सुस्साट सुनिता...
Thursday, October 23, 2008 3:17:53 AM
अजुन पर्यंत आम्ही एकमेकांना पाहिलं नाहीये. पण आता एकमेकांना बऱ्यापैकी ओळखुन आहोत आता. हि एकदा बोलायला लागली ना, की सुटतेच झुकझुक गाडी सारखी. त्यामुळे मी तर हिला ’सुने सुस्साट’ असंच म्हणतो. इतरांना विचारले तेच प्रश्न हिला पण विचारले, आणि नेहेमीप्रमाणे ही सुटली सुद्धा! तुझा आवडता पदार्थ कोणता?
श्रीखंड-पुरी.
आणि नावडती भाजी?
बटाटा.
नावडता विषय कोणता?
कोणाची निंदा करणे, आणि शैक्षणिक विषयांमधे युनिक्स. आय हेट युनिक्स!
कशा मुलासोबत तुला ’डेट’वर जायला आवडेल?
अर्थातच, जो माझी खुप काळजी घेतो, माझ्यावर खुप प्रेम करतो अशासोबत. शेवटी तोच ती डेट स्पेशल बनवेल ना!
कोणता शब्द तु सगळ्यात जास्ती वापरतेस?
’ओह माय गॉड’ हा शब्द.
शेवटचं चॅटींग कोणाशी केलंस?
प्रभास गुप्ते. (ओळखतोस ना तु?)
नाही बुवा, मी नाही ओळखत याला...
सगळ्यात शेवटचं हॉटेल जिथं तु खाल्लंस?
विहार, गंगापुर रोड (नाशिक)
हो, आम्ही पण तिथं बऱ्याचवेळा मिसळ खायला गेलोय.
तुला वैताग आणणारी गोष्ट कोणती?
कोणी जर सतत वायफळ बडबड करत असेल ना तर मला वैताग येतो.
चिटींग चांगलं की वाईट?
चिटींग करणे हे वाईटच असते. माझ्यामते ज्यांत खरे बोलण्याची धमक नसते ते लोक चिटींग करतात. आणि तसेपण, चिटींग कधी ना कधी समोर येणारच. आणि शेवटी जे तुमचे आहे, जे तुमच्यासाठी आहे ते तुम्हालाच मिळणार. मग चिटींग का करा? प्रामाणिकच रहा.
अशी एखादी व्यक्ती जी तुला अजुन तुझ्या आयुष्यात असणे आवडेल?
मी या प्रश्नाचा अर्थ असा घेईन की अशी व्यक्ती जी कदाचित तुमच्यापासुन लांब जाईल आणि कदाचित तेवढ्या वारंवार नाही भेटणार आणि तरीही ती व्यक्ती तुमच्या आजुबाजुला तुम्हाला हवी असेल. (पण मला एक पिट्टु हवाय, मी दोन नावं सांगणार.)
प्रतिभा दि.. फ्रेंड, टिचर, मोठी बहिण किंवा मी असंही म्हणेन की माझ्या आईसारखीच... माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती. त्यांनी मला माझ्या कॉलेज लाईफ पासुन खुप काही शिकवलं आहे. मी त्यांच्याशी काहीही ’शेअर’ करु शकते, आणि त्यांनी नेहेमीच मला योग्य रस्ता दाखवलाय आणि योग्यच सल्ला दिलाय. मुळात त्यांच्यामुळंच मी एक खंबीर व्यक्ती बनलीये.
आणि दुसरी व्यक्ती म्हणजे माझा नविन मित्र - प्रभास. लहान आहे माझ्यापेक्षा. पण साहेबांनी एकदा एखादी गोष्ट ’एक्सप्लेन’ करायला सुरुवात केली ना की असं वाटतं कोणीतरी खुप मोठी व्यक्ती आपल्याशी बोलते आहे. मी बरेच काही शिकले आहे त्याच्याकडुन, आणि अजुनही खुप काही शिकण्याची इच्छा आहे माझी. मला त्याचा लाईफकडे बघण्याचा दृष्टीकोन आवडतो, आणि त्यातुन मला ०.०००१% जरी काही घेता आलं ना तरी ते माझ्यासाठी खुप ग्रेट गोष्ट असेल. सो, सारांश असा की, असा मित्र कोण घालवेल?
