कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

Subscribe to RSS feed

’कवडसा’चे १ लाख वाचक पुर्ण झाले!

, , , ...

कळवण्यास अत्यंत आनंद होतोय की,
आज, दि. १७ मार्च २०१० रोजी माझा मराठी ब्लॉग ’कवडसा’चे १,००,००० वाचक पुर्ण झाले! smile

७४

आज तब्बल १० दिवसांच्या दांडीनंतर आलोय ब्लॉगवर. smile मध्यंतरी कामांमध्ये एवढा अडकलो होतो ना, की ब्लॉगकडं, वेबसाईटकडं आणि ट्विटरकडं सुद्धा बघायला फारसा वेळ मिळाला नाही मला. त्यातल्या-त्यात मोबाईलवरुन ट्विटरवर काही ट्विट्स टाकल्या - पण त्याही अगदीच थोड्या - बहुतेक दिवसाला एखादीच.

अजुनही म्हणावा तसा मोकळा झालेलो नाहीये, पण ब्लॉगवर लिहायला थोडा वेळ मिळाला आज, म्हणुन म्हटले हजेरी लावुनच जावे.

सध्या काही प्रोग्रॅमिंगचे प्रोजेक्ट्स, स.प. महाविद्यालयात एम.सी.एस.च्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट गाईडन्स, आणि अन्य काही महत्वाची कामं - असं सगळंच एकत्र चालु असल्यानं फुरसत तशी मिळत नाहीये. संध्याकाळी जरा मोकळा असतो मी, पण दिवसभर काम केलेलं असलं की परत लॅपटॉपसमोर बसायला नकोसं वाटतं, आणि मग मी दांडीच मारतो. bigsmile

बाकीचे सगळे उत्तम मध्यम सोडुन बरे चालु आहे माझे. तुमचं काय चालु आहे?

उद्या गुढीपाडवा आहे. आमच्याकडं त्याचीसुद्धा तयारी चालु आहे. smile

चला, येतो आता. पुढचं काम हाती घ्यायचं आहे.. ही... भलीमोठ्ठी रांग आहे कामांची माझ्यापुढं..! smile

ता.क. ’कवडसा’ची वाचक संख्या १ लाखाच्या जवळ पोहोचायला लागली आहे. सध्या ती ९८ हजारच्या घरात आहे. १ एप्रिलपुर्वीच १ लाख वाचक पुर्ण व्हावेत अशी इच्छा आहे, नाहीतर अगदी १ एप्रिललाच पुर्ण व्हायचे आणि मी सांगितल्यावर लोकांना वाटायचं की मी ’एप्रिल फुल’ करतोय. wink

जागतिक महिला दिनाच्या मनापासुन शुभेच्छा!

, ,

’कवडसा’च्या सर्व महिला वाचकांना
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
smile smile smile

आज मी सकाळी-सकाळीच माझ्या ओळखीच्या सगळ्या महिलांना शुभेच्छा देणारा एस.एम.एस. करुन टाकला. त्यात लिहीलं होतं:


Women! Without you we men are nothing..!
Happy Womens' Day!!



smile