Skip navigation.

कवडसा

कॉपी-राईटेड!

Posts tagged with "मस्ती"

माझ्या मित्रमंडळींच्या मुलाखती

, , , ...

गोड गोड मॉर्निंग! :coffee:
मी मागच्या आठवड्यात माझ्या काही निवडक आणि नेहेमी संपर्कात असणाऱ्या काही निवडक मित्रमंडळींच्या मुलाखती घेतल्या होत्या. अशी मित्रमंडळी, ज्यांच्याशी जोडलेला असण्याचा मला भरपुर अभिमान आहे, त्यांना आपल्या ब्लॉगवर आणुया, त्यांच्याबद्दल कौतुकानी सांगावं असं मला मनापासुन वाटलं. प्रत्येकाची प्रत्यक्ष भेट घेणं मला शक्य नव्हतं म्हणुन मी त्यांना काही प्रश्न पाठवले होते. सगळ्यांनीच त्याला मनापासुन आणि मोकळेपणानी उत्तरं दिली आहेत. आता या पोस्ट पाठोपाठ मी एक-एक करुन त्यांची उत्तरं इथं टाकतोय. :up: या सगळ्यांनी जी उत्तरं दिली आहेत, ती तशीच्या तशी इथं टाकतोय... नो एडिटींग...


अशी ही अश्विनी!
भरभरुन भरत
सुस्साट सुनिता...
पंकास्टीक पंकज!
प्रयत्नशील प्रगती

:smile:

९९

,

काल पुन्हा एकदा माझ्यातला मस्तीखोरपणा बाहेर उसळुन आला. पण या वेळी मी ’हायटेक’ मस्ती केलीये. :devil: :wink:

मी एक प्रोग्रॅम केलाय. गुगल-टॉकसाठीचं ’ऑटो-रिप्लाय टुल’. खरंतर त्याचा मुळ उद्देश असा की, तुम्ही कॉम्प्युटरपासुन दुर असाल, आणि कोणी तेव्हा तुम्हाला काही मेसेज पाठवला गुगल टॉकवर तर त्याला आपोआपच उत्तर जाईल.. तुम्ही आधीच ठरवुन ठेवलेलं उत्तर! :smile:

पण मी मात्र याच टुलचा वापर मस्तीसाठी केला. :smile: मी काय केलं, काल ऑफिसमधुन निघतांना माझ्या गुगल टॉकवर ते टुल सुरु करुन आलो. आणि त्यात ऑटो-रिप्लाय ठेवला "बोल ना!" कोणीपण मला त्यावर मेसेज टाकला, पिंग केलं तर त्या प्रत्येक मेसेजला "बोल ना!" हे एकच उत्तर जाणार... आपोआप. ते सुरु केलं आणि मी निघुन आलो. :D

काल रात्री मात्र मानसी, अमोल, आणि धन्या या जाळ्यात आयतेच सापडले. :D मला तर हसुच आवरत नाहीये! सगळ्यांची संभाषणं वाचुन..! इथं खालती दिलीत ही संभाषणं, ’Read more...’ वर क्लिक करा ती वाचण्यासाठी. :smile:

Read more...

म्हणुन बॉसला आधी बोलु द्या

, , ,

एकदा एका ऑफिसमधले तीनजण - एक कर्मचारी, त्याचा बॉस, आणि बॉसची असिस्टंट - दुपारच्या जेवणासाठी ऑफिसबाहेर जातात. रस्त्यात त्यांना एक दिवा सापडतो - अल्लादिन सारखाच. तो कर्मचारी दिव्याला उचलतो आणि घासतो. तर खरंच त्यातुन एक जिनी बाहेर येतो! :angel: जिनी म्हणतो, "जो कोणी मला या दिव्यातुन बाहेर काढतो, त्याच्या तीन इच्छा मी पुर्ण करतो. पण तुम्ही तीघं आहात, तर प्रत्येकानी एक-एक इच्छा सांगा, मी ती पुर्ण करेन.."

"लेडिज फर्स्ट! मी आधी!!", बॉसची असिस्टंट म्हणते.
"ओ.के. तु सांग तुला काय पाहिजे." - इति जिनी.
"मला केरळमधे बॅक-वॉटरमधे बोटिंगला जायचंय."
"ठिक आहे, तसंच होईल.."
आणि पुफ्फ!!! :eyes:
असिस्टंट गायब!!

"आता मी.. आता मी...", कर्मचारी म्हणतो.
"हो, आता तु सांग तुझी इच्छा."
"मला सुंदर सुंदर मुलींसोबत हवाई बेटांवर समुद्रकिनारी लोळत पडायचंय..."
"ठिक आहे, तसंच होईल.."
आणि परत पुफ्फ!
कर्मचारीपण गायब ना!!

उरला बॉस. जिनी त्याला विचारतो, त्याची इच्छा काय आहे ते.. आणि बॉस सांगतो...
"लंच टाईम संपायच्या आत हे दोघं मला ऑफिसमधे परत पाहिजेत." :devil: :eek: :D :lol:
Download Opera, the fastest and most secure browser
December 2009
S M T W T F S
November 2009January 2010
1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 31