पुलंचे किस्से...एक आठवण
Friday, 12. June 2009, 16:57:34
कोल्हापूर आणि तेथील एकूणच भाषाव्यवहार म्हणजे पु . लं . च्या मर्मबंधातील ठेव .
कोल्हापुरी समाजाइतकाच कोल्हापुरी भाषेचा बाज सांगतांना ते म्हणाले,
इथे रंकाळयाला रक्काळा म्हणतात पण नगा - याचा नंगारा करतात
कोल्हापुरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरीबाहेर येऊन आपल्या छातीवर हात बडवायला लावील असं आहे.
त्यानं शेतात ऊंस लावला याचं इंग्रजी रुपांतर इथल्या मुन्सफानं एकदा 'he applied US in his farm' असं केलं होतं आणि
त्यावेळच्या शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणं ' यू ' वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता.
पुलंचा हजरजबाबी विनोद
पुलंचा हजरजबाबी विनोद हा तर विलक्षण आहे. भारती मालवणकर ही दामुअण्णा मालवणकरांची मुलगी.
दिसायला खूपच सुस्वरुप. दामुअण्णांचे दोन्ही तिरळे डोळे मागल्या पिढीतल्या लोकांच्या परिचयाचे आहेत. दामुअण्णांच्या भारतीला पुलंनी प्रथम पाहताच
"ही मुलगी बापाचा डोळा चुकवून जन्माला आली आलीय"असे उद्गार काढले.














How to use Quote function: