Skip navigation.

Sign up | Lost password? | Help

Bharat Says

Bharat's Open Heart

वेक अप...वेक अप !

१३ ऑक्टोबरला नक्की महाराष्ट्र विधानसभेच्याच निवडणुका होत आहेत ना ? मग प्रचारात ही चिखलफेक कसली सुरू आहे ? महाराष्ट्रापुढचे जे खरेखुरे प्रश्न आहेत, त्याबद्दल कुणीच का बोलत नाहीय ? की एकमेकांची उणीदुणी काढणे, हाच यंदाच्या निवडणूक प्रचाराचा मुख्य अजेंडा आहे.. ? वेक अप... प्लीज, वेक अप !


राज ठाकरे उंदीर... १० ऑक्टोबरच्या सभेत एक घाव, दोन तुकडे करतो - उद्धव ठाकरे
उद्धव आयत्या बिळावर नागोबा... माझ्या नादी लागू नका - राज ठाकरे
राज म्हणजे काही सुपरमॅन नाही, तो सुपारीमॅन आहे - नीलम गो-हे
बापकमाईवर जगणारा उद्धव या जन्मात मुख्यमंत्री होऊ शकत नाही - शिरीष पारकर
घरातलाच ‘ जीना ’ मराठी मतांमध्ये फूट पाडतोय - सामना अग्रलेख
सुपारीबाज, खंडणीखोरांच्या हाती सत्तेची चावी देवू नका - उद्धव ठाकरे


अरे काय, चाललंय काय, या महाराष्ट्रात ? १३ ऑक्टोबरला नक्की महाराष्ट्र विधानसभेच्याच निवडणुका होत आहेत ना ? मग प्रचारामध्ये ही चिखलफेक कसली सुरू आहे ? महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला ज्या समस्या भेडसावत आहेत, राज्यापुढचे जे खरेखुरे प्रश्न आहेत, त्याबद्दल कुणीच का बोलत नाहीय ? की एकमेकांची उणीदुणी काढणे, हाच यंदाच्या निवडणूक प्रचाराचा मुख्य अजेंडा आहे... वेक अप, यार . .. वेक अप !

महागाई, वीजटंचाई, शेतकरी आत्महत्या, दहशतवादी हल्ले, जातीय दंगली, कायदा व सुव्यवस्था, कर्जबाजारीपणा, दुष्काळ, कमी झालेला पाऊस, पिण्याच्या पाण्याची टंचाई, बंद पडणारे उद्योग, वाढती बेरोजगारी, सामान्य माणसाला परवडतील अशी घरे, महानगरांचा विकास, सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या, भ्रष्टाचार, वाढत्या झोपडपट्ट्या... समस्यांची आणि अडीअडचणींची ही यादी मारूतीच्या शेपटाप्रमाणे लांबच लांब वाढत चालली आहे. पण आमच्या राजकीय नेत्यांना ना या प्रश्नांची जाण आहे, ना सामाजिक भान आहे... खरं तर या मुद्यांवरून अख्खा महाराष्ट्र ढवळून निघायला हवा होता. परंतु यंदाच्या निवडणूक प्रचारात दुर्दैवाने मुद्यांऐवजी गुद्यांचीच भाषा केली जातेय. जीवन-मरणाचे प्रश्न राहिले बाजूला, मराठींचा कैवारी कोण आणि उत्तर भारतीयांचा मसिहा कोण, यावरूनच रणकंदन सुरू आहे. नेमका विरोधक कोण, सत्ताधारी कोण, कोणाचा कोणाला कशासाठी विरोध आहे, हेच उमगेनासे झाले आहे. काँग्रेस-आघाडी काय, शिवसेना-भाजप युती काय, रिडालोस काय, मनसे काय, अपक्ष काय आणि बंडखोर काय... कुणालाही हे प्रश्न सोडवण्यात रस नाही. प्रत्येकाचा इंटरेस्ट एकच - सत्ता कशी मिळवायची ? किमानपक्षी सत्तेत भागिदार कसे व्हायचे ? काहीच नाही तर पाठिंब्याच्या बदल्यात किंमत कशी वसूल करायची ? जनहिताचे ना कुणाला सोयर ना सूतक... महाराष्ट्रापुढे आ वासून उभे असलेले हे सगळे प्रश्न राजकीय पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यांच्या आणि वचननाम्यांच्या गोधडीत छानपैकी गुंडाळून ठेवले आहेत.


हे टाळायचं असेल तर प्लीज... प्लीज वेक अप ! गुद्दे विसरा आणि शेवटच्या आठवड्यात तरी मुद्यांवर बोला बाबांनो.. !!

सौज्जन --महाराष्ट्रा टाइम्स

"तो","ती", त्यांची प्रेमकथा, तसल्या नजरा आणि आयुष्य Funny

Comments

Anonymous 6. October 2009, 13:17

Prakash B Pimpale writes:

खूप छान विषयाला हात घातलात आपण. सारेच राजकारणी 'तसे' होत आहेत अशे वाटत आहे. म्हणून आपण एकाच विंनती करू शकतो जनतेला आणि स्वतःला, सगळ्या पक्षांना विसरा आणि जो चंगला असेल, मग तो एकाद्या पक्षाचा असो कि मग अपक्ष, तो निवडून आलाच पाहिजे! 'कमीत कमी' [तसं स्वतन्त्र्यानातर इतका वेळ लागागायला नको तरी ] दुसर्या पंचवार्षिकला तरी यांना लाजा वाटतील आणि हे मुद्यावर बोलतील.
या वेळेस महाराष्ट्राच्या जनतेकडून क्रांतीची अपेक्षा करतो!

Anonymous 6. October 2009, 15:01

Anonymous writes:

This is totally copied from
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5088690.cms
Please mention the original source.

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies

November 2009
M T W T F S S
October 2009December 2009
1
2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 14 15
16 17 18 19 20 21 22
23 24 25 26 27 28 29
30