म्हटलं होतं ना, सुटतेच ही म्हणुन...
बाय द वे, या प्रभासला भेटला पाहिजे एकदा...
हे वर्ष तुझ्या आयुष्यातलं ’बेस्ट’ वर्ष आहे का? नसेल तर कोणतं?
नाही, हे वर्ष तर नाहीच. आत्तापर्यंत २००४ माझ्यासाठी बेस्ट आहे. कारण याच वर्षी मी मावशी झाले. मला अजुनही तो क्षण आठवतो जेव्हा मी वेदांतला (माझा भाचा) पहिल्यांदाच हातात घेतलेलं - माझ्या आयुष्यातला बेस्ट क्षण.. खुपच छान होते ते वर्ष.
तुला तुझ्या आयुष्याबद्दल आत्ता, या क्षणी काय वाटतयं?
करियर पॉईंट ऑफ व्ह्यु नी म्हटलं तर आता बरीच स्टेबल आहे. मागच्या एक-दिड वर्षात जे जे कष्ट घेतलेत त्यांच चीज होतं आहे. बाकी मग जे काही वाईट असेल तर ते माझ्यामुळेच आहे, त्याबद्द्ल नो पश्चाताप. शेवटी जो चुकतो, तोच शिकतो.
तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मजेशीर प्रसंग कोणता?
माझ्या वर्गाची माथेरान ट्रिप. तो दिवस मी कधीच नाही विसरणार. मी आणि माझी बेस्ट फ्रेंड हेमलता - आम्ही एवढी धमाल केली होती तेव्हा, त्यात आम्हाला काही ना काही खोड्या काढायची सवयच आहे. सो ईट वॉज सिम्पली रॉकींग.
तुझं आवडतं भटकंतीचं ठिकाण?
माथेरान, कोकण, किंवा कोणतंही निसर्गरम्य ठिकाण.
पाच वर्षांनंतर स्वतःला कशी बघतेयेस?
ओह, सही प्रश्न आहे! अं..... पाच वर्षांनंतर मी स्वतःला एक मोठ्या एम. एन. सी. कंपनीमधे एक यशस्वी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणुन बघते (डॉट नेट मधे मास्टर असेन झालेली...) आणि हो, माझ्या दोन्ही फॅमिलींना (माहेर आणि सासर) माझ्यावर नक्कीच ’नाझ’ असेल नक्कीच.
अरे वा! प्लॅनिंग सुरु झालंय वाटतं.
दिवाळीमधे काही विशेष? काही प्लान?
फॅमिलीसोबत फुल्ल-टु एन्जॉय करणार. ऍक्चुअली सगळी फॅमिली सहा-सात महिन्यांनंतर एकत्र येणार. सो कुठंतरी मस्त फिरायला जायचा प्लॅन आहे.
सध्याचं आवडतं गाणं?
"दिल खो गया हो गया किसी का... अब रास्ता मिल गया खुशी का..." सिंग इज किंग मधलं.
आत्तापर्यंतचं आयुष्य एका गाण्यात सांगायचं झालं तर तु कोणतं गाणं म्हणशील?
हे जीवन सुंदर आहे. ’चौकट राजा’ पिक्चर मधलं.
असं काही जे आयुष्यात करायचं राहुन गेलं आणि आता ती संधी परत मिळणार नाहीये?
तसं बरंच काही राहुन गेलं... पण मला प्रोफेशनल क्लासिकल डान्सर बनायचं होतं... राहुन गेलं.
तुझी विचित्र सवय?
हसु नकोस हं... सकाळी उठल्यावर आरशासमोर डान्स करायची विचित्र सवय आहे मला. खुपच विचित्र आहे ना?

bharat banatebharatbanate # Thursday, October 23, 2008 4:04:01 AM
Prabhas Gupteprabhas # Thursday, October 23, 2008 4:33:37 AM
watate ki nahi havihavishi? mag!!
bharat banatebharatbanate # Thursday, October 23, 2008 4:34:35 AM
Anonymous # Thursday, October 23, 2008 5:53:34 AM
Prabhas Gupteprabhas # Thursday, October 23, 2008 11:04:36 AM
i like the very style...