Skip navigation.

Bharat Says

Bharat's Open Heart

एटीकेटी

पप्पू नाचतच घरात शिरला आणि 'मैं पास हो गया' असे नाचत गाऊ लागला. :hat: :drunk:

त्याचा एकेकाळचा वर्गमित्र म्हणून त्याला टप्पू हाणायचा बंडूऌअ पूर्ण अधिकार होता.

कारण या रेम्या डोक्या माणसाने बंडूसारख्या कुटुंबवत्सल गृहस्थाची रविवारची दुपार आपल्या या ग्राम्य नृत्याविष्काराने खराब करून टाकली होती.

बंडू:'अरे मूर्खा, आठ दिवसांपूवीर् बोर्डाचा रिझल्ट लागला तेव्हा तू सलग बावीसाव्यांदा आपटी खाल्ल्याबद्दल टिपे गाळत आला होतास. लवकरच तू नापाशीचा रौप्य महोत्सव साजरा करशील तेव्हा आम्ही तुझा जाहीर सत्कार करू, अशी आम्ही तुझी रेवडीही उडवली होती. हे सर्व विसरलास की भ्रमिष्ट झालास?'

'अहो, एसेस्सी बोर्डाने अनुकंपा तत्त्वावर भाऊजींना पास केले असेल', आमच्या सौ.ने मध्येच नाक खुपसले.

'छे छे पास झालो नाही. पण होणार. लवकरच होणार!' ठाम विश्वासाने पप्पू उद्गारला.

'कसा काय?'

'असे काय करतोस? पेपर वाचत नाहीस काय? दहावीच्या मुलांना एटीकेटी लागू होणार! आता सगळ्या विषयांत पास होण्याची गरजच नाही.' पप्पूचा तोच उत्साह.

माझा पारा गेला. म्हटले, 'बिनडोक निर्णय आहे. ढ मुलांना वर चढवून शिक्षणाचे मातेरे होणार. लायकी नसताना ही पोरे शेफारणार. त्यांना त्यांच्या पायरीवरच ठेवले पाहिजे.'

पप्पू गोरामोरा झाला. पण त्याने तसेच व्हायला हवे होते. 'वहिनी निघतो मी', असे तोंडातल्या तोंडात पुटपुटत तो निघूनही गेला. मी हुश्श म्हटले आणि बेडवर अंग लोटले.

तेवढ्यात ही म्हणाली, 'अहो, आयुष्यात सगळ्यांनाच केव्हा ना केव्हा एटीकेटी लागते. तुम्ही मला पाहायला आला होतात. माझ्यासाठी ती वरपरीक्षाच होती. तुमचे दात नको तितके पुढे. मी नापासच केले होते. पण मैत्रिणी म्हणल्या, अगं, करिअरिस्ट आहे. इन्कम बरं आहे. दे एटीकेटी आणि धर संसाराची काठी!':worried: :cry:

कधी तरी असेही जगून बघा...!!! तुम्हाला काय वाटत?

Comments

Anonymous 22. July 2009, 05:16

Nitin writes:

bhannat bharat... really ATKT...
http://www.knitij.blogspot.com

Anonymous 30. July 2009, 05:54

Rewa writes:

Bharat Vichar kay ahe nakki??:P

bharatbanate 30. July 2009, 13:24

Mala watat...mala hi aschicha ATKT milawi...:smile: :smile:

Anonymous 26. September 2009, 16:06

Prajakta writes:

It's really so funny!!!!!

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies

December 2009
M T W T F S S
November 2009January 2010
1 2 3 4 5 6
7 8 9 10 11 12 13
14 15 16 17 18 19 20
21 22 23 24 25 26 27
28 29 30 31