Skip navigation.

कवडसा

कॉपी-राईटेड!

Posts tagged with "ब्लॉग"

माझ्या मित्रमंडळींच्या मुलाखती

, , , ...

गोड गोड मॉर्निंग! :coffee:
मी मागच्या आठवड्यात माझ्या काही निवडक आणि नेहेमी संपर्कात असणाऱ्या काही निवडक मित्रमंडळींच्या मुलाखती घेतल्या होत्या. अशी मित्रमंडळी, ज्यांच्याशी जोडलेला असण्याचा मला भरपुर अभिमान आहे, त्यांना आपल्या ब्लॉगवर आणुया, त्यांच्याबद्दल कौतुकानी सांगावं असं मला मनापासुन वाटलं. प्रत्येकाची प्रत्यक्ष भेट घेणं मला शक्य नव्हतं म्हणुन मी त्यांना काही प्रश्न पाठवले होते. सगळ्यांनीच त्याला मनापासुन आणि मोकळेपणानी उत्तरं दिली आहेत. आता या पोस्ट पाठोपाठ मी एक-एक करुन त्यांची उत्तरं इथं टाकतोय. :up: या सगळ्यांनी जी उत्तरं दिली आहेत, ती तशीच्या तशी इथं टाकतोय... नो एडिटींग...


अशी ही अश्विनी!
भरभरुन भरत
सुस्साट सुनिता...
पंकास्टीक पंकज!
प्रयत्नशील प्रगती

:smile:

मेरा ब्लॉग १३ पार हो गया!!

, , , ...

शनिवार किंवा रविवारमधे या ब्लॉगला भेट देणाऱ्यांचा आकडा १३०००च्या पार गेला! :hat: आत्ता हि पोस्ट लिहितांना तो आहे १३०८३...!
मी जसजसा लिहित जातोय इथं तसतसा भेट देणाऱ्यांचा आकडापण पटापट वाढत चाललाय... एकदम फास्टात!! :yes:


खरंतर नुकतेच म्हणजे १७ ऑक्टोबरला ’कवडसा’ला भेट देणाऱ्यांचा आकडा १२०००ला टेकला होता. आणि पुढच्या २२-२३ दिवसांतच १३०००ला!

मला आठवतंय (तसं आठवायची गरज नाहीये म्हणा, मागच्या पोस्ट पाहिल्या तरी कळतं.) मी सचिन तेंडुलकरशी स्पर्धा लावली होती, कोण आधी १२००० गाठतो ते... अर्थातच सचिनच जिंकला होता ती.. पण त्याच दिवशी ब्लॉगनी पण १२००० गाठलेच. पण आता मात्र ’कवडसा’नी सचिनला बराच मागे टाकलाय. :D :lol:

मला माहित नाही, तुम्हाला माझा ब्लॉग आवडतो की नाही, आवडतो तर किती आवडतो ते... पण मी लिहितो. जसं जमेल तसं लिहितो. म्हणतात ना "हजारो मैलांचा प्रवास एका पावलानी सुरु होतो", अगदी तसंच.. तसंच मी पण हा प्रवास सुरु केलाय. आणि तो चालुच राहिल! जसजसा काळ पुढे सरकेल, तसतसा ब्लॉग अजुन परिपक्व होत जाईल.. कारण माझे विचार, माझी कल्पनाशक्ती तेवढी परिपक्व होत जाईल. या ब्लॉगवर अजुन बऱ्याच नविन-नविन कल्पना अंमलात आणण्याचा माझा विचार चालु आहे, फक्त वेळ थोडा कमी पडतोय. एकदाचं ते काम झालं म्हणजे हा ब्लॉग परत एकदा कात टाकेलच!

पण तोपर्यंत आणि तिथुन पुढेही मला तुमचा पाठिंबा, तुमचं कौतुक, तुमचं प्रोत्साहन पाहिजेच आहे! तेच तर माझं इंधन आहे ना!!
तुमचा भेटींचा ओघ असाच चालु राहु द्या... हिच विनंती. :smile:

bye

मी फ्रिझलोय..

, , , ...

hi

इकडं ऑफिसमधे ए.सी. एकदम फास्टात रनतय. अगदी हिल-स्टेशनच झालंय इथं.:yikes: किती आहे तापमान काय माहीत.. awww

काडकाड-कुडकुड वाजतोय मी आख्खाच! हाताची बोटं पण गारठुन गेलीयेत. काही टाईपताच येत नाहीये मला. म्हणजे टाईपतो तर आहे मी, पण बड्या मुश्किलीनी टाईपतोय. थरथर हालताहेत बोट.. महत-प्रयासानी मी त्यांना कि-बोर्डाच्या बटनांवर नेतोय आणि तेवढ्याच कष्टानी ती बटनं प्रेसतो पण आहे. Homer: Doh!

खरंतर माझा टाईपायचा स्पीड एकदम डेंजर आहे. कोणीच माझा हात धरु नाही शकत त्यात. (धरले तर पायच धरतात.. "बाबा रे, तुझा स्पीड जरा कमी कर, म्हणजे चुकापण कमी होतील." :D) पण या गारव्यानी मला पार गार करुन टाकलाय. कॉफी घेउ म्हटलं तर इथं डेस्कला ब्रिंगेपर्यंतच थंडगार होते आहे. :frown: मग ती ’कोल्ड कॉफी’ समजुन ड्रिंकावी लागतेय मला. :cry:

अगदीच फ्रिझुन गेलोय हो मी... अगदी म्हणजे त्या अलास्का नाहीतर थेट उत्तर किंवा दक्षिण धृवावर ऑफिस आहे असं वाटतय मला. नेमकं आजच जॅकिट घरी फोरगॉटुन यायचं होतं मला... :insane:

बघुया काय होतं ते.. काही सुधरतंय का तापमान बघतो... तो पर्यंत आहेच काडकाड - कुडकुड!

bye
Download Opera, the fastest and most secure browser
December 2009
S M T W T F S
November 2009January 2010
1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 31