Skip navigation.

कवडसा

कॉपी-राईटेड!

December 2009

( Monthly archive )

STICKY POST

फळा

, ,

’गुलबावळ्या’ ही कथा, कथेतली पात्रं संपुर्णपणे काल्पनिक असुन, कोणा जिवंत/मृत व्यक्तीशी त्यात साध्यर्म आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

गुलबावळ्या - (प्रेम) प्रकरण १ले

गुलबावळ्या - (प्रेम) प्रकरण १ले

,


गुलबावळ्या. वय आजमितीस २७ च्या आस-पास.

आयुष्यातलं पहिलं प्रेम कधी केलं, ते आता काल-परत्वे आठवत नाहीये. बहुतेक ते शाळेतच असेल. असो. पण सांगण्याजोगी प्रेम प्रकरणं सुरु झाली हा कॉलेजला जायला लागल्यापासुन - सिनियर कॉलेज, टु बी मोअर स्पेसीफीक.

पहिलं प्रकरण घडलंय सात वर्षांपुर्वी... नाशिक इथं.
गुलबावळ्यानं नुकतीच ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतली होती. कॉलेजही नुकतंच सुरु झालेलं. पण हा गुलबावळ्या खरंच इतका बावळट आहे ना, की याला कोणती पोरगी का आवडेल, याचा नेम लागणं कठिणच. याला अनेक मुली आवडल्या. :heart: त्यातल्यांच एकीची ही कथा! (तसा आपला गुलबावळ्यासुद्धा काय दिसायला हिरो नाहीच!)

गुलबावळ्यानं लगेच ओळख करुन घेतली तिच्याशी. आडनावं अल्फाबेटीकली पाठोपाठची असल्यानं दोघंही एकाच प्रॅक्टीकल बॅचला. मग काय विचारता राव, गुलबावळ्याला तर आयतीच संधी मिळाली रोजच तिच्याशी बोलायची. अमृतासुद्धा तशी मनमिळाऊ होती. सो, या दोघांमध्ये गट्टी लगेचच जमली. लेक्चर मागुन लेक्चर होत होते, प्रॅक्टीकल मागुन प्रॅक्टीकल होत होते, आणि यांची गाडी हळुहळू पुढं सरकत होती. तरी कधी कधी ही पोरगी गुलबावळ्याला दगा द्यायचीच!

बऱ्याच वेळा असं घडलंय की गुलबावळ्या काहीतरी बोलायला जायचा, आणि ती चक्क याला उडवुनच लावायची.
"मुलींचा स्वभावच असा असतो, जरा सबुरीनं घ्यावं लागतंच आपल्याला..." गुलबावळ्याची अशाप्रसंगी ठरलेली कॉमेंट असायची ही.
"आपल्याला नाही! फक्त तुला...", आमचं त्यावर (ठरलेलंच) उत्तर.

असंच एकदा ’ती’नं ’या’ला उडवुन लावलं...
काहीतरी विचारायला म्हणुन (खरं तर हे निमित्तंच) गुलबावळयानं तिला पार्किंगमध्ये गाठलं. काहीतरी विचारलंसुद्धा..! (काय विचारलं ते काही आजतागायत गुलबावळ्यानं सांगितलं नाहीये आम्हाला.) पण तिनं लावलं उडवुन.. वरतुन बहुतेक काही ’सुविचार’सुद्धा ऐकवले. गुलबावळ्याचा चेहराच सगळं काही सांगत होता. एवढा गोंडस, गोड चेहरा.. पण आता तो ’थोबडा’ या कनिष्ठ कॅटेगरीमध्ये गेला होता.
पोरीनं गाडी सुरु केली आणि भुर्रर्रर्र...! :eyes:

पण हार मानेल तर गुलबावळ्या कसला तो! भाईंनी लागलीच प्रभासची गाडी घेतली आणि हे सुद्धा भुर्रर्रर्र तिच्यापाठोपाठ. थेट तिच्या घरापर्यंत ना!
पण घराजवळ पोहोचताच "भावी सासरेबुवां"चं दर्शन झाल्यावर मात्र स्वारी टरकली.. :yikes: यु-टर्न मारुन बॅक-टु-पॅव्हेलियन. मग परत कधी तिच्या पाठोपाठ घरी जायचा विचारसुद्धा केला नाही यांनी...

या प्रकारानंतर मात्र स्वारी जरा सुधारली.. खरं सांगायचं झालं तर त्यांनी लढाईचं मैदान बदललं. या अशा प्रकारे मुलीला पटवण्याऐवजी, तीची ’सेवा’ करुन जिंकु असा विचार त्यांनी केला. म्हणुन मग प्रत्येक प्रॅक्टीकलला तिच्या असाईनमेंट्स गुलबावळ्याच करायला लागला.
(टिपीकल पिक्चर सारखं..! आपण पाहिजे तर बॅकग्राऊंड म्युझीक लावुनच पुढचे काही सिन बघुया.)
ही बया कॉम्प्युटरसमोर बसुन ’माईन-स्वीपर’चा गेम खेळतेय..
गुलबावळ्या शेजारच्या कॉम्प्युटरवर बसुन प्रोग्राम करतोय..
झाल्यावर फ्लॉपीमध्ये कॉपीकरुन तीच्याकडं देतोय..
तिनं फ्लॉपी कॉम्प्युटरमध्ये टाकली, आणि ओपन केली..
पाहते तर काय! प्रोग्रॅम फाईलचा फक्त शॉर्टकटच कॉपी केलेला..
तिनं गुलबावळ्याला बदड-बदड बदडुन काढलाय..
आणि हा पठ्ठ्या.. हा मात्र बावचळुन बघतोय "ही असं काय करतेय आज???" :confused:
तीचा राग शांत झाल्यावर कळतं, प्रोग्रॅम निट गेला नाहीये फ्लॉपीमध्ये..
"हात्तीच्या, एवढंच ना?! देतो की मग परत कॉपी करुन!!"
आणि मग शेवटी हिरॉईनकडुन एक क्युटसं स्माईल..! :love:

गुलबावळ्या क्लासला मात्र कधीच गेला नाही. गरजच पडली नाही त्याला कधी. अभ्यासातही तो तेवढाच हुशार होता.
या सुद्धा ’फ्रंट’वर त्यानं लढाई सुरु केली होती. प्रोफेसरनी विचारलं काही, की गुलबावळ्याचा हात सगळ्यांत आधी वर.
उत्तरं सगळी बरोब्बर.. परफेक्ट..! अभ्यासातुन सुद्धा गुलबावळ्या तिला इंप्रेस करण्याच्या आटोकाट प्रयत्नात. आणि यात तो यशस्वीसुद्धा होत होता बरं!!

या पुढं मात्र गाडं काही हलेचना.. मुलगी काही केल्या गुलबावळ्याला पटेचना...
काय करावं? कसं करावं?? कधी करावं म्हणजे ही पटेल??? एक ना अनेक प्रश्न याच्या सुक्ष्म मेंदुमध्ये थैमान घालायला लागले.
बघता-बघता वर्ष संपत आलं, परिक्षा आल्या.

प्रॅक्टीकल आणि लेखी परिक्षेतही गुलबावळ्यानं तिला यथा बुद्धी, यथा हिम्मत मदत केली.
परिक्षा संपली.
"रिझल्टच्या दिवशी विचारायचंच." असं गुलबावळ्यानं पक्कं केलं.
रिझल्ट लागला, गुलबावळ्यानं आपला निकाल बघीतला. तिचा बघायचा खुप प्रयत्न केला, पण शिपायानं काही केल्या दाद लागु दिली नाही.
गुलबावळ्याची उत्कंठा तासा/मिनिटागणिक शिगेला पोचत होती.
दुपारी १ पासुन सुरु झालेलं निकाल वाटप, कॉलेज बंद व्हायची वेळ होत आली तरी हिरॉईनचा पत्ताच नाही! :frown:
कॉलेजमधल्या एका कट्ट्यावर गुलबावळ्या ठाण मांडुन वाट पहात बसुन होता. तिच्याकडुन भरपुर ’थॅंक्स’ स्विकारायचे होते त्याला.

शेवटच्या पाच मिनिटांमध्ये ही उगवली.. गुलबावळ्या लगबगीनं तिच्या पाठोपाठ गेला.
तिनं रिझल्ट घेतला, आणि मागे वळाली. तर स्वारी हसऱ्या चेहऱ्यानं समोरच उभी! :smile:
"कॉंग्रॅज्युलेशन्स!!", गुलबावळ्याच्या गोड(?) गळ्यातुन आवाज उमटला.
"मुर्ख.. तोंड काळं कर तुझं..", प्रेमळ प्रत्युत्तर.

