कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

प्रयत्नशील प्रगती

, , , , , , , , , , , , , ,

प्रगती. खरंतर ही पंकजची वर्गमैत्रीण. सिंटेल कंपनीच्या वॉक-इनला आम्ही ओझरते भेटलो काय आणि आमच्यात मैत्री झाली काय.. सगळंच माझ्या आकलनाच्या पलिकडचं आहे. त्या दिवसानंतर आमची अजुनपर्यंत परत भेट झाली नाहीये. पण एस.एम.एस., कॉल आणि चॅटींगच्या रुपात आमचा संपर्क अजुन आहे. तिलापण मी तेच प्रश्न विचारले. आणि तिनं उत्तरंपण तेवढ्याच मनमोकळेपणानं दिली आहेत.

तुझा आवडता पदार्थ कोणता?
चकली.

आणि नावडती भाजी?
शेपुची भाजी.

नावडता विषय कोणता?
इतरांबद्दल वाईट बोलणं, एखाद्याची निंदा करणं आवडत नाही.

कशा मुलासोबत तुला ’डेट’वर जायला आवडेल?
ज्या रस्त्याला आपल्याला जायचंच नाहीये त्याचा मी कधी विचारच नाही करत. मला कोणासोबतच जायला आवडणार नाही.

अरेरे! गेला आमचा चान्स... sad



कोणता शब्द तु सगळ्यात जास्ती वापरतेस?
’सिरीयसली’ हा शब्द.

सिरीयसली?



शेवटचं चॅटींग कोणाशी केलंस?
सॅम, जो स्पायसर कॉलेजला होता. मी त्याला टि.सी.एस., कंपायलर कंस्ट्रक्शन शिकवत होते. आता तो यु.एस.ए. मधे आहे. लेक्चर घ्यायचे मी तिथं एम.सी.एस.-१ ला असतांना.

सगळ्यात शेवटचं हॉटेल जिथं तु खाल्लंस?
हॉटेल श्रावण, फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे. एस.बी.आय. ए.टी.एम. जवळ.

तुला वैताग आणणारी गोष्ट कोणती?
मोठ्या आवाजात गाणी लावली की वैताग येतो मला.

चिटींग चांगलं की वाईट?
चिटींग नेहेमीच वाईट... चिटींग करुन कोणती गोष्ट मिळवली तरी काही आनंद मिळतच नाही असं मला वाटंत. प्रामाणिकपणाने जे मिळतं त्याचा आनंद काही निराळाच असतो. किमान, सगळ्यांशी आपण खोटे बोललो चिटींग करुन, तरी आपल्या मनाशी कधीच नाही खोटं बोलु शकत आपण, नाही का?

अशी एखादी व्यक्ती जी तुला अजुन तुझ्या आयुष्यात असणे आवडेल?
अर्थातच माझे सगळे फॅमिली मेंबर.. पप्पा, मम्मी, दिदी, भाऊ.

हे वर्ष तुझ्या आयुष्यातलं ’बेस्ट’ वर्ष आहे का?
येस! हे वर्ष माझ्यासाठी ’बेस्ट’ आहे कारण मला पाहिजे तसं काम मिळालं... म्हणजे डॉट-नेट डोमेन नी प्रोफाईलपण छान मिळाला. मुख्य म्हणजे चांगले फ्रेंड्स मिळाले. ऍक्चुअली, मला नेहेमी ग्रुप सोबत रहावसं वाटतं. ऑफिसमधली टिम बेस्ट आहे आणि पि.एम. सुद्धा! असेही दररोज १२ तास मी बाहेरच असते, फॅमिलीसोबत कमी आणि फ्रेंड्ससोबत जास्त वेळ असते ना! पण मला नेहेमी चांगलाच ग्रुप मिळतो. ऍक्चुअली त्याला आपण पण चांगलं असायला हवे ना? (श्रेय मलाच. हे हे हे.. ) ऍड्जस्ट करण्याची सवय लागते सगळ्यात मिळुन राहीले तर नाही का? आयुष्य म्हणजे तरी काय, एक प्रकारची ऍडजस्टमेंटच.

तुला तुझ्या आयुष्याबद्दल आत्ता, या क्षणी काय वाटतयं?
हं.... खुपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे रे... या क्षणीतरी असं वाटतं की "मंजील अभी बहोत दुर है..." खुप काही मिळवायचे बाकी आहे आणि मी ते मिळवणारच. मनुष्यप्राणी कधी ’सॅटीसफाय’ होतो का? कधीच नाही. एक गोष्ट मनासारखी घडली की लगेच दुसरी गोष्ट आपलं डोकं वर काढुन ’मी’ म्हणते. मग ती गोष्ट मिळवायच्या पाठी आपण जातो, राईट?

एकदम राईट...



तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मजेशीर प्रसंग कोणता?
कॉलेजमधे बि.सी.एस. ला असतांना आमचे लायब्ररीयन पायरीवरुन पडलेले. आय स्वेअर, कधीच नाही विसरु शकत मी. खुप हसले होते मी. अजुन आठवलं तरी हसु येतं. सगळा ग्रुप मला ओरडुन गप्प बैस म्हणत होता पण मी... नॉन-स्टॉप हसत होते. सरांच्यापण लक्षात आलेलं हे.

तुझं आवडतं भटकंतीचं ठिकाण?
लोणावळा, आणि जिथे ग्रीनरी तिथं जायला जास्त आवडते.

पाच वर्षांनंतर स्वतःला कशी बघतोयेस?
पाच वर्षांनंतर... मी मला एका छान एम.एन.सी. मधे सिनीयर डेव्हलपर म्हणुन पाहिन नी एका छान सुशिक्षीत घरातली चांगली, सगळ्यांची आवडती, लाडाची सुन म्हणुन पाहीन. smile

हिचं पण प्लॅनिंग सुरु झालेलं दिसतंय.



दिवाळीमधे काही विशेष? काही प्लान?
दिवाळीत काही विशेष नाही, नो प्लान.

सध्याचं आवडतं गाणं?
"तेरी ओर.. तेरी ओर..." ’सिंग इज किंग’ मधलं.

आत्तापर्यंतचं आयुष्य एका गाण्यात सांगायचं झालं तर तु कोणतं गाणं म्हणशील?
जीवन गाणे गातच रहावे... जीवन गाणे
झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे...

असं काही जे आयुष्यात करायचं राहुन गेलं आणि आता ती संधी परत मिळणार नाहीये?
असे काही नाही... जे करायचे होते ते करुन झाले माझे... डान्स, ऍक्टींग, सिंगींग.

तुझी विचित्र सवय?
विचित्र सवय... हं.. हसु नकोस पण जेवण करत असतांना उजवा हात हलवायची वाईट सवय आहे. मम्मी खुप ओरडते पण ती सवय सुटतच नाही माझी.

पंकास्टीक पंकज!प्रभास... नेहेमी माझ्या सोबत राहणारा...

Comments

Prabhas Gupteprabhas Thursday, October 23, 2008 4:21:40 AM

प्रगती, तुला पुढील वाटचालीसाठी मनापासुन शुभेच्छा!!! smile

Anonymous Thursday, October 23, 2008 4:24:05 AM

Pragati writes: Thanku so Much Prabhas....!!!!!!!!!!!!!!!:-)

Anonymous Thursday, October 23, 2008 4:25:59 AM

pragati writes: sahiii...Pan nav kas kai suchle barrr?? Praytnasil Pragati....

Prabhas Gupteprabhas Thursday, October 23, 2008 4:26:57 AM

बरोबर सुचले ना पण?

Anonymous Thursday, October 23, 2008 9:06:30 AM

Pragati writes: Ho agadi barobar suchle .....

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies