कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

३४४.. थंडी.. आणि ’मिरचीदार चहा’

,

नमस्कार! तसा मी बरोब्बर आठवड्यानंतरच उगवलोय इथं. काय करणार? काही कारणांमुळं वेळ मिळतंच नव्हता इथं लिहायला. पण आज मात्र मिळाला! आणि मी ही संधी बिलकुल वाया जाऊ द्यायची नाही असं ठरवलंच. म्हटलं आज काहीही झालं तरी तुमच्याशी गप्पा मारायच्याच! गप्पा मारणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी बजावणारच! त्यासाठीच तर हा ब्लॉग सुरु केला मी... असो. माझं राहु द्या बाजुला. तुमचं काय? कसे आहात? मस्तच असाल. smile

आजकालची हवा मात्र एकदम बेस्ट आहे. हो ना? आकाश कसं स्वच्छ असतं.. मधुन-मधुन ढगांची रांगोळी असते... सुर्यप्रकाश एकदम लख्ख! रविवारी दुपारी अशीच एक रांगोळी उमटली होती आभाळात, आणि मी ती मोबाईलच्या कॅमेऱ्यातुन क्लिकली. हया रांगोळीचा फोटो मी इथं ठेवला आहे. जरा मोठा फोटो असल्यानं पोस्टमधे नाही टाकला. (फोटोंच्या पानावर ’माझी फोटोग्राफी’ नावाचा अल्बम.) तसा हिवाळ्यामुळं दिवस लहान होत चाललाय खरा, पण जेवढा वेळ सुर्य असतो तेवढा वेळ मात्र स्वच्छ आणि स्पष्ट सुर्यप्रकाश असतो. स्वेटर्स कधीच बाहेर निघालेत आता. आणि वर्ष-अखेर जवळ येत चाललीये तसतसं गारठा वाढतंच जाणार आहे. कालचं पुण्यामधे किमान तापमान ११.९ अंश सेल्सिअस नोंदलं गेलं आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार दिवसांत किमान तापमान सुमारे आठ अंशांनी घसरलंय. त्यामुळं यंदाची थंडी एकदम दणक्यात असेल असं दिसतंय. smurf

मला अजुनही आठवतं, कॉलेजमधे असतांना आम्ही क्लासला जायचो सकाळी-सकाळी. आणि सर येईपर्यंत छोटीशी शेकोटी करुन त्याभोवती गोळा होऊन हात शेकत बसायचो. नंतर दुसऱ्या क्लासला गेलो, तिथं आमचं (आमच्या कॉलेजच्या समस्त पब्लिकचं) एक छोटं हॉटेल - बाबा - ठरलेलं होतं, तिथं जाऊन चहा पिणं हे क्लासपाशी आल्यावरचं पहिलं काम! तो चहा-विथ-गप्पा झाला की मग सावकाश क्लासमधे घुसायचं. एखाद्या दिवशी दाट धुकं पडायचं आणि आम्ही क्लास संपला की लगेचच कॉलेजच्या बोट क्लबकडे धुम ठोकायचो. मला अजुनही आठवतंय ते सगळं... सगळं काही मिस करतोय मी आता.. असं वाटतं हे जॉब वगैरे पेक्षा ते कॉलेज लाईफच किती बरं होतं..! कोणी जर मला विचारलं "तुझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला काळ कोणता?" तर मी म्हणेन बि.सि.एस.ची ती तीन वर्ष!! या तीन वर्षांत केलेल्या दंगा-मस्तीपैकी काही निवडक मी इथं, इथं आणि इथंपण लिहिल्या आहेतच आधी.

तुम्हाला दाखवायला अजुन एक नविन प्रकार आणलाय मी आज. ’मिरचीदार चहा’ पाहिलाय का कधी? lol मी आणि भरत परवा चहा प्यायला गेलेलो, आणि मला एकदम हा नविन प्रकार सुचला चहाचा. idea आम्ही लगेचच ही कल्पना सत्यात उतरवली. त्याचे पण फोटो क्लिकले मी! ते पण लावलेत इथं. (फोटोंच्या पानावर जाऊन ’सटर-फटर, हलाना-फलाना’ अल्बम पाहिलात तरी त्यात सापडेल.)

या, आई-बाबा नाशिकला गेलेले तर त्यांनी नाशिकचा सुप्रसिद्ध ’कोंडाजी चिवडा’ आणलाय, तो खाऊ या. झक्कास असतो तो! मी तोच खातोय आत्ता. तुम्ही पण चाखुन बघाच. happy

वाऱ्यावरती गंध पसरला...३४५

Comments

Anonymous Tuesday, December 9, 2008 4:37:12 AM

Sunita writes: god god morning prabhas, aaj khup divsanni bhetlas, kuthe gayab jhala hotas.......... baki thandiche divas astaatch havehavese vatnare, (ha ha ha)'mirchidaar chaha' wa kay sankalpana ahe,pan ti mirchi purn budvleli nahiye,chav ghetlis ki nahi tikhat chachachi :) ’कोंडाजी चिवडा’ mhanje aamchya nashikchi shaan ahe,enjoyyyyyy!!!!!!! bye bye, have rocking day!!!!!! :)

Prabhas Gupteprabhas Tuesday, December 9, 2008 4:40:12 AM

mi nahi, photot disanarya vyakti ni ghetali.. smile

baki kondaji chivada tar best ch aahe! mi khup khallay to.

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies