एक उनाड दिवस आपला?
Tuesday, 11. August 2009, 19:10:49
ही स्पेस स्वत:ला देऊन बघायला हवी अधून मधून. रोजच्या जगण्यात खूप वेगवेगळे रोल करतो आपण. शिस्तप्रिय बॉस, कर्तव्यतत्पर एम्प्लॉयी, प्रेमळ बाप, आज्ञाधारक मुलगा, कुटुंबवत्सल नवरा, संसारी बायको, आदर्श मित्र... कधी कधी सुजाण नागरिक वगैरे वगैरे...यापलिकडेही खूप काही असतो आपण. रोजच्या धबडग्यात आपली ही ओळखच विसरून गेलेली असते. आपलं आवडतं गाणं किती तरी दिवसात ऐकलेलं नसतं. आवडत्या लेखकाचं पुस्तक बाजारात येऊन जुनं झालेलं असतं. नाटक बघायला थिएटरला गेलो त्यालाही वर्षं उलटलेली असतात, जवळच्या मित्राशी निरुद्देश गप्पा मारलेल्या नसतात... आईच्या पायाशी बसून केसांत तेल नसतं मुरवलेलं... दूर असलेल्या भावंडांशी कामाशिवाय बोललेलो नसतो आपण...काहीच मागणं नसताना मंदिरात जाऊन हात नसतात जोडलेले...हे सगळं नुसतं आठवण्यासाठी तरी स्वत:ला भेटायला हवं. अशी भेट झाली तर काय हरवतंय आयुष्यात, ते कळेल तरी.















bharatbanate # 11. August 2009, 20:11
Anonymous # 12. August 2009, 04:32
मस्त रे!
अगदी मनातले बोल लिहुन गेलास यार!
Anonymous # 13. August 2009, 07:19
आयला ... मस्तच ... असे तर मी माज्या पहिल्या जॉब पासून करत आलोय ;) कधीही वाटले आज जाऊ नए की दांडी मारायची ... निरुद्देश भटकाय्चे ... मित्रां बरोबर गप्पा मारायच्या ... सिनेमे पहायचे ... नविन प्लान्स करायचे आणि दुसर्या दिवशी नविन उत्साहाने कामाला सुरुवात .... छान लिहिलय ... अगदी माज्यामनातलं
Anonymous # 29. August 2009, 07:37
Lai Bhari...Me he mahinyatun ekda tari follow kartech mhanunach dusryanch dok kaht aste..:)
Tevach mala kalal ki tula dok ahe pan ata he vachun khatri pakki zali ki tula dok ahe n te vyavasthita chalu ahe...:P