Skip navigation.

कवडसा

कॉपी-राईटेड!

October 2009

( Monthly archive )

’फायरवायर शो’ची अप्रतिम आतषबाजी

,

काल संध्याकाळी पुण्यात ’फायरवायर शो’ हा आतषबाजीचा कार्यक्रम झाला. ’सकाळ’ पेपर्सतर्फे खास दिवाळीनिमित्त याचं आयोजन करण्यात आलं होतं. आय.पी.एल., राष्ट्रकुल युवा स्पर्धा यांच्यात ज्यांनी आतषबाजी केली, त्यांचाच हा कारनामा होता.

संध्याकाळी सात नंतर ही आतषबाजी होणार असं जाहीर करण्यात आलं होतं. ठिकाण होतं डेक्कन बस स्टॉपमागचं मैदान. मी सात वाजता तिथं पोहोचलो तर गाडगीळ पुल (Z ब्रिज), भिडे पुल, लकडी पुल, नदीपात्रातले रस्ते, बालगंधर्व पुल हे सगळेच गर्दीनं खचाखच भरलेले. नशिबानं आम्हाला गाडगीळ पुलावर ऐन मोक्याची जागा मिळाली. साडे-सात वाजता आतषबाजी सुरु झाली, आणि वेगवेगळ्या रंगांची उधळण, पाहणाऱ्यांच्या तोंडुन "वाह..!","आहा!!","वॉव्व..!!" असे उद्गार, शिट्ट्या यांची सुद्धा उधळण सुरु झाली.

केवळ २० मिनिटे ही आतषबाजी सुरु होती. आणि जेव्हा संपली तेव्हा झाला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट!! :smile:

मी याचे काही फोटो काढले आहेत आणि ते इथं लावले आहेत. जरुर बघा.

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया!

, ,



लख-लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या...!

तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या तेजस्वी शुभेच्छा! :smile:

आज पासुन खरी दिवाळी सुरु झालीये. बऱ्याच जणांचं अभ्यंग स्नान झालेलं आहे, आणि फटाक्यांची प्रचंड आतषबाजी चालु आहे!
मी सुद्धा पहाटे पावणे-पाच वाजता उठलोय, आणि झटपट आवरुन, मस्तपैकी उटणं वगैरे लावुन झक्कास अभ्यंग स्नान उरकलं आहे. :smile:

आणि आता मित्र-मंडळींना दिवाळी शुभेच्छांचे एस.एम.एस. पाठवत बसलोय. थोड्यावेळानी फराळावर आडवा हात मारणार! P:

माझ्या मित्रमंडळींच्या मुलाखती

, , , ...

गोड गोड मॉर्निंग! :coffee:
मी मागच्या आठवड्यात माझ्या काही निवडक आणि नेहेमी संपर्कात असणाऱ्या काही निवडक मित्रमंडळींच्या मुलाखती घेतल्या होत्या. अशी मित्रमंडळी, ज्यांच्याशी जोडलेला असण्याचा मला भरपुर अभिमान आहे, त्यांना आपल्या ब्लॉगवर आणुया, त्यांच्याबद्दल कौतुकानी सांगावं असं मला मनापासुन वाटलं. प्रत्येकाची प्रत्यक्ष भेट घेणं मला शक्य नव्हतं म्हणुन मी त्यांना काही प्रश्न पाठवले होते. सगळ्यांनीच त्याला मनापासुन आणि मोकळेपणानी उत्तरं दिली आहेत. आता या पोस्ट पाठोपाठ मी एक-एक करुन त्यांची उत्तरं इथं टाकतोय. :up: या सगळ्यांनी जी उत्तरं दिली आहेत, ती तशीच्या तशी इथं टाकतोय... नो एडिटींग...


अशी ही अश्विनी!
भरभरुन भरत
सुस्साट सुनिता...
पंकास्टीक पंकज!
प्रयत्नशील प्रगती

:smile:
Download Opera, the fastest and most secure browser
December 2009
S M T W T F S
November 2009January 2010
1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 31