Skip navigation.

कवडसा

कॉपी-राईटेड!

शेगांव ची ट्रिप...

,

शनिवार-रविवार आम्ही शेगांवला जाऊन आलो. शनिवारी सकाळी पावणे-आठ वाजता पुण्याहुन निघालो, आणि संध्याकाळी साडे-पाच वाजता तिकडं पोचलो. वाटेत रांजणगांव लागतं. तिथं महागणपतीचं दर्शन घेतलं आणि मग पुढं गेलो. शनिवारी संध्याकाळीच दर्शन घेण्याचं ठरलं. म्हणुन लगेचच आवरुन आम्ही मंदिरात दाखल झालो. आमचा अंदाज होता की सुट्टीमुळं भरपुर लोक असतील आलेले, आणि दर्शनाला बराच वेळ लागेल. भक्त निवासजवळ सुद्धा भरपुर गर्दी दिसत होतीच. पण गजानन महाराजांनी आमचा अंदाज साफ चुकवला! मंदिरात गेलो, ते थेट समाधीपाशीच.. अगदी निवांतपणानं दर्शन घ्यायला मिळालं आम्हाला. मनसोक्त दर्शन करुन मग महाराजांच्या गादीपाशी पोचलो. तिथं होती छोटीशी रांग, पण पटापट पुढं सरकत होती... समाधीचं दर्शन + गादीचं दर्शन असं सगळं अर्ध्या तासात उरकलं..! :up: आम्ही भरपुर वेळ जाईल असं गृहीत धरलेलं.. मात्र अगदीच कमी वेळेत सगळं पार पडलं! तेही अगदी मनसोक्तपणे... :happy:

आता तिथं भुयारी मार्ग केलाय थेट समाधीपर्यंत नेणारा. समाधीचं दर्शन घ्यायचं आणि मग उजव्या बाजुला असाल तर उजव्या बाजुच्या जिन्यानं, आणि डावीकडे असाल तर डाव्या बाजुच्या जिन्यानं वर यायचं. तिथुन मग गादीकडे. तिकडे सुद्धा थेट पादुका आणि गादीपाशी जाण्याऐवजी वरच्या मजल्यावरुन रांगेतुन यायचं आणि मग ति रांग बरोबर पादुका आणि गादीजवळुन फिरवण्यात आली आहे. एकदम शिस्तशीरपणे.. व्यवस्थीत.

दुसऱ्या दिवशी - म्हणजे रविवारी पहाटे लवकर उठुन आम्ही अभिषेकाला गेलो. पहाटे साडे-पाच पासुन सुरु होतात अभिषेक. आम्ही पाच वाजताच तिकडं जाऊन बसलो होतो. गुरुजी आले, आणि त्यांनी आतमध्ये बोलावल्यावर लगेचच आत जाऊन पादुकांच्या अगदी समोरच जाऊन बसलो. आदल्याच दिवशी केवड्याचं अत्तर घेऊन ठेवलं होतं. अभिषेकाच्या वेळी ते वापरलं गेलं.

मला सगळ्यात जास्ती काय आवडलं असेल तीकडं तर ती आहे स्वच्छता!!! काय स्वच्छ ठेवलाय सगळा परिसर सेवेकऱ्यांनी!!! :up: अप्रतीम!!!! जरा म्हणुन कुठे काही अस्वच्छ सापडत नाही.. अगदी व्यवस्थीतपणे चकाचक केलाय परिसर. थोड्यावेळ बसलो होतो मंदिराच्या आवारात, तेव्हा पाहिलं की एक सेवेकरी भाऊ हातात झाडु आणि केराचं सुप घेऊन उभा होता. जरा काही कचरा पडला, कागद पडला, कोणाचं काही सांडलं किंवा झाडाचा वाळलेला पाला जरी पडला तरी तो लगेचच झाडुनी ते उचलुन घ्यायचा. एवढ्याच समर्पीतपणे इतर सेवेकरीसुद्धा काम करत होते. आणि तो स्वच्छ परिसर, व्यवस्थीतपणा हे सगळे त्याचेच परिणाम होते. :smile: एक वयस्कर सेवेकरी भिंती पुसुन काढत होते ओल्या कपड्यानी.. म्हणजे संस्थानानी अगदी नीट विचार करुन कामं वाटली आहेत. भक्त निवासमध्ये सुद्धा हीच कथा. सगळ्या खोल्या स्वच्छ.. अगदी प्रत्येक मजल्याचे पॅसेजेस सुद्धा!! थोड्या-थोड्या वेळानी कोणी ना कोणी सेवेकरी ते झाडायचा तरी नाहीतर पाण्यानी पुसुन तरी काढायचा. एवढंच काय, प्रवाशांना रेल्वे स्टेशन आणि बस स्टॅंडवरुन आणणाऱ्या आणि पोहोचवणऱ्या बसेस सुद्धा स्वच्छ की!!

