Skip navigation.

कवडसा

कॉपी-राईटेड!

Posts tagged with "खट्याळ"

भरतचे ’आलु पराठे’

, , , ...

बि.सी.एस.च्या दुसऱ्या वर्षाला होतो तेव्हाचा किस्सा.

माझे आई-वडिल बाहेरगावी गेले होते. आणि याच संधीचा फायदा उठवायला आमची सगळी गॅंग माझ्या घरी पिक्चर बघायला जमली होती. त्यासाठी कॉलेजला दांडी मारलीच होती, ते काय सांगायला नकोच. :smile: तर, हा असा फक्कड प्लान असल्यानं आम्ही येतांनाच भरपुर सि.डी. आणल्या होत्या सोबत. एकामागुन एक पिक्चर बघण्याचा सपाटाच लावला होता.

थोड्यावेळानी मात्र आम्हाला सगळ्यांनाच भुक लागली. मी दिवसभर कॉलेजला असणार म्हणुन आईनं काहीच करुन ठेवलेलं नव्हतं घरात. त्यामुळं तर आमची अजुनच जास्ती पंचाईत झाली. काय करावं काही सुचत नव्हतं. मध्येच या भरतच्या डोक्यात आलं काहीतरी.. मला म्हणे, "प्रभास, घरात पोळीचं पीठ आणि बटाटे आहेत का?"
"हो, आहेत."
"काढ कणिक बाहेर, मी आलु पराठे बनवतो."
"येतात का तुला नक्की बनवता?"
"हो मग!"
म्हटलं, हा बाप्या एवढं आत्मविश्वासानी सांगतोय तर येत असतील.
भाऊ नी, कणिक भिजवली, ती मळली, त्याचबरोबर बटाटे उकडायला ठेवले. बटाटे उकडुन तयार होतायेत तोवर, साहेबांनी पराठे ’थापायला’ सुरुवात केली. ती ओली कणिक... पोळपाटाला चिटकत होती तशीच.. बघावं तर रावसाहेबांनी कणकेचा सगळा डब्बाच रिकामा केलेला! पराठे बनवतांना वापरायला म्हणुन कोरडी कणिकच उरली नव्हती!! :D

ते बटाटे सुद्धा या पठ्ठ्यानं पुर्ण उकडु दिले नाहीत. तसेच बाहेर काढले, त्यांचे काप केले आणि अक्षरशः हातानी ’पेरले’ त्या कच्च्या पराठ्यांमध्ये!

बाप रे!!! :yikes:

डोंबल्याचे ’आलु पराठे’.. भरपुर शिव्या पडल्या भरतला.. नाही तर काय?

तरी नशिब, पंकज आमच्या सोबत होता. आणि नशिब अजुनच बलवत्तर की त्याला खिचडी अगदी व्यवस्थीत (आणि हुकमीपणे) करता येत होती.
शेवटी पंकजनी तांदळाची खिचडी लावली, आणि आम्ही सगळे त्यावर तुटुन पडलो..!
भरतचे पराठे होतेच सोबत.. लोणच्यासोबत खायला.. :wink:

१०२

,

समजा, सगळे सॉफ्टवेअर अगदी स्वस्तात मिळायला लागले तर..? :idea:
म्हणजे बघा, आपण इमॅजिन करुन बघुया... :rolleyes:

अशी सगळीकडं सॉफ्टवेअरची दुकानं असतील...
समजा अप्पा बळवंत चौकात.

आपण ही कव्हर्स वाचत वाचत दुकानांमागुन दुकानं पालथी घालत फिरत असणार..

साड्यांच्या दुकानांमध्ये कशा नविन स्टाईलच्या साड्या बाहेर लटकवलेल्या असतात,
तसंच सॉफ्टवेअरच्या सिड्यांची कव्हर्स लटकवलेली असतील.. p:

आपण अशाच एखाद्या दुकानात जाऊ..
काऊंटरवर प्रचंड गर्दी असेल..

आपल्याला चान्स मिळाला की आपण हातातली पिशवी काखेत मारत त्या दुकानदाराला विचारणार..

"मायक्रोसॉफ्ट ऑफिस २०२० आहे का?"
"हो आहे ना!"
"कसं दिलंत??"
"५० रुपये एका कॉपीचे.."
"तो पलिकडचा दुकानदार तर ४५ ला देतो की.."
"तो फुल्ल इंस्टॉलेशन नाही देत.."
"ओके ओके.. चल मला पाच सेट दे.. आणि हो, नीट कागदात बांधुन दे.."
:lol:

लगेच तो दुकानदार एका ड्रॉवर मधुन पाच सिड्या बाहेर काढतो,
अगदी वाणी स्टाईलनी त्या कागदात गुंडाळतो,
त्यावर दोरा बांधतो आणि आपल्या सुपुर्त करतो.

आपण ते पुडकं पिशवीत टाकतो आणि घराच्या रस्त्याला लागतो.

हे असं झालं तर कसलं कॉमेडी वाटेल ना??
:wink: :D

९९

,

काल पुन्हा एकदा माझ्यातला मस्तीखोरपणा बाहेर उसळुन आला. पण या वेळी मी ’हायटेक’ मस्ती केलीये. :devil: :wink:

मी एक प्रोग्रॅम केलाय. गुगल-टॉकसाठीचं ’ऑटो-रिप्लाय टुल’. खरंतर त्याचा मुळ उद्देश असा की, तुम्ही कॉम्प्युटरपासुन दुर असाल, आणि कोणी तेव्हा तुम्हाला काही मेसेज पाठवला गुगल टॉकवर तर त्याला आपोआपच उत्तर जाईल.. तुम्ही आधीच ठरवुन ठेवलेलं उत्तर! :smile:

पण मी मात्र याच टुलचा वापर मस्तीसाठी केला. :smile: मी काय केलं, काल ऑफिसमधुन निघतांना माझ्या गुगल टॉकवर ते टुल सुरु करुन आलो. आणि त्यात ऑटो-रिप्लाय ठेवला "बोल ना!" कोणीपण मला त्यावर मेसेज टाकला, पिंग केलं तर त्या प्रत्येक मेसेजला "बोल ना!" हे एकच उत्तर जाणार... आपोआप. ते सुरु केलं आणि मी निघुन आलो. :D

काल रात्री मात्र मानसी, अमोल, आणि धन्या या जाळ्यात आयतेच सापडले. :D मला तर हसुच आवरत नाहीये! सगळ्यांची संभाषणं वाचुन..! इथं खालती दिलीत ही संभाषणं, ’Read more...’ वर क्लिक करा ती वाचण्यासाठी. :smile:

Read more...

December 2009
S M T W T F S
November 2009January 2010
1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 31