Skip navigation.

कवडसा

कॉपी-राईटेड!

Posts tagged with "आठवण"

एक गोष्ट रामाची...

,

राम वनवासात निघाला होता तेव्हाची ही गोष्ट.

राम, लक्ष्मण, सिता असे सगळे पायी चालले होते. वाटेत त्यांना एक नदी लागली. बरंच मोठ्ठं पात्र होतं त्या नदीचं. सहजा-सहजी पोहत जाऊन पार करण्यासारखं नव्हतं ते. राम आणि लक्ष्मण विचारात पडले, नदी पार जायचं कसं???

तेवढ्यात त्यांना एक नाव आणि नावाडी दिसला. त्यानं रामाला ओळखलं लगेच.
मग राम, लक्ष्मण, सीता हे सगळे त्या नावेत बसुन पलिकडच्या तीरावर निघाले.
नावाड्यानं वल्हवण्याचे एवढे कष्ट करुन आपल्याला या पैलतीरी आणलं, त्याबद्दल त्याला काहीतरी मोबदला दिला पाहीजे, असा विचार रामाच्या डोक्यात आला. रामानं सीतेला तशी खुण केली. सीतेनं लगेच आपल्या बोटातली अंगठी काढली आणि त्या नावाड्याला देऊ केली. नावाड्यानं ती नाकारली!
ते पाहुन राम त्याला (नावाड्याला) म्हणाला, "अरे, तुझी मजुरी आहे ती! मी कोणाचेही कष्ट असे फुकट स्विकारत नाही."
नावाडी विनम्रतेनं हात जोडुन म्हणाला, "प्रभु, नाव्ह्याकडुन नाव्ही घेत नाही, धोब्याकडुन दुसरा धोबीसुद्धा घेत नाही. ही मजुरी देऊन हा प्रघात मोडु नका.."

नावाड्याचं हे उत्तर ऐकुन रामासकट सगळेच विचारात पडले. नाव्ह्याकडुन नाव्ही घेत नाही हे ठिक आहे, धोब्याकडुन धोबी घेत नाही हे पण ठिक आहे, पण या नावाड्याचं आणि माझं काम एकच कसं???

थोडा वेळ विचार करुन शेवटी रामानं ठरवलं, या नावाड्यालाच विचारु काय ते स्पष्टीकरण.

तेव्हा नावाडी म्हणाला,
"नाव्ह्याकडुन नाव्ही घेत नाही, धोब्याकडुन दुसरा धोबीसुद्धा घेत नाही. ही मजुरी देऊन हा प्रघात मोडु नका..
प्रभु, तुम्ही माझ्या तीरावर आलात, मी तुम्हाला पलिकडच्या तीरावर आणलं.. जेव्हा मी तुमच्या तीरी येईन, तेव्हा तुम्ही मला पैलतीरी लावा!"

नावाड्याची हुशारी पाहुन राम अचंबीत तर झालाच, पण त्याच्यावर खुषपण झाला!!

- उत्तर भारतीय भजनावर आधारीत -

दंगा-मस्ती - क्रिकेटची...

, , , ...

काल भरतच्या रुमवर तो, धन्या आणि मी असं तिघं क्रिकेट खेळलो. :smile: कोणाचा तरी प्रोजेक्ट रिपोर्ट होता, ती आमची बॅट. आणि कागदाचा बोळा म्हणजे आमचा बॉल.. आणि आमचं क्रिकेट सुरु!! बऱ्याच दिवसांनी असं ’इन-डोअर क्रिकेट’ खेळलो! दंगामस्ती करत खेळलो आणि मी, भरत आणि धन्या - आम्ही तिघंही फ्लॅशबॅकमध्ये गेलो.

आम्ही जेव्हा बि.सी.एस.च्या तिसऱ्या वर्षाला होतो, तेव्हा टिळे सरांच्या क्लासवर दुपारी असंच क्रिकेट खेळायचो. बऱ्याचदा कॉलेजला दांडी मारलेली असायची. तिथुन निघुन थेट सरांच्या क्लासवरच टपकायचो आम्ही. मग कोणाचं तरी ’रायटींग पॅड’ आमचं बॅट बनायचं आणि सरांची बोर्ड पुसायची कापडं आमचा चेंडु तयार करायचे. सरांनी क्लास सांभाळायला ठेवलेला ललितसुद्धा असायचा आमच्या सोबत. नुसता धांगडधींगा चालायचा आमचा.

क्लासमध्ये प्रोग्रामींगची प्रॅक्टीस करण्यासाठी एक स्वतंत्र लॅब होती. तेच आमचं मैदान असायचं. कधी कधी काही पोरी तिथं प्रोग्राम करत बसलेल्या असायच्या.. पण आम्हाला कसलीच पर्वा नसायची.. कोणी तक्रार करेल वगैरे काही भितीच नाही ना!

सर यायच्या वेळी मात्र आम्ही सगळं परत जागच्या-जागी ठेवुन निमुटपणे प्रोग्राम करतोय असं दाखवायचो. टिळे सरांना घाबरायचो आम्ही सगळेच.

एकदा काय झालं, आम्ही असंच क्रिकेट खेळत होतो. कोण बॅटींग करत होतं आठवत नाही आता. एक मुलगी लॅब मध्ये प्रोग्राम करत बसली होती. शॉट मारतांना बॅट्समनच्या हातुन पॅड सटकलाच, आणि भिरभिरत गेला थेट ती पोरगी बसलेली त्या कॉम्प्युटरवरच! मुलगीतर वाचलीच थोडक्यात, कारण अन्यथा डोकं फुटलंच असतं तीचं, पण पॅड नेमके मॉनिटरच्या कोपऱ्यावर बसले. जरा अजुन अलिकडे बसले असते तर स्क्रीनचा नक्कीच चक्काचूर झाला असता! आणि मग हे क्रिकेट आम्हाला चांगलंच महागात पडलं असतं... पण वाचलो!

अगदी इंटरनल परिक्षेच्यावेळी सुद्धा आम्ही हे क्रिकेटायन सोडले नाही. पेपरच्या आधी आम्ही सगळे क्लासवर जमायचो. बाकीचे लोक तिथं अभ्यास करत बसलेले असायचे आणि आम्ही मात्र क्रिकेट खेळत असायचो. खुप एन्जॉय केलंय आम्ही हे असं ’इन-डोअर’ क्रिकेट.

तसं आम्ही ’आऊट-डोअर’ क्रिकेट सुद्धा भरपुर खेळलो आहोत, आणि त्याचे सुद्धा भरपुर मजेशीर किस्से आहेत.. पण ते नंतर सांगेन, पण नक्की सांगेन. :smile:

आज आहे १०वा कारगील विजय दिवस!

, ,

आज पासुन बरोब्बर १० वर्षांपुर्वी भारत आणि पाकिस्तान मधील कारगील युद्धाची सांगता झाली. भारतानं टायगर हिल परत आपल्या ताब्यात घेतलं आणि पाकिस्तानी सैन्यानं माघार घेतली. या विजयाच्या प्रित्यर्थ आणि या युद्धात देशासाठी लढतांना प्राण गमावलेल्या जवानांच्या स्मृतीत आजचा दिवस आपण ’कारगील विजय दिवस’ म्हणुन साजरा करतो.


सिमारेषेवर, डोळ्यांत तेल घालुन
आपल्या देशाचं संरक्षण करणाऱ्या
या जवानांना माझा
मनापासुन, अभिमानपुर्ण सलाम!!



या दिवसासंदर्भात मी हे काही फोटो गोळा केलेत इंटरनेट वरुन.


कारगील गाव.


पकिस्ताननं पाडलेलं भारतीय हवाई दलाचं विमान.


भारतीय हवाई दलानं ’टायगर हिल’वर हल्ला केला त्याची छायाचित्रं.


... आणि भारताचा झेंडा फडकला!


देशासाठी प्राण पणाला लावलेल्या जवानांच्या आठवणीत उभारलेली स्मृतीशिला.
Download Opera, the fastest and most secure browser
December 2009
S M T W T F S
November 2009January 2010
1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 31