Skip navigation.

कवडसा

कॉपी-राईटेड!

Posts tagged with "मैत्री"

माझ्या मित्रमंडळींच्या मुलाखती

, , , ...

गोड गोड मॉर्निंग! :coffee:
मी मागच्या आठवड्यात माझ्या काही निवडक आणि नेहेमी संपर्कात असणाऱ्या काही निवडक मित्रमंडळींच्या मुलाखती घेतल्या होत्या. अशी मित्रमंडळी, ज्यांच्याशी जोडलेला असण्याचा मला भरपुर अभिमान आहे, त्यांना आपल्या ब्लॉगवर आणुया, त्यांच्याबद्दल कौतुकानी सांगावं असं मला मनापासुन वाटलं. प्रत्येकाची प्रत्यक्ष भेट घेणं मला शक्य नव्हतं म्हणुन मी त्यांना काही प्रश्न पाठवले होते. सगळ्यांनीच त्याला मनापासुन आणि मोकळेपणानी उत्तरं दिली आहेत. आता या पोस्ट पाठोपाठ मी एक-एक करुन त्यांची उत्तरं इथं टाकतोय. :up: या सगळ्यांनी जी उत्तरं दिली आहेत, ती तशीच्या तशी इथं टाकतोय... नो एडिटींग...


अशी ही अश्विनी!
भरभरुन भरत
सुस्साट सुनिता...
पंकास्टीक पंकज!
प्रयत्नशील प्रगती

:smile:

मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


माझ्या सगळीकडच्या सगळ्या मित्र-मैत्रीणींना, त्यांच्या इतर मित्र-मैत्रीणींना सुद्धा माझ्याकडुन
मैत्री दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा!

जाऊन आलो नाशिकला... :)

, , , ...

गोड गोड मॉर्निंग! :coffee:

कधी पासुनचं चाललं होतं माझं, नाशिकला जायचंय... नाशिकला जायचंय... शेवटी एकदाचा जाऊनच आलो नाशिकला! माझं गांव!! :love:
तुम्हाला टेलतो, मी माझ्या आयुष्यातली तब्बल २० वर्ष नाशिकमधे घालवली आहेत. त्यामुळं फार जीव आहे माझा त्या गावावर. :smile: बऱ्याच दिवसांपासुन माझी इच्छा होती तिथं परत एकदा जाऊन येण्याची, ती या गेल्या विक-एन्डला पुर्ण झाली! :up:

मागच्याच्या मागच्या आठवड्यातच मी एस.टी.बसचं रिझर्वेशन करुन ठेवलं होतं, त्यामुळं बस कॅचण्याचा प्रश्नच नव्हता. शनिवारी सकाळी ७ वाजता निघालो पुण्याहुन. दुपारी १२ ला पोचलो बरोब्बर तिकडं. आमच्या घरात भाडेकरु रहात असल्यानं मी हॉटेलमधेच उतरणार होतो यावेळी. मग स्टॅंडजवळच एका हॉटेलमधे रुम घेतली. बॅग दिली टाकुन रुममधे आणि भटकायला बाहेर पडलो. तसा मी साधारण ६-७ महिन्यांपुर्वीच येऊन गेलो होतो नाशिकमधे, पण माझं समाधान कधीच होत नाही (फार हावरट आहे मी या बाबतीत :D). मी नाशिकमधे रहात असतांना माझी फिरण्याची बरीच ठिकाणं होती, त्यातल्या काही ठिकाणांवर जाऊन आलो. जसं की गोल्फ क्लब मैदान, सि.बी.एस.चा परिसर... मनसोक्त पाहुन घेतले ते सगळे भाग. बराच बदल झालाय तिकडं आता.

संध्याकाळी मग पंकजकडे गेलो होतो. त्याच्याच घरी बसुन थोड्या गप्पा मारल्या. (माझी एक अनमोल वस्तुपण होती त्याच्याकडेच. ती हस्तगत करायची होती ना! किती किमती चीज होती ती माझ्यासाठी... माझं परतीचं रिझर्वेशन तिकीट!!!) मग त्याच्या बाईक वरुन भटकायला निघालो दोघंही. त्यानी मला सगळ्या भागांमधुन फिरव-फिरव फिरवला. आम्ही दोघं मग आमच्या आठवणींना उजाळा (सि.एफ.एल. बल्ब युझुन!) देत होतो. आमच्या ठरलेल्या जागा, काय काय नविन झालंय नाशिकमधे ते सगळं सगळं पाहिलं. खुप खुप सुधारलंय हो नाशिक आता! बरेच ब्रॅंडपण कमले आहेत नाशकात आता.. ’बिग बझार’तर आधीच आलं होतं, पण आता इतर मार्केटचे ब्रॅंडपण आलेत! जसे की स्पेन्सर, मोर, दास, नेक्स्ट, पेपे जिन्स, अडिडास, नाईकी, डॉमिनोज पिझ्झा, कॅफे कॉफी डे... यादी बरीच लांब आहे! म्हणजे, पिझ्झा हट वगळता पुण्यातले जवळ-जवळ सगळेच ब्रॅंड दिसले मला तिथं. गुड! म्हणजे, नाशिक इज ऑल सेट टु कॉम्पीट विथ पुणे! :yes: खुप खुप बरं वाटलं नाशिकचं हे रुप पाहुन.

