कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

३२९..

, ,

coffee गुड मॉर्निंग!

आज २००८ सालातला ३२९ वा दिवस! bigsmile

तसं आजच्या पोस्टला काय शिर्षक द्यावं ते सुचेना, आणि मग काही दिवसांपुर्वी ठरवलेली हि पद्धत कामी आली परत. असो. wink
बाकी तुमचं कसं चालु आहे? कसे आहात? कसा होता तुमचा विक-एन्ड? माझा तर एकदम मजेत गेला बुवा.

बुवा? कोण बुवा? ’बुवा’ नाही गेला हो ’विक-एन्ड’ गेला मजेत, असं टेलतोय.... कोण कुठला बुवा उपटवलात मधेच तुम्हालाच ठाऊक. confused ओह! हा अच्छा!! तो शब्द होय! तसं टेला की मग... ती आपली बोलण्याची पद्धत हो नुसती.. बोलीभाषा! मी तेच म्हणत होतो, म्हटलं आता ब्लॉगवरपण बुवाबाजी अवतरली की काय?? faint



असो. ते सोडुया तिकडेच. तर, सांगा की मला, काय काय डुलतं तुम्ही या विक-एन्डला हलत-डुलत. lol bigsmile p wink cool (शाब्दीक कोटीचा कसातरीच प्रयत्न... ग्लोबल मराठीलापण असं अलंकारांनी सजवलं पाहिजेच ना!)

माझं आधी टेलु म्हणता? बर... माझंच टेलतो आधी, मग तुमचं लिसनतो. (म्हणजे रिडतो...)

खुप काही विशेष नाही केलं शनि-डेला. आपला नेहेमी प्रमाणे उठलो, दात-चहा-आंघोळ-आवराआवरी या चक्रातुन गेलो. आणि मग! मग बाबांनी लायब्ररीतुन ब्रिंगलेलं पुस्तक रिडायला घेतलं. जगन्नाथ कुंटे यांच ’नर्मदे हर हर’. त्यांनी केलेल्या तीन नर्मदा परिक्रमांमधे आलेले वेगवेगळे अनुभव त्यांनी सांगितले आहेत त्या पुस्तकात. अनुभव सगळे अध्यात्मिकच आहेत, पण खरच थक्क करणारे आहेत. मी या वेळी पटापट पुढे न जाता, सावकाश रिडतोय ते पुस्तक. तुम्ही वाचलं नसेल तर जरुर वाचा ते! मला का कोण जाणे, पण ते पुस्तक वाचतांना, त्यातले अनुभव वाचतांना अचानक, नकळतपणे असं मन भरुन येत होतं. मधुनच डोळ्यांत पाणीपण तरळत होतं. अगदी ही पोस्ट लिहितांना - हा पॅराग्राफ लिहितांना पण तसंच होतंय मला.. त्या पुस्तकातल्या गोष्टी नाही सांगणार मी तुम्हाला, त्या वाचुन माहित करुन घेणंच अधिक चांगलं. या पुस्तकात जगन्नाथ कुंटेंनी म्हटलंय की ’नर्मदा मय्याच तुमची काळजी घेते परिक्रमेत’. आणि तुमच्या गुरुचा आदेश झाल्याशिवाय होत नाही परिक्रमा म्हणतात. त्या संदर्भातले त्यांचे अनुभव तर अगदी थक्क करतात! मला तर शब्दच सुचत नाहीयेत ते सांगायला.. भाषापण तोकडी पडते तर...!

अजुन बरेच अनुभव आहेत त्यांचे. अशा गोष्टींमधे तुम्हाला रुची असेल तर जरुर वाचा. आणि नसेल रुची तरी वाचाच!

बास्स! बाकी रवि-डेला तर आत्ये-बहिणीच्या लग्नाला गेलो होतो ठाण्याला. आता आमचापण नंबर ना! त्यामुळं इकडे-तिकडे बघणं होतंच चालु!! lol पण मला कसलीही घाई नाहीये. अजुन दोन वर्ष तरी काय मी लग्न करत नाहीये. p बाकी पुढचं पुढे बघु! पण मुली बघुन ठेवायला काय जातंय? नाहीतरी इतर नातेवाईक विचारुन विचारुन हैराण करतातच आहेत, तर वाहत्या गंगेत हात धुवुन घ्यायचे! नाही का? बाकी या ’फ्रंट’वर विशेष अजुन काही नाही.

तर, अशा प्रकारे माझा आठवडा-एन्ड फुल्ल-टु मजेत, आनंदात पार पडलाय. चला! आता तुमचं काय ते टेला.. सुटाच लगेच! bigsmile p wink

पाऊस मनमानी...३३०.. थंडी... आणि प्रगत तंत्रज्ञान...

Comments

Rahulrahulwaghamare Monday, November 24, 2008 4:44:55 AM

आमचा विक-एन्ड ठिक म्हणता येईल.
एकच दिवस भेटतो ... आणि तोही पटकण जातो
बाकी काही विशेष नाही

Anonymous Monday, November 24, 2008 6:14:19 AM

Kanchan Chavan writes: माझ्या ब्लॉगवरील कमेंट साठी धन्यवाद! विकएन्ड चांगलाच गेला. आता शॉपिंग हा 'विक पॉइंट' असला तरी तो विक एन्डलाच स्ट्रोंग होतो असं माझं मत आहे. शिवाय खूप खूप उशिरापर्यंत अंथरुणात लोळत पडण्याचं भाग्य विक एन्डलाच लाभतं! तुमचा ग्लोबल मराठीपणाचे अलंकार आवडले. http://padsaad.blogspot.com/

Anonymous Monday, November 24, 2008 7:42:04 AM

mitali writes: va sundar pan aamhi khup dukhat ghalvla week end aamche khup khatke udle maza blog paha http://mitali1.mywebdunia.com/articles/

Prabhas Gupteprabhas Monday, November 24, 2008 7:50:51 AM

ओह! ते पण चालायचंच..! सगळेच आलबेल असेल तर खुपशी मजा रहात नाही. smile

थोडीतरी तिखट फोडणी हवीच ना?

Anonymous Monday, November 24, 2008 11:06:20 AM

भुंगा ... writes: अरे वा..! एकंदरीत मस्त गेला विकेन्ड तर.? ... पुस्तकांशी मैत्री असणारे कधी एकटे नसतात - कुठेतरी वाचले होते.. आठवत नाही... माझ्या वैयक्तिक यादित बरीच पुस्तके आहेत.. तशी घरात असणारी पुस्तकेही अजुन वाचुन झाली नाहीत हे ही तितकच खरं..! अरे हां... तुला माहिती असणा-या/ री काही लायब्ररींची नावे - पत्ते सांगतोस का? सगळीच चांगली पुस्तके विकत घेऊन वाचण्यापेक्षा - लायब्ररी लाऊन काही वाचावी म्हणतोय... बघ तुला वेळ मिळाला तर मला मेल टाक... नाहीतर यावर एखादी पोस्त लिहि ... डीटेल मध्ये ... म्हणजे सगळ्यांच्याच कामी येइल.. कसं.? भुंगा ... http://bhunga.blogspot.com

Prabhas Gupteprabhas Tuesday, November 25, 2008 2:51:45 AM

नमस्कार! माफ करा, पण मला पुण्यातल्या लायब्ररी खरच माहित नाहीयेत. मला कोणतं पुस्तक सांगितलं गेलं तर एकतर मी ते बाबांच्या ऑफिस लायब्ररीतुन मागवतो, किंवा मग स्वतःच विकत घेऊन टाकतो.

Prabhas Gupteprabhas Tuesday, November 25, 2008 4:27:15 AM

थोडं अजुन...
लायब्ररींची नावं-पत्ते आपण गुरु गुगल ना आस्कु शकता.. ते सांगतील तुम्हाला सर्वकाही. bigsmile cool

Anonymous Wednesday, January 20, 2010 6:38:35 AM

MEERA writes: prabhas .....ek jam majja aali ha blog vachatana mhanaje bagha na tumache sthal ekhadyala suchavatana sarvat adhi na tumchaya(navhe apalya)kavadasa cha addres dya. mag na te lok(including u r bhavi vadhu) tumhala agadi chan olakhatil na?..ha ha ha

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies