उत्तम मध्यम सोडुन बरे...
Wednesday, 4. June 2008, 08:13:50
नमस्कार मंडळी! काय, कसं काय चालू आहे? मी त़सा ब-याच कालावधी नंतर उगवलोय माझ्या ब्लॉगवर. या आधीची पोस्ट ७ जानेवारीला टाकली होती. त्यानंतर आत्ताच. म्हणजे, कुंभकर्णाच्या खालोखाल माझ्या ब्लॉगचाच नंबर लागणार म्हणायचा की! खर सांगायचं झालं तर मला कंपनीच्या कामातुन वेळच मिळत नाही ब्लॉगवर काही लिहायला. मध्यंतरी तर इतका व्यस्त होतो की विचारुच नका. त्यातुन आता मी आमच्या कंपनीच्या हिंजवाडी ऑफिसला असतो. हे ठिकाण घरापासुन सुमारे २५ कि.मी. अंतरावर आहे. येण्याजाण्यातच कमीत कमी अर्धा तास जातो. आणि सोबत रहदारी... वैताग येतो हो नुसता... फ़ुफ़ाट्यात जाउन पडल्यासारखं वाटतय. तरी मी आता परत थोडा थोडा वेळ काढायला सुरुवात केली आहे. बघुया काय होते पुढे ते. तोपर्यंत राम राम!