एक उनाड दिवस...
Sunday, 10. May 2009, 13:18:59
माझा रुम पार्टनर सुद्धा आला तेवढ्यातच. मग तो सुद्धा गप्पांमध्ये सामिल झाला. मध्येच निघालं पत्ते खेळुया. सगळ्यांनीच ही आयडिया उचलुन धरली. मग मी आणि प्रभासनी पटकन जाऊन जवळच्याच दुकानातुन पत्त्यांचा कॅट घेऊन आलो. "काय खेळावं?" हा प्रश्न लगेचच मिटवण्यात आला.. ’पाच-तीन-दोन’ खेळायचं ठरलं. मी आणि प्रभास तर बऱ्याच मोठ्ठ्या कालावधीनंतर खेळत होतो पत्ते! त्यामुळं पत्ते वाटतांना मी सगळेच वाटले.
मग आम्ही गेलो ’दुर्गा’वर.. कोल्ड कॉफी प्यायची ठरलं होतं.. पण आम्ही मयुर कॉलनीमधल्या दुकानात गेलेलो. तिकडं जरा गाडी लावायला नीट जागा तरी आहे. रामबाग कॉलनीमधल्या दुकानावर आधीच खुप गर्दी असते आणि शिवाय तिथं पार्किंगच्या जागेचे वांदेच होतात. मग ट्रॅफिक पोलिसची गाडी आली की धावाधाव.. त्यापेक्षा म्हटलं इकडंच जाऊ. शिवाय या दुकानात बसायला जागासुद्धा मिळते. आरामात बसुन, गप्पा मारत मारत त्या कोल्ड कॉफीचा आस्वाद घेतला. मला फार आवडते ही कोल्ड कॉफी. मला कोणी भरपुर कप जरी ऑफर केले ना, तरी ते प्यायला मागे-पुढे बघणार नाही मी.
कॉफी पिली, आणि मग निघालो आम्ही भटकायला. मयुर कॉलनीमधुन कर्वे रोडनी करिष्मा सोसायटी पर्यंत, तिथुन मेहेंदळे गॅरेज - डेक्कन - म.न.पा. - शिवाजी नगर - युनिवर्सिटी रोडनी पाषाण, तिथुन बावधन मार्गे चांदणी चौक.. मला चांदणी चौक बघायचा होता. म्हणुन मग तिकडं गेलो. तिथुन मग पौड रोडनी बालगंधर्व ला. भला मोठ्ठा राऊंड मारला आम्ही प्रभास च्या ब्लॅक ब्युटीवरुन.
बास्स.. एवढं सगळं केल्यावर हौस फिटलीच आमची. मग सरळ घरीच. पण दिवस मात्र घालवला अगदी उनाडपणे.














How to use Quote function: