अशी ही अश्विनी!
Thursday, October 23, 2008 3:02:57 AM
तीच्या बऱ्याच कॉमेंट्स आहेत या ब्लॉगवर. खरंतर हिच्या कॉमेंट्समुळेच माझा ब्लॉगींगचा उत्साह टिकुन राहीला आणि आता ब्लॉग या टप्प्यावर येऊन पोचलाय. बघुया तिच्या आवडी-निवडी आणि तिची मतं तीच्याच शब्दांत...तुझा आवडता पदार्थ कोणता?
गुलाबजामुन.
आणि नावडती भाजी?
शेपु आणि कारले.
नावडता विषय कोणता?
गॉसिपींग.
कशा मुलासोबत तुला ’डेट’वर जायला आवडेल?
मला समजुन घेणारा.
अरे वा! यादी छोटीच आहे की!!
कोणता शब्द तु सगळ्यात जास्ती वापरतेस?
’अच्छा’ आणि ’ओके’.
अच्छा! गुड.. ओके!
शेवटचं चॅटींग कोणाशी केलंस?
सुनिलशी.
सगळ्यात शेवटचं हॉटेल जिथं तु खाल्लंस?
मुंबई युनिवर्सीटीजवळचे हॉटेल.
तुला वैताग आणणारी गोष्ट कोणती?
माझा बॉस आणि माझा विद्यार्थी विनय.
आणि या दोघांना वैताग आणणारी गोष्ट ’तु’ का?
चिटींग चांगलं की वाईट?
अगदी वाईट.
अशी एखादी व्यक्ती जी तुला अजुन तुझ्या आयुष्यात असणे आवडेल?
माझी मोठी बहीण अमिता.
हे वर्ष तुझ्या आयुष्यातलं ’बेस्ट’ वर्ष आहे का? नसेल तर कोणतं?
हो, अगदी बेस्ट आहे.
तुला तुझ्या आयुष्याबद्दल आत्ता, या क्षणी काय वाटतयं?
मस्त वाटते आहे, खरंतर मला शब्दच सुचत नाहीयेत.
तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मजेशीर प्रसंग कोणता?
रोजच घडत असतात माझ्या स्टुडंट्सबरोबर.
तुझं आवडतं भटकंतीचं ठिकाण?
गिरगांव, गिरगांव चौपाटी.
पाच वर्षांनंतर स्वतःला कशी बघतेयेस?
जबाबदार.
दिवाळीमधे काही विशेष? काही प्लान?
घरीच साजरी करणार.
सध्याचं आवडतं गाणं?
"कही तो होगी वो.." आणि "आताशा असे हे मला काय होते..."
"आताशा असे हे मला काय होते..." कुल... प्रेमात वगैरे पडलीस की काय?
आत्तापर्यंतचं आयुष्य एका गाण्यात सांगायचं झालं तर तु कोणतं गाणं म्हणशील?
"हे जीवन सुंदर आहे..."
असं काही जे आयुष्यात करायचं राहुन गेलं आणि आता ती संधी परत मिळणार नाहीये?
गाण्याचा क्लास नाही केला आणि जे.जे.स्कुल ऑफ आर्टस मधे ऍडमीशन घेता घेता राहुन गेले.
तुझी विचित्र सवय?
माहीत नाही..

Prabhas Gupteprabhas # Thursday, October 23, 2008 4:23:51 AM
bharat banatebharatbanate # Thursday, October 23, 2008 4:52:14 AM
Anonymous # Monday, February 7, 2011 8:55:26 AM
Anonymous # Monday, February 7, 2011 9:05:33 AM