Skip navigation.

कवडसा

कॉपी-राईटेड!

बंडु महाराजांची किर्ती .. एक पोवाडा

,

प्रस्तावना:
बंडु. माझ्या जवळच्या मित्रांपैकीच एक.
आम्ही बि.सी.एस.ला शेवटच्या वर्षाला होतो तेव्हा त्याची एक छोटीशी स्टोरी होती.
खुन्नसमुळं त्याची स्टोरी जास्ती पुढं नाही गेली. पण परिक्षेत बंडुनं शेरास-सव्वाशेर उत्तर देतं लढाई जिंकली.
त्याच्या याच पराक्रमाला सलाम म्हणुन हा लेख.
खरं तर हा लेख नाहीये. पोवाडा आहे.
ज्या वयात मी पोरींवर कविता करायला पाहिजे त्या वयात मी (कॉपी करुन) पोवाडा लिहीला आहे.
’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटातल्या पोवाड्याच्या धर्तीवर हा पोवाडा बनवलाय.
तुम्ही तो पोवाडा ऐकला असेल तर तीच चाल डोक्यात ठेवुन हा पोवाडा वाचा.. म्हणजे तुम्हाला मजा येईल. :smile:



महाराजांची..
बंडु महाराजांची किर्ती बेफाम होती..!
महाराजांची किर्ती बेफाम, भल्याभल्यांना फुटला घाम!
याला कोण घालीयेला कॉलेजी, पुसती बंडी बेगम..!

बंडी.. म्हणजे महाराजांच्याच कॉलेजमधली एक राणी बरं का!
नजरेत तिच्या अंगार, वर्ग झाला गप्पगार!
कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार!!

Read more...

१४३

मी अजुनही नियमीतपणे अनियमीत आहे ’कवडसा’वर. :D
तसा मी अधुन-मधुन इथं येऊनच जातो, पण या अशा अधल्या मधल्या खेपांना काहीच लिहीलं नाही. तसं खास काही घडलंच नाही ना!!
म्हणुन मग काहीच लिहीलं नाही. :frown:

बाकी तसं लाईफ पण एकदमच बोरींग चालु आहे. आज सकाळी भरतकडे जाणार होतो, पण काल रात्री साडे-अकरा वाजता ते रद्द केलं मी. आता उद्या संध्याकाळी जाईन म्हणतोय खरं.. पण बघु.

आज आय.पी.एल.ची दुसरी सेमी-फायनल आहे, ती बघायची आहे. मला वाटतं चेन्नई सुपर किंग्ज जाईल फायनलमध्ये. पण चेन्नई अगर बेंगळुरु कोणीही जावो, मला वाटतंय की हैदराबाद डेक्कन चार्जर्स जिंकतील यंदाची स्पर्धा. आय.पी.एल.ची फायनल कधी आहे? उद्या आहे का?
उद्या संध्याकाळी असेल तर मी घराबाहेर पडणारच नाही!! मज्जा असेल फुल्ल-टु फायनल मध्ये. :up:

हं...

आत्ता सुद्धा थोडा कंटाळाच आलाय. म्हणुन ’दे धक्का’, ’मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ’टिंग्या’ या मराठी चित्रपटांमधली गाणी ऐकत बसलोय. :whistle:

आला रे पाऊस आला!!

जस्ट आत्ताच जोराचा पाऊस सुरु झालाय पुण्यात... मी राहतो त्या भागात तर जास्तीच जोरात पडतोय..! :happy:
गडगडाट सुद्धा होतोय..
आज सकाळ पासुनच पावसाळी हवा होती, आणि दुपार पासुनच गडगडाट चालु होता.
आणि हो, मागच्या वेळेसारखं पोपट नाही केलाय यानं, तर धडपडतोय बदाबद... :smile:

जवळच वीज पडलीये नुकतीच..
:yikes:
Download Opera, the fastest and most secure browser
December 2009
S M T W T F S
November 2009January 2010
1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 31