कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

३३३

,

सुप्रभात...! प्रभास कडुन..! up

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला अजुन एक दिवस सुरु झाला! headbang lol

तर मग, आजचा काय प्लान? (काय हा माणुस आहे, दर वेळी आपला ’काय प्लान.. काय प्लान’ हेच आस्कत असतो.)
हो, मान्य आहे की मी नेहेमीच आस्कतो हा प्रश्न तुम्हाला, पण आज शुक्रवार ना! बऱ्याच जणांसाठी आठवड्याचा कामाचा शेवटचा दिवस!! त्यामुळं म्हटलं काहीतरी शिजवुन ठेवलेलं असेल तुम्ही आज संध्याकाळसाठी, किंवा मग शनिवार-रविवारमधे कुठेतरी बाहेर जाण्याचं ठरवत असाल. wink नसेल ठरवलं तर ठरवा ना!! विक-एन्ड असतोच त्यासाठी!!! party

बरेच दिवस झाले मी कुठं भटकंतीसाठी बाहेर नाही पडलोय. लोनावळा वगैरे जावं म्हणतोय. पण आमचे मित्र-मंडळी असे आहेत ना, ऐन वेळी दगा देतात. त्यामुळं सगळं काही ’रन-टाईम’लाच ठरवतो मी आजकाल. हो ना हो, आता हेच बघा ना - मागच्या वेळी (म्हणजे जानेवारीत बरं का) लोहगडला जायचं ठरवलं होतं. माझे नाशिकचे चांगले आठ-दहा मित्र आहेत पुण्यात. सगळ्यांना नीट आठवडाभर आधी टेललं होतं, सगळ्यांनी होकार पण कळवले होते. आणि ऐन जायच्या वेळी उगवले फक्त दोन! मी तिसरा. down

पण आजकाल मला विक-एन्डला कंटाळच येतो. एकतर मी, महेश आणि भरत, असं तिघंच असतो. त्यातुन बोलणार किती आणि काय काय? उगाचच काहीबाही बोलत एकमेकांची खेचत सिटलेलो असतो आम्ही. खुप काही मुड नसतोच आमचा. मग आपलं उगाच सटर-फटर, हलाना-फलाना बडबडायचं आणि निघायचं. गेले कित्येक शनिवार किंवा रविवार आमचं हेच चाललंय. बऱ्याचदा मी शनिवारी एखादं पुस्तक रिडायला सुरुवात करतो, आणि रविवार संपता-संपता ते संपवतो. त्यामुळं मग शनिवार तरी जरा निट पार पडतो. पण रविवारी आम्ही सगळे (सगळे म्हणजे तिघं) भेटतो, आणि मग मगाशी सांगितलेला क्रम सुरु होतो. knockout अक्षरशः रिपीट टेलिकास्टच!

काही तरी उपाय शोधलाच पाहिजे यावर... काय बरं करावं?? confused
छे! काही सुचतंच नाही बघा.. sad
बघु, उद्या संध्याकाळ पर्यंत काही सुचतं का ते.. नाहीतर आहेच ते रिपीट टेलिकास्ट.

या शनिवारी, म्हणजे उद्या ते ’द अल्केमिस्ट’ परत रिडायला घेतोय. खुप आवडतं मला ते पुस्तक! खास करुन त्यात दिलेले ते विचार...! मस्तच!
उगाचच नाही रेकॉर्ड-ब्रेकींग बेस्ट सेलर पुस्तक बनलंय ते! happy आता चौथ्यांदा वाचेन मी ते.. (हो, बहुतेक चौथ्यांदाच.) eek पाठच होणार ते माझं आता. lol पण त्यातले विचार खुप आवडतात मला. smile

बाकी बघु रविवारी दिवसभर काय करायचं ते. नाहीतर बसुन राहिन टवाळक्या करत.. घरातच.. आणि मग संध्याकाळी संभाजी पार्क किंवा झेड-ब्रिज.
नुसतचं इकड-तिकडं बघत... left right whistle

या, कॉफी ड्रिंकु... या ना! (आवारा पागल दिवाना मधला ’गुरु गुलाब खत्री’ आठवला काय? घाबरु नका! तो मी नव्हेच!!)
कधीचा बोलावतोय मी.. आपलीच आहे ती... कॉफी हो! coffee चिअर्स!!

मुंबई... पुन्हा एकदा...वाऱ्यावरती गंध पसरला...

Comments

Rahulrahulwaghamare Friday, November 28, 2008 5:12:48 AM

आम्हाला तर फक्त रविवार भेटतो राव, बघु मी पण विचार करतोय अल्केमि्स्ट वाचायच.
नाहीतर मग फिरु मस्त.

chimanrao Friday, November 28, 2008 7:25:26 AM

प्रभास,

भीमथडी जत्रा चालू आहे ऍग्रीकल्चर कॉलेज ग्राऊंडवर.

काहीच करण्यासारखे नसेल तर एकदा नक्की अनुभवण्यासारखा प्रकार आहे.

तुम्ही खवैय्ये असाल तर मग पर्वणीच आहे तुम्हाला.

Prabhas Gupteprabhas Friday, November 28, 2008 7:52:29 AM

हो! मी विसरलोच होतो ते!! धन्यवाद चिमणराव!! smile

Anonymous Monday, December 1, 2008 6:58:23 AM

Sunita writes: Hi Prabhas, tujhyakade weekendsathi plan nahi???????? kase shakya ahe........ ata jar director sahebch ase bolle tar bakichyanni kay karayche :p dnt worry hahi weekend ekdum rocking janar, shodhshinch tu kahitari....... :)

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies