कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

११८


भयंकर, कडकडीत झालंय ऊन आता.. अगदी बाहेर पडवत नाही.. पण काय करणार..? awww कामं असली की ऊन काय आणि पाऊस काय.. जावं तर लागतंच!

पण बरं का, मला मात्र या वेळचं ऊन जरा चिवित्रच वाटतंय. sherlock या वेळचे चटके जरा वेगळेच बसत आहेत. खरंच!! अगदी जळजळीत चटका बसतोय. या आधी कसं (आधी म्हणजे आधीचे उन्हाळे - एप्रिल महिन्यातलं ऊन) शेक बसायचा फार फार तर.. पण यंदा...! यंदा तर अगदी त्या पॉपकॉर्नला वाटत असेल ना बनतांना, अगदी तसं होतंय..

उन्हात जर मी माझी ’ब्लॅकब्युटी’ लावली ना थोडा वेळ जरी, तरी असली तापते म्हणुन सांगु..
नको! राहु दे, नाहीच सांगत.. शेवटी ज्याची भाजते त्यालाच कळते.. o

माझ्या अंगात आधीच उष्णता फार आहे. त्यामुळं मला या गरमीचा भलताच त्रास होतोय. हाता-पायाची सालं निघायला लागलीत आता! cry
दिवसा त्रास तर होतोच, रात्री तर जास्तीच त्रास होतो. नुसती तळमळ होतेय माझी.. पण करणार काय? हात, पाय, तोंड अगदी गरम पडलेले असतात.
असो..

तुम्हाला नाही ना होतं काही त्रास या उन्हाळ्याचा??

’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ बघितला...कोकणवारी..

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies