"INCREDIBLE INDIA"

THE MOMENT ONE UTTERS A WORD . HIS VIRTUES AND NOBILITY ARE ASCERTAINED ! - SANSKRIT

Subscribe to RSS feed

Posts tagged with "मराठी"

मराठी शायरी

भाऊसाहेब पाटणकरांची शायरी मानू आम्ही की इश्क अमुचा , त्यांनाच आहे समजला । नजरेतला भाव ज्यांना न पाहताही समजला ॥ कौशल्यही या अभिनयाचे काय मी सांगू तिच्या भावही या समजण्याचा वदनावरी नव्हता तिच्या! लपविली होती जरी का प्रणयार्तता मी आमुची । शालीनता सांभाळुनीही सम्मानिले आम्हा तिने। निखळत्या पदरास नाही स्पर्श केला तिने॥ संमती ज्या कुशलतेने होती तिने आम्हा दिली। कुशलतेने त्याच मीही जाहीर ना होऊ दिली॥ नुसतेच ना इश्कास आमुच्या ऐसे तिने सम्मानिले।आमुच्या अपुल्या स्वत:च्या शीलासही सम्मानिले॥ त्यांशी करावा इश्क ज्यांनी इश्कातही काही पुढे। ना टाकू दिले , पाऊलही त्याच्या पुढे॥ दोस्तहो , दुसर्या क्षणी तो इश्क आम्ही विसरलो। ऐसे जरी नव्हे , एकमेका विसरलो॥ आग आहे इश्क , उपमा काय दुसरी द्यायची। भेटूनियाही यात नसते राख होऊ द्यायची॥

Read more...

June 2013
S M T W T F S
May 2013July 2013
1
2 3 4 5 6 7 8
9 10 11 12 13 14 15
16 17 18 19 20 21 22
23 24 25 26 27 28 29