सोमेश्वरला पण गेलो होतो! गोदावरीमधले ते खडक... जिथं आम्ही तासन तास पडीक असायचो ते... तिथं जाऊन बसलेलो आम्ही.
एम-३ च्या मॅमचा किस्सा आठवला... असेच बऱ्याच आठवणी काढत हसत होतो आम्ही दोघं.

रात्री मी, पंकज, महेश आणि अमोल - असं चौघांनी मिळुन ’साहेबा’ला मस्त नॉन-व्हेज पार्टी केली. चमचमीत तिखट गावठी ’पक-पक-पकाक’. :lol: शनिवार तर मस्त मजेत पार पडला.

रविवारनी तर माझ्या मजेवर कळसच चढवला! सकाळी १०च्या सुमारास मी आणि पंकज त्याच्या ढुरढुरवरुन (म्हणजे बाईकवरुन) त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. भरपुर भटकंती केली तिकडं. मग परत पंकजच्या घरी येऊन मॅच सित बसलो थोडा वेळ. संध्याकाळी मला एका मैत्रीणीला भेटायला जायचे होते. त्यासाठी मग रुमवर जाऊन फ्रेश झालो. एकदम तय्यार होऊन बसलो. ’मिस’चा ’मिस कॉल’ गॉटला आणि मी निघालो... सि.बी.एस.ला भेटली ती. मग आम्ही दोघं वन-टु-वन-टु करत शालिमार मार्गे गंगेवर गेलो. ऍक्च्युअली माझा तीथं ’पॉटचं आईसक्रीम’ इटण्याचा प्लान होता.. पण ती दुकानंच गायब झालीत तिकडुन. :frown: मग आम्ही तसंच गंगेच्या काठा-काठानी फिरत फिरत मेन रोड-एम.जी.रोड करत परत सि.बी.एस.ला कमलो. चालता चालता टॉकत होतोच. p: मग गेली ती घरी. awww मी पण रिटर्नलो रुमवर.

रविवारी मात्र लवकरच स्लीपलो. सोमवारी पहाटे उठावं लागणार होतं ना... पुण्याला परतण्यासाठी! शेवटी सोमवार उजाडलाच. खुप उदासपणे मी आवरलं... आवरावंच लागलं. awww साडे सहाची बस कॅचली... आणि निघालो.. पुन्हा एकदा असमाधानी मी... :cry: खरंतर माझ्या एका मैत्रीणीचा वाढदिवस होता सोमवारी. पण तीलापण कॉल करवला नाही मला सकाळी सकाळी, एवढा मुड ऑफ झाला होता माझा! प्रवासात बस थांबली दौलत धाब्याला तेव्हा कॉल केला मग.. मैत्रीण म्हणत होती "लेट केलास कॉल.. सगळ्या दुनियेचे कॉल्स येऊन गेले मग तुझा कॉल आलाय..." आता तिला काय सांगणार मी? असो...

काल दुपारी पुण्यात आलो, घरी जाऊन जेवण केले आणि लगेच ऑफिसमधे आलो. काम केले.. माझ्या बाबांचा पण वाढदिवस होता कालच. म्हणुन जेवायला बाहेर जायचं ठरलं होतं. मग संध्याकाळी थेट तिकडेच गेलो. जेवण घेतले.. गप्पा मारत मारत जेवलो मस्त पैकी.. आणि घरी आलो.
पण या सकाळपासुनच्या दगदगीमुळं डोकं फार दुखायला लागलं हो.. (हो! आहे म्हणुन दुखलं बरं..) पण मग नाशिक टुर आठवली की बरं वाटतं. :D :wink:

तर अशाप्रकारे माझी ’नाशिक वारी’ सुफळ संपुर्ण!!

चला, आता बराच वेळ झालाय, कामाला लागतो! राम-राम!! :up: bye
Download Opera, the fastest and most secure browser
December 2009
S M T W T F S
November 2009January 2010
1 2 3 4 5
6 7 8 9 10 11 12
13 14 15 16 17 18 19
20 21 22 23 24 25 26
27 28 29 30 31