पंकास्टीक पंकज!
Thursday, October 23, 2008 3:27:46 AM
तुझा आवडता पदार्थ कोणता?
ज्या पदार्थानी तोंडाची चव चांगली होते तो.
आणि नावडती भाजी?
जी भाजी जिभेला चव देत नाही ती.
मला कोड्यात पाडण्याचा घाटच घातलाय वाटतं यानी
नावडता विषय कोणता?
राजकारण आणि अंधश्रद्धा.
कशा मुलीसोबत तुला ’डेट’वर जायला आवडेल?
ज्या मुलीमधे 3S फॅक्टर असेल अशा मुलीसोबत.
अजुन एक नवीन संकल्पना. हे 3S काय रे भो?
कोणता शब्द तु सगळ्यात जास्ती वापरतोस?
’चायला’.
ही ऑर्डर असते ’चाय ला’ अशी की अजुन काही?
शेवटचं चॅटींग कोणाशी केलंस?
एकतर प्रभास नाहीतर ऑनलाईन एखादी फ्रेंड.
’एखादी’? हं... पंकज बाबु लगे रहो!
सगळ्यात शेवटचं हॉटेल जिथं तु खाल्लंस?
दमण मधले ’हॉटेल गुरुकृपा’.
तुला वैताग आणणारी गोष्ट कोणती?
मुलींचे खोटे बोलणे.
हं.... गेला पंकज कामातुन!
चिटींग चांगलं की वाईट?
चिटींग कोणाला करायचे त्याच्या पर्सनालीटीवर अवलंबुन. तसे वाईटच.
अशी एखादी व्यक्ती जी तुला अजुन तुझ्या आयुष्यात असणे आवडेल?
आई आणि दादा.
हे वर्ष तुझ्या आयुष्यातलं ’बेस्ट’ वर्ष आहे का? हे नसेल तर कोणतं?
हो आहे, कारण खुप मजा केली मी.
तुला तुझ्या आयुष्याबद्दल आत्ता, या क्षणी काय वाटतयं?
काही नवीन गोष्टी नाहीत, त्यामुळे मी खुप बोअर झालोय.
तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मजेशीर प्रसंग कोणता?
एक मित्र आहे, त्याला चिडवलं की खुप राग येतो त्याला, तो प्रसंग.
मी ओळखला त्याला!
तुझं आवडतं भटकंतीचं ठिकाण?
ज्या ठिकाणी निसर्गाची कृपा आहे असे.
पाच वर्षांनंतर स्वतःला कसा बघतोयेस?
कुणी पाहिले? सांगता येत नाही. पण एक लक्ष्य आहे की काहीतरी करुन दाखवायचे.
दिवाळीमधे काही विशेष? काही प्लान?
अजुन तरी काही फिक्स नाही केलंय... बघु या.
सध्याचं आवडतं गाणं?
’रॉक ऑन’ मधलं ’सिंदबाद द सेलर’.
आत्तापर्यंतचं आयुष्य एका गाण्यात सांगायचं झालं तर तु कोणतं गाणं म्हणशील?
"जींदगी हर कदम एक नयी जंग है..."
असं काही जे आयुष्यात करायचं राहुन गेलं आणि आता ती संधी परत मिळणार नाहीये?
बहुतेक मुलगी पटवायची राहुन गेली.
अगदी मनापासुन आलेलं उत्तर आहे हे नाही?
तुझी विचित्र सवय?
भरपुर आहेत, पण एखाद्याला मुद्दाम हुन चिडवणे.


Anonymous # Thursday, October 23, 2008 4:01:17 AM
Prabhas Gupteprabhas # Thursday, October 23, 2008 4:03:09 AM
खुप आतुरतेनी वेटतोय मी.
Anonymous # Thursday, October 23, 2008 4:33:52 AM
Pankaj NerkarPankajNerkar # Thursday, October 23, 2008 4:47:36 AM
Yup Dear.
Thanks for your comment!