Skip navigation.

मेकएओव्हर कारचा

, ,

[ Tuesday, August 07, 2007 09:42:57 pm]

कार ग्राफिक्स - कलेशी सख्य असलेल्यांचा डोळयासमोर एव्हाना आकर्षक ग्राफिक्स आली असतील आणि कलेशी देणंघेणं नसलेल्यांनाही हे काहीतरी सॉल्लिड असावं याचा अंदाज नक्कीच आला असेल. कारचं मॉडेल, त्याची वैशिष्ट्यं, परफॉर्मन्स हे सगळं तर महत्त्वाचं आहेच पण याहीपेक्षा उत्सुकता असते ती कारच्या अॅक्सेसरीजबाबत. गाडी आतून-बाहेरून आकर्षक दिसावी यासाठी आता अनेक पर्याय उपलब्ध झाले असून ग्राफिक्सचा पर्याय सर्रास वापरला जाऊ लागलाय.

' डॅशबोर्ड ट्रिम' हाही त्यातलाच एक ऑप्शन. यामुळे कारच्या इंटिरिअरचा लूक बदलून जाईल. कार घेताना डॅशबोर्ड ट्रिम मिळतं किंवा अनेकदा कार अॅक्सेसरी म्हणून ते बसवलं जातं. कारच्या सेंटर कन्सोल्स, साइड डोअर्स, स्पीडोमीटरचा भाग, ओव्हरहेड कन्सोल हे पार्ट हटके करायचे असतील, तर त्यावर डोमिंग प्रक्रिया केली जाते. त्यासाठी पॉलियुरेथिन रेझिन डोमच्या आकारात वापरलं जातं. त्यामुळे गाडीचा तो भाग उठून दिसतो. आकर्षक रंगांमुळे तर ते आणखी उठावदार दिसते. एम्बॉस पेंटिंगमुळे चित्रं कसं वर आल्यासारखं दिसतं, तशीच शानदार आपली कारही आतून दिसते. क्लासिक स्ट्रिप्स या वेगवेगळया पद्धतीची ग्राफिक्स बनवणाऱ्या कंपनीच्या मते भारतात काही मॉडेलसाठीच डॅशबोर्ड ट्रिम उपलब्ध आहे. ही नवीनच संकल्पना येऊ पाहतीय. या कंपनीनेही दोनतीन महिन्यांपूवीर्च ऑटोग्राफिक्स या ब्रँडखाली हा क्लासी ट्रेंड आणला. तांत्रिकदृष्ट्याही हा प्रकार प्रगत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. सध्या वॉलनट बर्ल, कार्बन फायबर आणि रोझवूड असे प्रकार मिळतात. त्याची किंमतही पाच-सहाशे रुपयांपासून सुरू होते. कारचं मॉडेल आणि किती सजावट करायची आहे यावरून खिशाला कितीचा चाट बसणार ते ठरतं. इतक्या किमती गाडीसाठी आणखी थोडे हजार गेले तरी ते फुकट जात नाहीत, हे एकाहून एक ग्राफिक्स पाहिल्यावर वाटेल.

काही वर्षांपूवीर् वूड डॅश ट्रिम हे ब्रिटिश कारचं वैशिष्ट्यं होतं. हळूहळू डॅश ट्रिमचं लोण अमेरिकेतही पोहोचलं आणि अमेरिकी बनावटीच्या गाड्यांनाही हा साज चढू लागला. पण हा शृंगार काहीसा महागडा आणि वेळखाऊ होता. पण बदलत्या तंत्रज्ञानानं आता त्यातही सहजता आणलीय. याव्यतिरिक्त ग्राफिक्सचे इतर प्रकार आहेतच. आगीच्या ज्वाळा, भयानक चेटकीण, प्राणी ठसवणारे पेट्रोल लिड ग्राफिक्स असतात. हूड, छप्पर किंवा पॅनलवर वेगवेगळे प्राणी, चिन्हं, आकार आकर्षक रंगसंगतीत मिरवत असतात. कारच्या खिडक्या, छप्परासाठी तर वेगळी डिझाइन्स मिळतात. या सगळयात क्रिएटिव्हिटी अगदी ओसंडून वाहत असते. त्यात आता ग्राफिक्सचा हा नवा प्रकारही दाखल झालाय आणि त्याचं कलाप्रेमींकडून स्वागत होतंय.

- गौरी देशपांडे
December 2009
S M T W T F S
November 2009January 2010
1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 31