कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

सकाळची सुरुवात हसुन.. आणि मग क्रिकेटनी..

,

गोड गोड मॉर्निंग! coffee

smile सकाळी सकाळी हसलं की कसं छान वाटतं ना? wink सगळा दिवस मग मस्त मजेत पार पडायला लागतो.

मी तसा आज सकाळी जरा उशीराच उठलोय, उशीरा म्हणजे साडे-सहाला. एरवी साधारण सहाच्या आसपास उठतो. पण सकाळी उठल्या उठल्या आरशासमोर उभा राहुन स्वत:लाच स्माईल दिली एक. happy आहाहा! किती गोड स्माईल ती!! माझ्याएवढी मस्त स्माईल कोणी देऊच शकत नाही!* माझं मलाच फार कौतुक वाटायला लागलंय आता. पण मला मग दुसराच एक प्रश्न पडला. (आज-काल मला फारच प्रश्न पडायला लागले आहेत. भिती वाटायला लागलीये त्यामुळं. sad ) तर, प्रश्न असा पडला की, रस्त्यानी जाता-येता मी इतक्या सुंदऱ्यांकडे बघुन हसलोय, एकीचीपण विकेट कशी नाही पडली? पण जाऊच दे! काही प्रश्नांची उत्तरं न मिळालेलीच चांगली!! bigsmile wink

आणि मग घाई-गडबडीनं आवरायला घेतलं. आज बुधवार ना! क्रिकेट खेळायला जातो मी बुधवारी.. तसं आज पण जायचं होतं. खरंतर सात ते नऊ बुकींग असतं नेटचं, त्यामुळं मला साडे-सहाला तरी घरातुन निघावंच लागतं. पण आज उठलोच साडे-सहाला! p म्हटलं आता बोंबला.. सातला कॅप्टनचा फोन येणार! "कुठे आहेस?" आंघोळीला गेलेलो तेव्हा नेमकी त्याची रिंग येऊन पण गेली मोबाईलवर. म्हणुन मग उलट कॉल केला तर तोच सांगायला लागला मला "अरे मी उशीरा उठलोय - साडे सहाला. सव्वा सात पर्यंत येतो गाऊंडवर." "मी पण साडे सहालाच उठलोय, मी पण सव्वा सात पर्यंत येतो." bigsmile म्हटलं चला! सुंठीवाचुन खोकला गेला!!

आज क्रिकेट खेळायला मजा आली पण. चौघंच होतो, पण मजा तर आली. एक विकेट पण मिळाली - झेल व गोलंदाज प्रभास. cool बाकीचे बॉल व्यवस्थीत स्टंप्सच्या आसपास होते. समाधान लाभलं नीट बॉलींग करण्याचं. smile बॅटींगपण केली आज. व्यवस्थीत खेळतापण आलं (कधी नव्हे ते!). बाकी मैदानावरुन विशेष असं काही नाही.

आज इकडे आकाशात काहीतरी चालु होतं. bigeyes काहीतरी म्हणजे.. आधी तीन विमानं त्रिकोणी आकार बनवुन घिरट्या घालत होती. कोणत्या जातीची विमानं होती काय माहीत, पण होती बारकीच तशी. तीन-चार वेळा घिरट्या घातल्या मग गेली. नंतर थोड्यावेळानी तीन हेलीकॉप्टर्स पण गेली तसाच त्रिकोणी आकार बनवुन. कसलातरी सराव चालु असेल त्यांचा. काय माहीत...!

तुमचं काय चालु आहे? (हो.. हो.. माझा ब्लॉग वाचताय ते माहीत आहे, त्या व्यतिरीक्त काय चालु आहे असं विचारतोय मी!) आज काही विशेष करण्याचा प्लान काही? माझा तर आहे बुवा! आज ऑफिसमधुन घरी गेलो की मस्त पैकी ’मिडनाईट-क्लब’ गेम खेळत बसणार आहे! त्यातली ती झेंड्यासाठीची रेस!! मजा येते खेळायला. ’रोड रॅश’चं फुल्ल वर्जन आहे का हो तुमच्याकडे? माझी होती सि.डी. त्याची, पण कोणाला दिली तेच आठवत नाहीये. पण त्या बाप्यानी एकतर तीला हरवुन टाकलंय किंवा मग ढापलीच. काय असतात एक-एक जण... देतच नाहीत वस्तु परत! असो.

या कॉफी घ्यायला! coffee एकत्रच घेऊया! smile कॉफी घेऊ आणि मग लागुया आपाआपल्या कामाला! नाही का?

३३०.. थंडी... आणि प्रगत तंत्रज्ञान...मुंबई... पुन्हा एकदा...

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies