Skip navigation.

कवडसा

कॉपी-राईटेड!

पाऊस मनमानी...

,

:coffee: गुड मॉर्निंग!

या पावसाचा काही भरवसाच नाही राहिलाय. :lol: काल परत एकदा सांडला इकडे. p: हो ना हो.. काल एकतर मला ऑफिसमधे थोडं जास्तीवेळ थांबावं लागलं. साडे-सात च्या सुमारास घरी जायला माझी ’ब्लॅक ब्युटी’ काढली आणि जेमतेम ५०० मीटर पुढं गेलो असेन-नसेन तर हा एकाएकी हजर. बर, नुसताच हजर नाही तर, अगदी जोरातच सांडायला लागला की! :yikes: विजा कडाडत होत्या, चमकत होत्या, गडगडत पण होतं. जवळ-जवळ अर्धा तास धडपडलाच पाऊस. :D चांगला ऑफिसमधुन बाहेर पडलेलो. परत ऑफिसमधे यावं लागलं ना मला त्यामुळं. :frown: मग बसलो जरावेळ खाटखुट करत. पाऊणे-आठ्च्या सुमारास जरा त्याचा जोर कमी झाला आणि मी हेल्मेट, बॅग सगळं हातात घेऊन टपुनच बसलो. जोर अजुन कमी झाला की लगेच कलटी.कॉम मारण्यासाठी. मधुन मधुन खिडकीत जाऊन बघत होतो, ’परिस्थीतीचा आढावा’ घेत होतो. :cool: शेवटी आठच्या सुमारास जोर अगदीच गेला आणि मी लगेच बाहेर सटकलो. मग मस्तपैकी बायपास-हायवे नी झुम्म्म! या ’हायवे’नी जायला नेहेमीच मजा येते मला. भन्नाट स्पिडनी ड्राईव्हतो मी त्यावर. पण काल पावसामुळे रस्ता जाम ओला झालेला, त्यामुळे जरा सावधपणेच चालवत होतो.

वारजेच्या साईडला पोचलो, तर लक्षात आलं तिकडं पाऊस झालाच नव्हता. :lol: मग पुढच्या रस्त्यावर स्पिड कॅचलाच मी. घरी पोचेपर्यंत जाम भुक लागली होतीच. आवरलं पटापट आणि मारला आडवा हात जेवणावर. :wink: आणि मग त्यानंतर थोड्याच वेळात लुडकलो गादीवर. :zzz: बास्स! संपला कालचा दिवस.

कालची भन्नाट स्पिडची हौस आज फिटवुन घेतलीये मग. मस्त ८० कि.मी. प्रति तासाच्या वेगात हाकलीये माझी ब्लॅक ब्युटी. झक्कास! :up:

माझ्या मित्रमंडळींच्या मुलाखती३२९..

Comments

Anonymous 21. November 2008, 09:58

Mrudula Tambe writes:

Kalti.com shabd ekdam dhaasu aahe bar ka...

Aavadala tufaan.

Prabhas Gupte 21. November 2008, 10:45

:D आवडला? घेऊन टाका मग तुम्हाला...

बदल्यात ’धासु’ दिलाच आहे आपण.
:happy:

Anonymous 21. November 2008, 17:31

भुंगा.... writes:

पावसाचं असंच आहे... तुला सांगतो... आमच्या पुणे औफिसातुन - विमाननगर - निघताना पावसाचा पत्त्याच नसतो...
मात्र कोंढ्व्याला पोहचतो न पोहचतो... तो मात्र आमच्या आधी - जणु ".. या! .. तुमचीच वाट बघत होतो..!" असा सांडत आसतो ..!

... बाकी तु - पावसात गाडी जरा जपुनच चालव रे... सांडायची फार शक्यता असते.. इस्पेशली - पाऊस सांडत असताना .. ;)


भुंगा....

Prabhas Gupte 24. November 2008, 03:08

हो! एकदा नाशिकला असतांना सांडलोच होतो. तेव्हापासुन जपुनच चालवतो मी गाडी पावसात. :D

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies