Skip navigation.

कवडसा

कॉपी-राईटेड!

Posts tagged with "मजा"

माझ्या मित्रमंडळींच्या मुलाखती

, , , ...

गोड गोड मॉर्निंग! :coffee:
मी मागच्या आठवड्यात माझ्या काही निवडक आणि नेहेमी संपर्कात असणाऱ्या काही निवडक मित्रमंडळींच्या मुलाखती घेतल्या होत्या. अशी मित्रमंडळी, ज्यांच्याशी जोडलेला असण्याचा मला भरपुर अभिमान आहे, त्यांना आपल्या ब्लॉगवर आणुया, त्यांच्याबद्दल कौतुकानी सांगावं असं मला मनापासुन वाटलं. प्रत्येकाची प्रत्यक्ष भेट घेणं मला शक्य नव्हतं म्हणुन मी त्यांना काही प्रश्न पाठवले होते. सगळ्यांनीच त्याला मनापासुन आणि मोकळेपणानी उत्तरं दिली आहेत. आता या पोस्ट पाठोपाठ मी एक-एक करुन त्यांची उत्तरं इथं टाकतोय. :up: या सगळ्यांनी जी उत्तरं दिली आहेत, ती तशीच्या तशी इथं टाकतोय... नो एडिटींग...


अशी ही अश्विनी!
भरभरुन भरत
सुस्साट सुनिता...
पंकास्टीक पंकज!
प्रयत्नशील प्रगती

:smile:

६७

, ,


सकाळी उशीरा उठणं.. :happy: त्या आधीच जाग आलेली असते, तरी पण लोळत पडणं... p:

मग सावकाश, पेपर चाळत चाळत चहा पिणं... :coffee:

आरामात बसुन टि.व्ही. पाहणं... :whistle:

आंघोळीच्या पाण्याची बादली भरली की मग शिस्तीत आंघोळीला जाणं... :wink:

सगळं उरकुन परत टि.व्ही. समोर बसुन भारत-न्युझीलंड क्रिकेट मॅच पहात बसणं..
सोबत "सही!!", "अरेरे...", "व्वा!!", "झक्कास!" असे काहीसे उद्गार काढत राहणं.. :up:

भारतानी उभारलेल्या मोठ्ठा धावसंख्येचं तोंड भरुन कौतुक करणं.. :hat:

पण न्युझीलंड सुद्धा धुलाई करतंय.. Homer: Doh! छे!! आपल्या टिममध्ये काही दमच नाहीये... :down:
या आणि अशाच अन्य काही ’एक्स्पर्ट कॉमेंट्स" देणं..

तोवर स्वयंपाक घरातुन शिजलेल्या मटणाचा वास हवेतुन तरंगत तरंगत नाकात शिरायला लागतोच! :chef:

आणि मग त्या मटणावर तुटुन पडणं... :yes:

जेवणानंतर मस्त मसाला पान खाणं..

आणि परत मॅच लावणं.. अरे व्वा! झटक्यात चार विकेट्स गेल्यात की!!! :happy:

परत मुड बनवुन टि.व्ही. समोर, पुन्हा एकदा...!

मॅच भारताकडेच आहे, ...पण नाही, किवींना सुद्धा चान्स आहे.. कडवा प्रतिकार.. आपण हरणार बहुतेक..
..नाही!! जिंकलो बुवा एकदाचं.. :lol:

बास्स!! आता संध्याकाळी मित्रांसोबत चकाट्या पिटायच्या..! :wink:

याहुन चांगला रविवार कसा असतो?

शुक्रवार.. १३ तारिख!

, , ,

आज शुक्रवार.. आणि १३ तारीख! :eyes:

हे कॉम्बीनेशन तसं जरा कुप्रसिद्धच आहे जगभरात. आणि त्यासाठी बरीच कारणं दिली जातात. :smile:

तुम्हाला माहीत आहे, शुक्रवार-१३ तारिख या जोडीची भिती वाटणं हा एक प्रकारचा फोबिया आहे ते? हो खरंच..
त्याला "पॅरास्काविडेकात्रीआफोबिया" असं म्हणतात. (शब्द सुद्धा तसंलाच भयानक आहे.)

"पॅरास्केवी" म्हणजे शुक्रवार, "डेकात्रीस" म्हणजे तेरा, आणि "फोबिया" म्हणजे भिती, या तीन शब्दांचं एकत्रीकरण आहे तो शब्द.


आजच्याच दिवसाचा एक खास कॉम्प्युटर वायरस सुद्धा आहे, पण आता जगातले सगळे ऍंटी-वायरसेस त्याची नीट काळजी घेतात. :smile:

एकंदरीतच या दिवसाला बऱ्याच लोकांनी अगदी वाळीतच टाकलाय. P:

असो. तुम्ही सांभाळुन रहा, न जाणो काही झालेच आज तर??? :devil:

आणि हो! अजुन दोन "फ्रायडे द १३" झेलायचे आहेत तुम्हाला!
Download Opera, the fastest and most secure browser
December 2009
S M T W T F S
November 2009January 2010
1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 31