाही बुवा....:smile:

भोसले:-राजे....एकदा काय बोलायला लागले तर...वाटत आत्ता काय तलवार चा काढत का काय याच एकीकल नाही तर...:jester:

पियुष पाटील:-मराठा असण्याचा खूपच अभिमान साहेबाना...:ko:

अश्विनी राणे:-ही मुंबईकर ... पन मनापासून गिरगावची...बाहेरून कडक पन आतून एकदूम गोड कोकणच्या फनसा सारखी...:yes:

प्रगती पाटील:-जेव्हा जेव्हा हिच्या बरोबर बोलतो तेव्हा आम्ही कधी भांडत नाही अस कधी झाल न्हाई..:insane: :faint:

वैशाली:- एकदूम समजुदार...काळजी वाहू...तशी ही माझऽ मोठ्या वाहिनी ची लहान बहीण,काम सांगितल की लगेच तयार (काय करणार जिजुंचय बंधुनी सांगितल असता ना..:lol:)

शेराष्टा:-तशी ही पोरगी बंगाली..मुंबईकर पन मराठी एकदूम छान बोलते... आम्ही मित्र कसे झालो हे मलाच काय, पण तिला तरी कळलं की नाही मला शंका आहे.

पंकज:-याच एक फेमस वाक्य "शांत बस रे तुला काय माहीत नाही"...बर बाबा सगळ तुलाच माहीत..:confused:

यशवंत शिंदे:-.Cफीस मधे सीनियर असावा तर असा...सतत समजून सांगणारा...

तसा माज़या खूप मोठा मित्र परिवार आहे....पन सनळ्यां बद्दल लिहान शक्य नाही.

या सर्वा मित्र/मैत्रीण शिवाय मज़ आयुष्य कधीच पूर्ण होणार नाही.

bye bye

मैत्रीतलं निखळ सौंदर्य

,

मैत्री... दोनच अक्षरांचं हे नातं आपलं अवघं आयुष्य व्यापून असतं. भातुकलीचा खेळ मांडायला मैत्री लागते. क्रिकेटचा खेळ मांडायला मैत्री लागते आणि आयुष्य घडवायलाही मैत्री उपयोगी पडते. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर ही मैत्री आपला हात धरून आपल्यासोबत चालत असते. आपल्याला खेळायला, धुंद पावसात भिजायला, डोंगरदऱ्यात फिरायला, प्रवासात गप्पा रंगायला आणि खांद्यावर मान टाकून मन मोकळं मोकळं करायलाही मैत्रीच लागते. :smile:

मैत्रीच्या हजारो गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. जगभरातील वाङ्मयात, नाटकात, चित्रपटात आपल्याला मैत्रीच्या अनेक कथा व नाना रुपं पहायला मिळतात. श्रीकृष्ण सुदामाची गोष्ट तर सर्वपरिचित आहेच!

मित्राचं महत्त्व अनेकांनी अनेक प्रकारे सांगितलं आहे. कुणी म्हटलं आहे संकटसमयी कामी येतो तो खरा मित्र. कुणी म्हटलंय, मैत्री ही ईश्वरी भेट आहे. कुणी मैत्रीला सर्वात जवळचं मानलंय तर कुणी मैत्रीला सर्वस्व मानलंय. यात हेलन केअरचं मत उठून दिसतं. आपल्या अपंगत्वावर, अंधत्वार मात करून इतिहास घडवणाऱ्या हेलन केलरने म्हटले आहे की, 'एकट्यानं प्रकाशात चालण्यापेक्षा मित्रासोबत अंधारात चालणं केव्हाही चांगलंच!

आई-वडील, बहिण-भाऊ, मामा-मावशी, आजी-आजोबा ही आणि अशी सगळीच नाती आपण निवडलेली नसतात. ती जन्माने लाभतात. पण मित्र आपण निवडलेला असतो. तो सर्वार्थाने आपला असतो. ते नातं आपण निर्माण केलेलं असतं. आपण फुलवलेलं असतं. म्हणूनच मित्र आपल्याला अधिक जवळचे वाटतात. तरुणाईत तर मैत्रीला बहर येतो. मैत्रीचे कितीतरी कंगोरे अनुभवण्याचा हाच तर काळ असतो. नवे मित्र आयुष्यात येणं, ते अधिकाधिक जवळचे होत जाणं किंवा कधीतरी दूर जाणं, हे याच वयात होत असतं. संभ्रमाच्या या काळात प्रत्येकाला मित्राचा आधार हवा असतो. म्हणून माणसं आपली जिव्हाळ्याची बेटं निर्माण करतात.

त्यामुळेच जसे आपण मातृदिन साजरा करतो, गुरुपौणिर्मा, रक्षाबंधन साजरे करतो. त्याच उत्साहात आपण आता 'फ्रेंडशिप डे' सुद्धा साजरा करतो.

मैत्री नसते दोन शब्दांचा खेळ,

नसते निव्वळ छेडाछेडीची वेळ.

मैत्री म्हणजे प्रत्येक क्षणात,

क्षणातील प्रत्येक सुखदु:खात,

साथ द्यायची असते ती वेळ... :smile:
December 2009
M T W T F S S
November 2009January 2010
1 2 3 4 5 6
7 8 9 10 11 12 13
14 15 16 17 18 19 20
21 22 23 24 25 26 27
28 29 30 31