भरभरुन भरत
Thursday, October 23, 2008 3:08:12 AM
तुझा आवडता पदार्थ कोणता?
चिकन.
आणि नावडती भाजी?
कारलं.
नावडता विषय कोणता?
गणित.
कशा मुलीसोबत तुला ’डेट’वर जायला आवडेल?
साधी मुलगी, जी मला समजुन घेते, माझ्यावर प्रेम करते.
कुल!
कोणता शब्द तु सगळ्यात जास्ती वापरतोस?
’झंपक’
हं... उच्चार चांगला आहे, पण माझ्यासाठी नाही उच्चारायचा तो..
शेवटचं चॅटींग कोणाशी केलंस?
स्मिता, माझी गर्ल फ्रेंड
सही रे भीडु! आणि तीनं कोणाशी केलयं शेवटचं चॅटिंग माहीत आहे?
सगळ्यात शेवटचं हॉटेल जिथं तु खाल्लंस?
शिव-सागर, जंगली महाराज रोड, पुणे.
तुला वैताग आणणारी गोष्ट कोणती?
जेव्हा कोणी माझ्याशी फक्त पैशाच्याच बाबतीत बोलतं आणि पैशावरच प्रेम करतं तेव्हा.
चिटींग चांगलं की वाईट?
वाईट. चिटींग करुन तुम्हाला एखाद्या वेळेपुरतं एखादी गोष्ट मिळेल, पण ती आयुष्यभरासाठी नसेल.
अशी एखादी व्यक्ती जी तुला अजुन तुझ्या आयुष्यात असणे आवडेल?
बाकीचे आहेतच, पण स्मितापण असावी अशी इच्छा आहे.
हे वर्ष तुझ्या आयुष्यातलं ’बेस्ट’ वर्ष आहे का? हे नसेल तर कोणतं?
नाही, हे वर्ष नाही, १९९८ साल. कारण त्या वर्षी मी दहावीला शाळेत पहिला आलो होतो.
तुला तुझ्या आयुष्याबद्दल आत्ता, या क्षणी काय वाटतयं?
माझं करिअर बघता, आयुष्य माझ्या मनासारखं नाहिये.
होईल रे तुझ्याच मनासारखं... आत्ता तर कुठे सुरुवात आहे आपल्या करिअरची!
तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मजेशीर प्रसंग कोणता?
ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाचा कॉमन ऑफ, जेव्हा माझ्या सगळ्या ग्रुपनी सगळ्यांना वेड्यात काढुन कॉमन ऑफ घ्यायला लावला होता आणि आम्ही मात्र वर्गात जाऊन बसलो होतो.
हो! मला अजुनपण हसु येतं हे आठवलं की... आणि याच्या दुसऱ्या दिवशीची वर्गातली मजा आणि नंतर ते ’पॅरेंट्स’ ना बोलावलं होतं ते पण..
तुझं आवडतं भटकंतीचं ठिकाण?
गोवा, कोकण.
पाच वर्षांनंतर स्वतःला कसा बघतोयेस?
एक यशस्वी सॉफ्टवेअर इंजिनियर.
दिवाळीमधे काही विशेष? काही प्लान?
काही विशेष नाही, काही प्लानपण नाही.
सध्याचं आवडतं गाणं?
रॉक ऑन.
आत्तापर्यंतचं आयुष्य एका गाण्यात सांगायचं झालं तर तु कोणतं गाणं म्हणशील?
’गर्दीश’ मधलं ’हम ना समझे थे बात इतनी सी...’
असं काही जे आयुष्यात करायचं राहुन गेलं आणि आता ती संधी परत मिळणार नाहीये?
ड्रॉईंग. शाळेत असल्यापासुनच मला ते आवडतं.
तुझी विचित्र सवय?
उठल्या-उठल्या हातात पेपर लागतो.

Anonymous # Friday, October 24, 2008 12:21:12 PM
bharat banatebharatbanate # Saturday, October 25, 2008 7:33:00 AM
Anonymous # Saturday, October 25, 2008 9:05:13 AM