कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

वाऱ्यावरती गंध पसरला...

, , ,

गोड गोड मॉर्निंग! coffee
( ह्या कप मधे चहा आहे, एरवी बहुतांश वेळा कॉफी असायची. पण आता कंटाळलो कॉफीला, म्हणुन आजपासुन चहाच. bigsmile )

इकडे परत एकदा ’वाऱ्यावरती गंध पसरला’च!! पुन्हा एकदा पाऊस झालाच! आणि सरते शेवटी मला पडायचा तो प्रश्न पडलाच!!! (बऱ्याच दिवसांत प्रश्न पडला नव्हता ना!!) अजुन किती वेळा पडणार हा पाऊस असा? पावसाळा एन्डुन कितीतरी दिवस झालेत. तरी आहेच हा बाप्या मधुन मधुन... अरे किती वेळा? तो हिवाळा एक तिकडं (सॉरी सॉरी इकडं p )येऊन-जाऊन आहे, आणि हा बंडु आहेच मधुन लुडबुड करत. या ढगाळ हवेमुळे काल सकाळपासुन थंडी अशी नव्हतीच. होता तो फक्त सकाळचा गारवा. बास्स! मग रात्रीतर पाऊसच.

हा! पण काल कामामुळे आलेला प्रचंड कंटाळा मात्र त्यानी एका क्षणात पळवुन लावला... हे मात्र नक्की! काल तर जाम वैतागलो होतो कामाला. खुपच! काही विचारुच नका!! सारखी चिडचिड होत होती. एकतर काल सकाळपासुन माझं डोकं दुखत होतं, त्यात या कामाची भर. काल संध्याकाळी उशीरा थांबलं डोकं. पण सबंध दिवसभर पिच्छा पुरवला त्या दुखण्यानी माझा! काय करणार? असतात एकेकाचे भोग!! sad (काल ब्लॉगवर दांडी मारण्याच्या असंख्य कारणांमधे हे पण एक कारण आहे.) पण हा पाऊस पडायला लागला, हवेत तो ओल्या मातीचा वास पसरला, आणि बघता-बघता माझा मुड बदलायला लागला. बदलला सुद्धा! wink बाकी पावसात भिजायला नाही मिळालं तरी डोकेदुखी मात्र नक्की विसरायला लावली त्यानं मला!! थॅंक्स पावसा.. happy

सध्या लाईफ असं काही विशेष नाहीच राहिलेलं.
उठायचं.. आवरायचं.. ऑफिसला जायचं.. काम, काम, काम... घरी जायचं.. जेवायच.. झोपायचं.. बास्स.
यापलीकडे काहीच नाहीये. एकदम कंटाळवाणं झालंय जीणं..
असं वाटतंय सुट्टी घ्यावी महीनाभर, आणि नाशिकला जाऊन रहावं.. आपल्या गावी.
तिकडे बरीच ठिकाणं आहेत जी मला नवी उमेद देतात.
माझी माणसं आहेत ज्यांच्यासोबत माझा वेळ नेहेमीच चांगला जातो. love
बघु, कधी सुट्टी घ्यायचा योग येतो ते! तोपर्यंत आहेच नेहेमीचं.. sad

हं... सध्या इतकंच. लागतो आता कामाला.

या चहा घेऊया मिळुन.. smile

३३३३४४.. थंडी.. आणि ’मिरचीदार चहा’

Comments

Anonymous Tuesday, December 2, 2008 4:40:08 AM

Sunita writes: god god morning कवडसा :) are chanch ki paus jhala mhanje.....mast vatavaran jhale ashnar, ekde nashkat kaal khup vijancha gadgadat jhala pan varun rajanchi krupadrusti matr nahi jhali....... baki tujhe he matr khare....lifemadhe ase kahi vishesh nahich rahilel tech rozche office n ghar,ghar n office baki kahi nahich...... pan ata jar hech honar asen tar tyabaddle takraar karnyapeksha...lets rock the code(kaam)....ya kamacha fadshach paduya..... :yes: cheers!!!!! bye have a rocking day!!!! :)

Anonymous Tuesday, December 2, 2008 11:22:42 AM

Pankaj writes: ho Prabhas ye apan parat bhatku ya. Me hi jam vaitaglo ahe. New place findout karto ahe me. ye.

Prabhas Gupteprabhas Tuesday, December 2, 2008 11:26:48 AM

ekdum, sindabaad zalas ki kay? bigsmile
pankaj.. the sindabaad p

Anonymous Tuesday, December 2, 2008 11:33:02 AM

भुंगा.. writes: ... कल्पना - आयडिया - छान आहे... माझाही तोच विचार आहे...! पढच्या आठवड्यात परतल्यानंतर - मस्त - पुन्हा एकदा हरिश्चंद्र गड भेट द्यावी म्हणतोय ..! तुम्ही काही लोकेशन शोधत असाल तर - ती भटकंती साईट - ब्लौग [http://bhatkanti.blogspot.com]- अधिक माहिती देऊ शकेल..

Prabhas Gupteprabhas Tuesday, December 2, 2008 11:39:19 AM

ho! mi atta toch blog baghat hoto!! smile

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies