Skip navigation.

कवडसा

कॉपी-राईटेड!

Posts tagged with "उनाड"

कंटाळा आलाय...

,

एक उनाड दिवस...

,

काल भरतच्या रुमवर गेलो होतो. ’प्रोजेक्टची काही कामं करु’ असं ठरलं होतं आमचं. त्यानुसार दुपारी त्याच्याकडं गेलो, मग जरावेळ काम केलं. म्हणजे काही कोड बदलले, काय-काय अजुन करायचं आहे त्याची उजळणी केली आणि मग गप्पा मारत बसलो. काम राहीलं बाजुलाच.

भरतचा रुम पार्टनर सुद्धा आला तेवढ्यातच. मग तो सुद्धा गप्पांमध्ये सामिल झाला. मध्येच निघालं पत्ते खेळुया. सगळ्यांनीच ही आयडिया उचलुन धरली. मग मी आणि भरतनी पटकन जाऊन जवळच्याच दुकानातुन पत्त्यांचा कॅट घेऊन आलो. "काय खेळावं?" हा प्रश्न लगेचच मिटवण्यात आला.. ’पाच-तीन-दोन’ खेळायचं ठरलं. मी आणि भरत तर बऱ्याच मोठ्ठ्या कालावधीनंतर खेळत होतो पत्ते! त्यामुळं पत्ते वाटतांना मी सगळेच वाटले. :D आणि बसलोय मग तिघंही हात करत.. प्रत्येकाचेच प्रमाणापेक्षा जास्ती हात. भरतची अवस्था तर माझ्यापेक्षाही दयनिय होती. तो तर बिचारा इस्पिक कोणता, किलवर कोणता, चौकट कोणता आणि बदाम कोणता ह्यातच गोंधळ घालत होता. :D संध्याकाळ पर्यंत खेळलो पत्ते.

मग आम्ही गेलो ’दुर्गा’वर.. कोल्ड कॉफी प्यायची ठरलं होतं.. पण आम्ही मयुर कॉलनीमधल्या दुकानात गेलेलो. तिकडं जरा गाडी लावायला नीट जागा तरी आहे. रामबाग कॉलनीमधल्या दुकानावर आधीच खुप गर्दी असते आणि शिवाय तिथं पार्किंगच्या जागेचे वांदेच होतात. मग ट्रॅफिक पोलिसची गाडी आली की धावाधाव.. त्यापेक्षा म्हटलं इकडंच जाऊ. शिवाय या दुकानात बसायला जागासुद्धा मिळते. आरामात बसुन, गप्पा मारत मारत त्या कोल्ड कॉफीचा आस्वाद घेतला. मला फार आवडते ही कोल्ड कॉफी. मला कोणी भरपुर कप जरी ऑफर केले ना, तरी ते प्यायला मागे-पुढे बघणार नाही मी. :smile:

कॉफी पिली, आणि मग निघालो आम्ही भटकायला. मयुर कॉलनीमधुन कर्वे रोडनी करिष्मा सोसायटी पर्यंत, तिथुन मेहेंदळे गॅरेज - डेक्कन - म.न.पा. - शिवाजी नगर - युनिवर्सिटी रोडनी पाषाण, तिथुन बावधन मार्गे चांदणी चौक.. भरतला चांदणी चौक बघायचा होता. म्हणुन मग तिकडं गेलो. तिथुन मग पौड रोडनी बालगंधर्व ला. भला मोठ्ठा राऊंड मारला आम्ही माझ्या ब्लॅक ब्युटीवरुन. :cool: हुश्श्श...!

बास्स.. एवढं सगळं केल्यावर हौस फिटलीच आमची. मग सरळ घरीच. पण दिवस मात्र घालवला अगदी उनाडपणे. :yes:

९४

, ,

संपला!!! हुर्रे!!!!!!!!! ढिंगटांग ढिटॅंग ढिंगटांग टिटॅंग..!!

संपला बुवा तो आठवडा एकदाचा..कसला दगदगीचा होता तो!! कामाचे ताण.. त्यातुनच उष्णता.. वैताग आलेला नुसता. तसा ऑफिसमध्ये दिवसभर ए.सी.मध्येच असतो. पण त्यामुळंच मग बाहेर आलं की जरा जास्तीच गरम वाटायला लागतं. या गेल्या आठवड्यात तर तापमानानी चांगलीच उसळी मारली आहे. रात्री हवा वाहती असली तरी ती अशी गरमच येणार.. झोप लागत नाही ना मग, जास्तीच गरमी असली की. :irked:

ऑफिसमधल्या कामांमध्ये तर या आठवडाभर इतका बिझी होतो की बास्स... जरा म्हणुन इकडं-तिकडं बघायला वेळ मिळत नव्हता. ब्लॉग लिहीणं तर दुरचीच गोष्ट. सकाळी उठायचं, आवरायचं आणि ऑफिसला जायचं.. दिवसभर भरपुर काम करायचं, रात्री घरी परतायचं.. जेवण करायचं आणि झोपायचं. एवढाच काय तो दिवसाचा उपक्रम. :mad:

पण अखेरीस तो आठवडा संपला! आता हा विक-एन्ड मात्र जबरदस्त एन्जॉय करणार मी!! मस्तपैकी झोप पुर्ण झाल्यावरच उठलोय. आरामात बसुन, पेपर वाचत-वाचत चहा पिलाय. :coffee: आता असंच आरामात आवरणार आहे. मग टि.व्ही. वर पिक्चर बघेन. :cool: क्रिकेटचा स्कोर पण बघेन अधुन-मधुन. दुपारी झक्कासपैकी झोपायचं!! संध्याकाळी बघु काय करायचं ते..

काल रामनवमी झाल्यामुळं सुंठवडा आहेच घरात. मला प्रचंड आवडतो तो. त्यामुळं आईनं भरपुरच बनवुन ठेवलाय. आज-उद्या पुरेल तो मला. येता-जाता त्यावर ताव मारणं चालुच आहे. :D शिवाय पन्हं आहे कैरीचं! माझ्या जिभेचे तर एकदमच लाड आहेत या विक-एन्डला!! वा व्वा व्व्वा!!! :happy:
Download Opera, the fastest and most secure browser
December 2009
S M T W T F S
November 2009January 2010
1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 31