Tuesday, 31. March 2009, 13:45:59
India
आज या इथे छापण्यात येत असलेला मजकूर फक्त प्रौढांसाठीच आहे. तुमचं वय १८ पेक्षा जास्त असेल तरच वाचा.
...
...
...
...
...
लवकरच निवडणुका आहेत.
१८ वर्षांच्या पुढील सगळ्यांनी मतदान कराच.
Monday, 23. February 2009, 06:02:37
India
‘ ..अॅण्ड ऑस्कर गोज टू... ए. आर. रेहमान... ’ बस्स... हे शब्द कोडॅक थिएटरमध्ये उच्चारले गेले... आणि हॉलिवूडच्या राजधानीत ‘ जय हो ’ चे स्वर निनादले... बेस्ट ओरिजनल साँग आणि बेस्ट स्कोअर या दोन श्रेणीसाठी रेहमानने अंकल ऑस्करची बाहुली उंचावली आणि तो दोन ऑस्कर मिळवणारा पहिला भारतीय ठरला.
या दोन श्रेणींव्यतिरिक्त स्लमडॉग मिलेनिअरसाठी बेस्ट पिक्चर, डॅनी बोएल ‘ बेस्ट डायरेक्टर ’ , सायमन बिफॉयला ‘ बेस्ट अॅडॉप्टेड स्क्रिन प्ले ’, अँथनी डॉड मॅन्टलला ‘ बेस्ट सिनेमॅटोग्राफी ’, रिसूल पूकुट्टीला ’ बेस्ट साऊंड मिक्सिंग ’ तर क्रिस डिकन्सला ‘ बेस्ट एडिटिंग ’ साठी ऑस्कर मिळाले. या सा-या पुरस्कारांमुळे स्लमडॉगला मिळालेल्या एकूण ऑस्करची संख्या आठ झाली.
Monday, 9. February 2009, 20:10:42
India
आता मंगळुरू पब प्रकरण गाजते आहे.
प्रभू रामचंद म्हणजे साक्षात् मर्यादापुरुषोत्तम. त्यांचे नाव धारण करून काम करणाऱ्या संघटनेने स्वत:च्या भोवतीही मर्यादेचे रिंगण आखून त्यातच काम करायला हवे. पण मंगळुरात तसे झालेले दिसत नाही. संस्कृतिरक्षणाचे 'कार्य' हाती घेतलेल्या तरुणांच्या गटाने 'जय श्रीराम'च्या घोषणा देत स्थानिक पबवर हल्ला चढवला. हे करताना सोबत टीव्हीचे कॅमेरे नेण्यास ते विसरले नाहीत. त्यानंतर जे काही घडले, ते साऱ्या जगाने बघितले.
संस्कृतीच राखायची तर, घराघरात चालणारे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रभू रामचंदांच्या पाइकांनी पुढे यायला हवे. गावात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने आजही ग्रामीण भागात महिलांना दहा किलोमीटरवरून डोक्यावर पाण्याचे घडे वाहावे लागतात. या पाइकांपैकी किती जणांनी आजवर एकदा तरी त्यांच्या डोक्यावरील एखादा हंडा स्वत:च्या डोक्यावर घेऊन दोन पावलांची वाटचाल केली? अंधश्रद्धा आणि दुष्ट रुढी यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये सर्रास स्त्रीगर्भाची हत्या होते. त्या रोखण्यासाठी या संघटनेने काय केले? पैशाच्या चणचणीमुळे तरुण मुलींना कुंटणखान्यात सर्रास विकले जाते. ते काम करणारे पुरुषच असतात. त्यांचा हात कोणी धरला? खैरलांजीसारख्या घटना होतात व माणुसकीलाच काळिमा फासला जातो. तेव्हा यापैकी कितीजण पुढे आले?
भारतीय संस्कृतीचेच रक्षण करायचे, तर ते पबमध्ये नव्हे घराघरात, रस्त्यांवर आणि शेतांत, कारखान्यांत तिथल्या महिलांचे रक्षण केल्याने होऊ शकेल. पण तसे करायचे, तर टीव्हीचे कॅमेरे कसे येणार? आणि देशभर प्रसिद्धी तरी कशी मिळणार?
Tuesday, 3. February 2009, 16:49:41
India, Maharastra
शेवटी संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी ... वांग्याचे भरीत ...गणपती बाप्पा मोरया ची मुक्त आरोळी. केळीच्या पानातली भाताची मूद आणि त्यावरचे वरण. उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ... मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातले उडालेले पाणी...दुस-याचा पाय चुकून लागल्यावर देखील आपण प्रथम केलेला नमस्कार...दिव्या दिव्या दिपत्कार... आजीने सांगितलेल्या भुताच्या गोष्टी... मारुतीची न जळणारी आणि वाटेल तेंव्हा लहानमोठी होणारी शेपटी... दस-याला वाटायची आपट्याची पाने... पंढरपुरचे धुळ आणि अबीर यांच्या समप्रमाणात मिसळून खाल्लेले डाळे आणि साखरफ़ुटाणे...सिंहगडावर भरुन आलेली छाती आणि दिवंगत आप्तांच्या मुठभर अस्थींचा गंगार्पणाच्या वेळी झालेला स्पर्श... कुंभाराच्या चाकावर फिरणा-या गोळ्याला त्याचे पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून घाटदार मडके घडावे तसा हया अदृश्य पण भावनेने भिजलेल्या हातांनी हा पिंड घडत असतो. कुणाला देशी मडक्याचा आकार येतो. कुणाला विदेशी कपबशीचा......
Showing posts 1 -
5 of 11.