कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

३३०.. थंडी... आणि प्रगत तंत्रज्ञान...

,

राम राम! bigsmile

कसे आहात? मजेत ना? मी पण मजेत. up

इकडं काल रात्रीपासुन गारवा परत एकदा वाढलाय. तसं काल संध्याकाळीच थंडी बऱ्यापैकी जाणवायला लागली होती. आईला म्हणालो पण मी, "आज थंडी वाजतेय बाहेर." पण आईला तसं काहीच वाटत नव्हतं. p त्यामुळं ’आज थंडी आहे’ हे माझं विधान तिनी साफ खोडुन काढलं. पण मला तर वाजत होती थंडी... रात्री बाबा आले ऑफिसमधुन, त्यांचं पण तेच मत. मग मात्र आईला मान्य करावंच लागलं ते. bigsmile

आज सकाळीपण आहेच थंडी. कात्रज-देहुरोड बायपास हायवेच्या आसपासच्या भागांमधे धुकं होतं थोडंस. शिवाय मोकळा भाग असल्यानं थंडी जरा जास्तीच फिलत होती तिथं. आज येतांना तर मजाच झाली माझी थोडीशी! नेहेमीप्रमाणे हेल्मेट घालुन गाडी ड्राईव्हत होतो. झोप म्हणावी तशी, मनाप्रमाणे पुर्ण न झाल्याने जांभई आली. आणि.. हेल्मेटच्या आतपण धुकं!!! lol सगळ्या वाफा त्या काचेवर आतुन. २-३ सेकंद काही दिसेचना मला. eek तरी बरं, कडे-कडेनी चालवत होतो म्हणुन. lol नाहीतर काहीतरी घडु शकलं असतं. असो.

आत्ताच विरेंद्रशी गुगल टॉकवर चॅटींग केलं थोडंसं. "मी आत्ता.. आगीत आहे.. पेटलाय क्लायंट तिकडे.. मी जातो, दुपारी तुला कॅचतो" असं म्हणाला. पण मला एक प्रश्न पडलाय, की क्लायंट तिकडे पेटलाय, तर मग हा इकडं कसा काय आगीत? तो तिकडं पेटलाय, धग इकडं याच्याकडं? bigeyes confused हां!! idea कदाचित ’रिमोट डेस्कटॉप’ वरुन किंवा मग ’व्हि.एन.सी.’वरुन तिकडं कनेक्टेड असेल हा.. काही सांगता येत नाही.. तंत्रज्ञान केवढं प्रगत झालंय आता! हे असं ’इकडंच्या आगीची धग तिकडं पोचवणं’पण जमत असेल आता.. त्यालाच आस्केन नक्की काय ते, आणि मग तुम्हालापण टेलेन नंतर. आपण हे ज्ञान वाटुन घेऊ! happy ओके?

तुम्हालापण असं काही माहीत असेल तर नक्की सांगा हं प्लिज.. मी माझं ज्ञान अपडेटतोय.

बाकी काय? या गरमागरम चहा घ्यायला. coffee सोबतच ड्रिंकुया. चिअर्स!!!
(ओह! doh चिअर्स करतांना तो कप जरा जास्तीच जोरात हलला आणि सांडला की तो चहा कि-बोर्डवर!!)

३२९.. सकाळची सुरुवात हसुन.. आणि मग क्रिकेटनी..

Comments

Anonymous Tuesday, November 25, 2008 6:48:23 AM

EkVachak writes: he! he!! he!!! 'ikadachya aagi chi dhag tikade pochavan' mastach aahe idea. :) keep it up.. asach dok ladhavat raha, kutherari upayogi padel.

Anonymous Thursday, November 27, 2008 4:46:10 AM

veerendra writes: hehehe .. chhan lihilays .. thank you for sharing link !

Anonymous Thursday, December 4, 2008 5:52:43 PM

GIRISH writes: khup chan. me girish tujha mitra

Prabhas Gupteprabhas Friday, December 5, 2008 6:26:54 AM

Girish, jara ajun olakh sanganar ka ?
mi nahi olakhale.. sad

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies