Skip navigation.

Sign up | Lost password? | Help

कवडसा

कॉपी-राईटेड!

Posts tagged with "गप्पा"

’कवडसा’ वर येतेय एक कथा

, ,

नमस्कार,

गेले कित्येक दिवस मी इथं काही उत्स्फुर्त असं, काही जमवलेलं, काही मिळालेलं असं लिहीत आलोय. वाचकसंख्या बघता, आणि दिवसाला दिल्याजाणाऱ्या भेटींचा आकडा बघता तुम्हाला हा ब्लॉग आवडतोय असं मी (निर्लज्जपणे) गृहीत धरतोय. :D बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर मी जमेल तसं लिहीण्याचा प्रयत्न केला. कसं लिहीलं ते मला माहीत नाही, माहित करुनही घ्यायचं नाहीये. कारण, जे जे डोक्यात आलं ते ते मी इथं लिहीत गेलो. गेल्या काही महीन्यांपासुन (खरं सांगायचं तर माझा स्वतःचा व्यवसाय सुरु झाल्यापासुन) मला इथं लिहायला वेळ तसा फारसा मिळत नव्हताच. आज थोडा मिळाला, आणि मग मी ही मागची पोस्ट लिहीली.

पण आता कामातुन मिळणाऱ्या मोकळ्या वेळेत विरंगुळा म्हणुन, आणि माझ्याही डोक्याला थोडी चालना म्हणुन मी इथं एक कथा लिहायचं ठरवलंय. सगळी कथा काय माझ्या डोक्यात तयार नाहीये, त्यामुळं कथानक विणत-विणतच मला इथं लिहावं लागणार आहे. शिवाय हा माझा असला पहिला-वहीलाच प्रयत्न असल्यानं जरा जपुनच लिहीणार आहे. मला आत्ता या क्षणी अजिबात कल्पना नाहीये की ही कथा कशी असेल ती. पण शक्यतेवढा वास्तवतेचा "लुक ऍन्ड फील" द्यायचा माझा प्रयत्न असेल. (’वास्तव’ म्हटलंय, ’सत्य कथा’ नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

कथेला शिर्षक काय द्यायचं इथ-पासुन माझी सुरुवात आहे! हां, पात्रांसाठी मात्र मी फारसं डोकं लावणार नाहीये. आसपासच्याच व्यक्तींची नावं वापरणार आहे. :ko: (व्यवसायानं सॉफ्टवेअर ईंजीनीयर असल्यानं KISS - Keep It Simple Stupid! या उक्तीप्रमाणं सोप्पं सोल्युशन शोधलं आहे.) कथा बहुदा प्रथम-व्यक्तीमध्ये असेल - म्हणजेच कथेचं जे पात्र मध्यभागी आहे, त्याच्याच तोंडुन ती सांगितली जाईल. काही ठिकाणी मात्र निवेदक पात्र बदलेलही कदाचित, पण ते सगळं कथेतल्या घडामोडींवर आधारीत असेल.

याच आठवड्यात कथेला सुरुवात करण्याचा माझा मनसुबा आहे. देव करो आणि हे धनुष्य मला पेलवले जावो..! तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आणि पाठिंब्याची आणि प्रतिसादाचीसुद्धा अपेक्षा करतोय. (हा माझा आगाऊपणाच आहे, पण मला तो करायला आवडतो.)

तेव्हा आता आपली पुढली भेट थेट कथेसोबतच!

तुमचाच,
प्रभास गुप्ते

माझ्या मित्रमंडळींच्या मुलाखती

, , , ...

गोड गोड मॉर्निंग! :coffee:
मी मागच्या आठवड्यात माझ्या काही निवडक आणि नेहेमी संपर्कात असणाऱ्या काही निवडक मित्रमंडळींच्या मुलाखती घेतल्या होत्या. अशी मित्रमंडळी, ज्यांच्याशी जोडलेला असण्याचा मला भरपुर अभिमान आहे, त्यांना आपल्या ब्लॉगवर आणुया, त्यांच्याबद्दल कौतुकानी सांगावं असं मला मनापासुन वाटलं. प्रत्येकाची प्रत्यक्ष भेट घेणं मला शक्य नव्हतं म्हणुन मी त्यांना काही प्रश्न पाठवले होते. सगळ्यांनीच त्याला मनापासुन आणि मोकळेपणानी उत्तरं दिली आहेत. आता या पोस्ट पाठोपाठ मी एक-एक करुन त्यांची उत्तरं इथं टाकतोय. :up: या सगळ्यांनी जी उत्तरं दिली आहेत, ती तशीच्या तशी इथं टाकतोय... नो एडिटींग...


अशी ही अश्विनी!
भरभरुन भरत
सुस्साट सुनिता...
पंकास्टीक पंकज!
प्रयत्नशील प्रगती

:smile:

यंदाचं "दिवाळी स्पेशल"...

, , ,

आता मात्र सगळीकडंच "दिवाळी फिवर" दिसायला लागला आहे. बऱ्याच घरांमधुन फराळाचे वाससुद्धा बाहेर यायला लागले आहेत. मी सुद्धा या "दिवाळी फिवर"मध्ये बुडालोय. आमच्या घरी कालपासुनच कंदिल लागला आहे, उद्या दिवसभरात लाईटींगच्या माळा सुद्धा लागतील. :smile:

तुम्हाला आठवतं मी मागच्या वर्षी माझ्या खास मित्र-मंडळींच्या मुलाखती घेतल्या होत्या, "दिवाळी स्पेशल" म्हणुन..?
या वर्षीसुद्धा अशाच मुलाखती घ्यायचा माझा विचार आहे. आणि हो! यंदा मात्र मी बऱ्यापैकी ओळखीच्या झालेल्या ३ विशेष लोकांची यासाठी निवड केली आहे. :smile: ते तिघं कोण ते तुम्हाला कळेलंच लवकर.. म्हणजे जेव्हा त्यांच्या मुलाखती इथं प्रसिद्ध करेन तेव्हाच! तो पर्यंत मात्र तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल, आणि तुम्ही तो धराल (तो = धीर) याची मला खात्री आहेच! (न धरुन करणार काय तुम्ही?? मी इथं लिहील्याशिवाय थोडीच कळणार आहे तुम्हाला?)

कदाचित तुम्ही या मंडळींना ओळखत असालही.. किंवा नसालही ओळखत! :smile: पण ओळखायला लागालच मग!!
मागच्या वेळेसप्रमाणेच या वेळी सुद्धा या मुलाखती विना-एडीटींग असणार आहेत, आणि या वेळी कदाचित त्यांचा फोटो सुद्धा असेल! मी तर एकदम उतावीळ झालोय त्यांच्या मुलाखती घ्यायला. त्यांतल्या एकाला तर मी प्रत्यक्ष भेटणारच आहे. अन्य दोघांना कामाच्या व्यग्रतेतुन वेळ किती मिळतो त्यावर अवलंबुन आहे. किंवा मग मागच्या वेळीप्रमाणे यांना ई-मेलने प्रश्न पाठवेन. :smile:

तेव्हा, वाट पाहत रहा, पुढच्या आठवड्यात कधीपण या मुलाखती प्रसिद्ध होतील.

[मला कल्पना आहे की माझा ब्लॉग काय एवढा पण भारी नाहीये, पण हा आपला माझा एक प्रयत्न आहे. :smile: लोकं जोडण्याचं वेड लागलंय ना मला आजकाल!]
November 2009
S M T W T F S
October 2009December 2009
1 2 3 4 5 6 7
8 9 10 11 12 13 14
15 16 17 18 19 20 21
22 23 24 25 26 27 28
29 30