Saturday, 17. October 2009, 01:11:43
आनंद, उत्साह, दिवाळी
लख-लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या...!
तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या तेजस्वी शुभेच्छा! 
आज पासुन खरी दिवाळी सुरु झालीये. बऱ्याच जणांचं अभ्यंग स्नान झालेलं आहे, आणि फटाक्यांची प्रचंड आतषबाजी चालु आहे!
मी सुद्धा पहाटे पावणे-पाच वाजता उठलोय, आणि झटपट आवरुन, मस्तपैकी उटणं वगैरे लावुन झक्कास अभ्यंग स्नान उरकलं आहे.

आणि आता मित्र-मंडळींना दिवाळी शुभेच्छांचे एस.एम.एस. पाठवत बसलोय. थोड्यावेळानी फराळावर आडवा हात मारणार!
Wednesday, 14. October 2009, 16:04:56
प्रभास, मैत्री, मजा, गप्पा
...
गोड गोड मॉर्निंग!
मी मागच्या आठवड्यात माझ्या काही निवडक आणि नेहेमी संपर्कात असणाऱ्या काही निवडक मित्रमंडळींच्या मुलाखती घेतल्या होत्या. अशी मित्रमंडळी, ज्यांच्याशी जोडलेला असण्याचा मला भरपुर अभिमान आहे, त्यांना आपल्या ब्लॉगवर आणुया, त्यांच्याबद्दल कौतुकानी सांगावं असं मला मनापासुन वाटलं. प्रत्येकाची प्रत्यक्ष भेट घेणं मला शक्य नव्हतं म्हणुन मी त्यांना काही प्रश्न पाठवले होते. सगळ्यांनीच त्याला मनापासुन आणि मोकळेपणानी उत्तरं दिली आहेत. आता या पोस्ट पाठोपाठ मी एक-एक करुन त्यांची उत्तरं इथं टाकतोय.

या सगळ्यांनी जी उत्तरं दिली आहेत, ती तशीच्या तशी इथं टाकतोय... नो एडिटींग...
अशी ही अश्विनी!भरभरुन भरतसुस्साट सुनिता...पंकास्टीक पंकज!प्रयत्नशील प्रगती
Wednesday, 14. October 2009, 15:58:45
गप्पा, मुलाखत, आनंद, कवडसा
आता मात्र सगळीकडंच "दिवाळी फिवर" दिसायला लागला आहे. बऱ्याच घरांमधुन फराळाचे वाससुद्धा बाहेर यायला लागले आहेत. मी सुद्धा या "दिवाळी फिवर"मध्ये बुडालोय. आमच्या घरी कालपासुनच कंदिल लागला आहे, उद्या दिवसभरात लाईटींगच्या माळा सुद्धा लागतील.

तुम्हाला आठवतं मी मागच्या वर्षी
माझ्या खास मित्र-मंडळींच्या मुलाखती घेतल्या होत्या, "दिवाळी स्पेशल" म्हणुन..?
या वर्षीसुद्धा अशाच मुलाखती घ्यायचा माझा विचार आहे. आणि हो! यंदा मात्र मी बऱ्यापैकी ओळखीच्या झालेल्या ३ विशेष लोकांची यासाठी निवड केली आहे.

ते तिघं कोण ते तुम्हाला कळेलंच लवकर.. म्हणजे जेव्हा त्यांच्या मुलाखती इथं प्रसिद्ध करेन तेव्हाच! तो पर्यंत मात्र तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल, आणि तुम्ही तो धराल (तो = धीर) याची मला खात्री आहेच! (न धरुन करणार काय तुम्ही?? मी इथं लिहील्याशिवाय थोडीच कळणार आहे तुम्हाला?)
कदाचित तुम्ही या मंडळींना ओळखत असालही.. किंवा नसालही ओळखत!

पण ओळखायला लागालच मग!!
मागच्या वेळेसप्रमाणेच या वेळी सुद्धा या मुलाखती विना-एडीटींग असणार आहेत, आणि या वेळी कदाचित त्यांचा फोटो सुद्धा असेल! मी तर एकदम उतावीळ झालोय त्यांच्या मुलाखती घ्यायला. त्यांतल्या एकाला तर मी प्रत्यक्ष भेटणारच आहे. अन्य दोघांना कामाच्या व्यग्रतेतुन वेळ किती मिळतो त्यावर अवलंबुन आहे. किंवा मग मागच्या वेळीप्रमाणे यांना ई-मेलने प्रश्न पाठवेन.

तेव्हा, वाट पाहत रहा, पुढच्या आठवड्यात कधीपण या मुलाखती प्रसिद्ध होतील.
[मला कल्पना आहे की माझा ब्लॉग काय एवढा पण भारी नाहीये, पण हा आपला माझा एक प्रयत्न आहे.

लोकं जोडण्याचं वेड लागलंय ना मला आजकाल!]
Showing posts 1 -
3 of 29.