अरे, पोरगी तर पार निकालात निघाली होती!! १२ पैकी ११ विषयांत नापास! Homer: Doh! फक्त इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रॅक्टीकलला पास. (कारण ती त्याच सरांकडं क्लासला जात होती.)

आणि या अशा परिस्थीतीमध्ये यांचे अभिनंदनाचे शब्द! मग आगीत तेल पडणारच ना?
प्रभास, महेश, पंकज आदी सगळ्या मित्रांनी तर गुलबावळ्याच्या ’क्षमते’वरच प्रश्न उपस्थीत करुन त्याला पिडायला सुरुवात केली.
"गुलबावळ्या, काही जमत नाही तुला."
"गुलबावळ्या, तुला साधं एका पोरीला पास करवेना? काय हे.."
"छेः लायकीच नाही तुझी गुलबावळ्या."
अशी सगळीच वाक्यं याला ऐकावी लागली.

"इतकी ’ढ’ असेल असं वाटलं नव्हतं रे... नाहीतर विचारच केला नसता हीचा..", इति गुलबावळ्या.
"छेः बुवा, नकोच असली ढ पोरगी आपल्याला.. बरं झालं मी हिला प्रपोज केलं नव्हतं ते!" असं आणि याच अर्थाची अजुन काही वाक्यं बोलत गुलबावळ्यानं स्वतःची समजुत काढली.

पण हा चाप्टर ’क्लोज’ केला इथंच.
वर्ष संपलं, एक स्टोरी संपली. rip

येऊ घातलेल्या स्टोरीबद्दल थोडेसे...

,

तर... मंडळी, आज दिवस-भरात स्टोरीचा पहिला भाग मी प्रकाशीत करतोय. :smile: (वेळ नक्की नाही!)

खरं तर मला काहीतरी ’सिरियस’ असं लिहायचं होतं.. पण ’सिरियसनेस’ हा माझा पिंड नसल्यानं मला त्यात काही फारसा रस वाटला नाही. शिवाय, मी या ब्लॉगची जी ’परंपरा’ (जी भव्य आणि दिव्य सुद्धा आहे - झेपायला ’भव्य’ आणि वाचायला ’दिव्य’) ठेवलीये - हलक्या फुलक्या लेखांची, ती मोडावीशी वाटली नाही मला... तुम्ही मनोरंजनासाठी वाचणार, आणि मी तुम्हाला मोकळेपणा द्यायचा सोडुन सिरियस करावं असं मला काही योग्य वाटेना. म्हणुन मग मी गंभीर काहीही लिहीण्याचा निर्णय फिरवला आणि हलकं-फुलकं लिहायचं ठरवलंय.

ही स्टोरी आहे एका मुलाची - गुलबावळ्याची. मी हेच नांव त्याला का दिलं ते तुम्हाला शेवटच्या भागात सांगेन. याची स्टोरी-लाईन सुरु होते कॉलेजपासुन, पण आता नोकरीला लागलाय तरी काही त्याला लगाम लागलेला नाहीये. कॉलेज म्हटलं की प्रेम-कथा आल्याच! अगदी बरोब्बर!! या सगळ्या स्टोऱ्या या गुलबावळ्याच्या प्रेम कथा आहेत! अनेक-वचन पाहुन चक्रावलात ना? मी सुद्धा चक्रावलोय. पण खरंच, याच्या २०+ लव-स्टोऱ्या आहेत...!!! आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे, या सत्य कथा आहेत नाहीत.

बाकी स्टोरीचे सगळे प्रोटोकॉल मागच्या पोस्टमध्ये दिल्याप्रमाणे आहेतच (निळा रंग वगैरे). आत्ता तेच टाईप करत बसलोय. टाईप करुन झालं की लगेचच प्रकाशीत करतोय स्टोरी नंबर १!

तोवर, थोडी अजुन कळ काढा.. प्लीज!!! (रविवारमुळं थोडा आळसावलोय हो आज.. त्यामुळं लेट होतंय, बाकी काही नाही.)

Download Opera, the fastest and most secure browser
December 2009
S M T W T F S
November 2009January 2010
1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 31