आनंद सागर इथं सुद्धा गेलो होतो. काय झक्कास जागा आहे ती!! अगदी अप्रतीम आहे. भरपुर फोटो काढले आहेत मी. इथं लावलेत त्यातले फोटो. (कवडसा > फोटो > आनंदसागर) तिथलं ध्यानमंदिर सुद्धा खुपच छान आहे. तिथं बसुन थोड्यावेळ ध्यान केलं. मस्त वाटतं तिकडं. त्या भागामध्ये आवाज नाही करु देत. ध्यान मंदिरात प्रवेश करण्याआधी तिथला सेवेकरी आपल्याला थांबवतो, आणि न बोलता "ध्यान मंदिरात आवाज करु नये. मोबाईल बंद ठेवावा." अशा अर्थाची एक पाटी समोर धरतो. २ मिनिटे ती पाटी पकडुन उभा राहतो आणि मगच आत सोडतो. :smile:

मस्त वाटलं त्या परिसरात फिरतांना. एकंदरीत ही ट्रिप छानच झालीये.

२३

,

गोड गोड मॉर्निंग!! :smile:

आज शुक्रवार. धावपळीचा एक आठवडा संपत आला. हो ना, या आठवड्यात जरा दगदगच झाली. असो.
उद्या आम्ही (म्हणजे घरची मंडळी) शेगांवला चाललो आहोत. तिकडचा ’आनंद सागर’ प्रकल्प खुप छान आहे म्हणतात. मी अजुन पाहिला नाहीये तो, यावेळी पाहीन. फोटो सुद्धा काढणार आहे. जाऊन आलो की इथं टाकेनच मी फोटो. :cool:

काल रात्री थोडावेळ ’एव्हरीथींग यु डिझायर’ वाचलं. आता उद्या प्रवासात वाचेन पुढे. साधारण दहा तासांचा प्रवास आहे, त्यामुळं भरपुर वेळ आहे मला पुस्तक वाचायला. आणि तंद्री लागलीच तर कदाचित प्रवासातच संपेल पुस्तक. :D

आज आमच्या ऑफिसमध्ये काही ’सरप्राईज’ कार्यक्रम आहेत २६ जानेवारी निमित्त. :wink: काही गाणीसुद्धा सादर होणार आहेत. काल जोरदार प्रॅक्टीस चालु होती गाणाऱ्यांची. शिवाय एक डॉक्युमेंट्रीसुद्धा दाखवण्यात येणार आहे. खरंतर कार्यक्रम आहे एक तासाचाच. पण एक तासाच्या मानानी खुपच जास्ती आखणी झालीये. म्हणजे साधारण दिड तासाचा तरी होणारच तो कार्यक्रम बहुतेक. मला काम आहे भरपुर. ते बऱ्यापैकी आवाक्यात आलं तरच जाईन मी या कार्यक्रमाला, अन्यथा नाही. बघुया कसं जमतंय ते.

आमच्या कंपनीचं एक ई-न्युजलेटर सुद्धा सुरु होतंय. त्यासाठी काही लेख, चित्र वगैरे गोळा करण्याची कामं सुद्धा चालु आहेत. मराठीमधुन सुद्धा काही चालणार आहे. कदाचित मी तिकडंही काही लिहायला लागेन. दर महिन्याला एक छोटासा लेख वगैरे काहीतरी. :cool:

चला, आता आवरतो. आज थोडं लवकर जायचं आहे ऑफिसला.

बाय बाय! टाटा!! काळजी घ्या!!! :up:

bye

’ऑपरेशन पुस्तक खरेदी’चा एक टप्पा पार...

,

काल शेवटी ऑपरेशन पुस्तक खरेदी चा एक टप्पा पार पडला. तीन पैकी एक गिफ्ट व्हाऊचर वापरुन ’एव्हरीथींग यु डिझायर’ हे पुस्तक आणलं. नॅशनल बेस्ट-सेलर आहे हे पुस्तक असं कळालं, म्हणुन मग तेच घेतलं. हर्शदीप जॉली यांनी लिहीलंय. कालच लगेच वाचायला सुरुवात केलीये. IIM मधल्या आयुष्यावर आहे हे पुस्तक. (मला वाटतं ’फाईव्ह पॉईंट समवन’ च्या धाटणीचं असावं हे पुस्तक.. ते IIT मधल्या आयुष्यावर होतं, हे IIM मधल्या आयुष्यावर.)

Q and A सुद्धा घ्यायचं होतं, पण त्याच्या प्रती संपल्या होत्या. :frown: या पुस्तकाचं नाव बदललं आहे म्हणे.. ’स्लमडॉग मिलेनियर’ असं झालंय आता. पुढच्या दोन-तीन दिवसांत मिळेल ते असं म्हणत आहेत. बघुया. ऑपरेशनच्या पुढच्या टप्प्यात ते घेईन. नक्की घेईन. :smile:
Download Opera, the fastest and most secure browser
December 2009
S M T W T F S
November 2009January 2010
1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 31