Skip navigation.

कवडसा

कॉपी-राईटेड!

Posts tagged with "प्रभास"

माझ्या मित्रमंडळींच्या मुलाखती

, , , ...

गोड गोड मॉर्निंग! :coffee:
मी मागच्या आठवड्यात माझ्या काही निवडक आणि नेहेमी संपर्कात असणाऱ्या काही निवडक मित्रमंडळींच्या मुलाखती घेतल्या होत्या. अशी मित्रमंडळी, ज्यांच्याशी जोडलेला असण्याचा मला भरपुर अभिमान आहे, त्यांना आपल्या ब्लॉगवर आणुया, त्यांच्याबद्दल कौतुकानी सांगावं असं मला मनापासुन वाटलं. प्रत्येकाची प्रत्यक्ष भेट घेणं मला शक्य नव्हतं म्हणुन मी त्यांना काही प्रश्न पाठवले होते. सगळ्यांनीच त्याला मनापासुन आणि मोकळेपणानी उत्तरं दिली आहेत. आता या पोस्ट पाठोपाठ मी एक-एक करुन त्यांची उत्तरं इथं टाकतोय. :up: या सगळ्यांनी जी उत्तरं दिली आहेत, ती तशीच्या तशी इथं टाकतोय... नो एडिटींग...


अशी ही अश्विनी!
भरभरुन भरत
सुस्साट सुनिता...
पंकास्टीक पंकज!
प्रयत्नशील प्रगती

:smile:

माझी वेबसाईट!

, ,

आजपासुन माझी स्वतःची वेबसाईट सुरु झालीये!! :up: www.prabhasgupte.com असा पत्ता आहे.

कालच मी वेब सर्वर वर जागा विकत घेतली, डोमेन-नेमसुद्धा नोंदवलं आणि काल रात्रीतच संपुर्ण वेबसाईट पुर्ण केलीये. मग सर्वरवर अपलोड करुन चाचणी घेतली, कुठे काही गडबड नाहीये ना याची.

हि वेबसाईट सुरु करण्यामागे बरेच हेतु आहेत. या ब्लॉगवरुन माझं अस्तित्व तसं आहेच इंटरनेट वर, पण एक व्यावसायिक अस्तित्वसुद्धा आता तयार झालंय या साईटच्या रुपानं. शिवाय माझ्या कामाची ओळख तयार व्हावी, व्यावसायिक संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी सुद्धा हि साईट कामी यावी अशी माझी अपेक्षा आहे. आत्ता ही साईट अगदी प्राथमिक स्वरुपाची माहीती देते आहे माझ्याबद्दल. पण लवकरच ती माझ्या कामाबद्दल सुद्धा माहिती द्यायला सुरुवात करेल. माझे काही ऑन-लाईन प्रोजेक्ट्ससुद्धा मी तिथं लावणार आहे, जेणेकरुन भेट देणाऱ्यांना अगदी व्यवस्थीत कल्पना येईल मी नक्की काय, आणि कसं काम करतो याची. :smile:

अवश्य भेट द्या, आणि तुमचं काय मत आहे ते सुद्धा कळवा! :smile:

८०

,


आज सकाळचीच घटना.

मी काही कामानिमीत्त बाहेर चाललेलो.
वाटेत सिग्नल लागला म्हणुन थांबलो.
माझ्या पुढं बऱ्याच गाड्या होत्या.. दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी.

थोड्याच वेळात माझं लक्ष माझ्या पुढ्यातल्या गाडीवाल्याकडं गेलं.. "अरे! हा तर पंकज आहे की!!"
पंकज, माझा एम.सी.एस. मधला मित्र. आता नगरला असतो.
म्ह्टलं, हा पठ्ठ्या पुण्यात आलाय, गाडीवरुन भटकतोय चांगला आणि मला फोन पण नाही केला माठ्यानं..
म्हणुन मग त्याचं लक्ष वेधुन घ्यायला मी हॉर्न वाजवला गाडीचा.

एकदा... दोनदा.. तरी काही त्याचं लक्ष जाईना/येईना माझ्याकडं.. :worried:

मग मी अजुनच जोरजोरात हॉर्न वाजवला. तरी नाहीच!! काय बहीरट आहे यार हा..

पण झालं काय, त्याच्या ऐवजी त्याच्या आजुबाजुचेच लोक मागे वळुन बघायला लागले. वैतागले ना ते माझे हॉर्न ऐकुन ऐकुन! :mad: :irked:
मी त्यांतल्याच एकाला खुणेनं सांगितलं, "जरा त्याला बोलवा हो.." आणि त्यांनी बोलावलं..

त्या व्यक्तीनं मागे वळुन पाहीलं तर खरं... पण माझा तर पोपटच झाला की!! तो पंकज नव्हताच!!!!! :no:

पंकजसारख्या शरीरयष्टीचा दुसराच कोणीतरी होता.. आयला.. असला मोठ्ठा पचका झाला म्हणुन सांगु!!! :o:

नशीब, तेवढ्यातच सिग्नल सुटला म्हणुन.. नाहीतर आजुबाजुच्या लोकांनी माझं लोणचंच घातलं असतं..
Download Opera, the fastest and most secure browser
November 2009
S M T W T F S
October 2009December 2009
1 2 3 4 5 6 7
8 9 10 11 12 13 14
15 16 17 18 19 20 21
22 23 24 25 26 27 28
29 30