कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

३४५

,

hi गोड गोड मॉर्निंग! coffee <-- यात चहा आहे, कॉफीला तिलांजलीच आता बहुतेक.

हं.... २००८ वर्ष संपायला आलं सुद्धा! शेवटचा महिना सुरु आहे.. तो पण संपेलच बघता-बघता. मुळातच २००८ हे वर्ष बऱ्याच धावपळीचं, धांदलीचं, आणि घाईघाईत चाललंय. इतकं की, निवांतपणे इकडं-तिकडं बघायलापण वेळ नाही मिळत. काल रात्री मी सहज म्हणुन आठवुन बघत होत, २००८ या वर्षात माझ्या आयुष्यात घडलेल्या घटना आणि घडामोडी. ’घडामोडी’ या शब्दाची एक फोड मला करावीशी वाटते - चांगल्या गोष्टींनी भरलेला घडा आणि मोडीत निघालेल्या गोष्टी. मला सुद्धा आठवुन आठवुन पहावं लागत होतं. आणि झोप लागेपर्यंत तर मी फेब्रुवारीच्या पुढे सुद्धा आलेलो नव्हतो. एकंदरीत खुपच व्यस्त गेलंय हे वर्ष तर! येत्या आठवड्यात मला हे काम पुर्ण करायचंच आहे. बघु तर, कसं घालवलं हे वर्ष आपण. sherlock

होतं काय, प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला खुप छान-छान संकल्प सोडतो आपण. पण.. संकल्प सोडतो ते सोडुनच देतो! फेब्रुवारी सुरु होऊन संपेपर्यंत बरेचसे संकल्प बासनात गुंडाळले जातात. त्यामुळंच, यंदा मी असं ठरवलंय की आधी बघायचं चालु वर्ष आपण कसं घालवलं, आणि त्यानुसार पुढल्यावर्षीचे संकल्प ठरवायचे. त्यासाठीच खटाटोप हा सारा! bigsmile p wink

तुमचे पण काही संकल्प सोडायचं ठरत असेलच. "काहीतरी संकल्प सोडुया यंदा" असा तरी संकल्प असतोच कमीत कमी. आता तर केवळ २२ दिवस उरलेत.. आजचा दिवस मोजुन. पुरेसा वेळ आहे तसा हातात, पण काम हातावेगळं करुन ठेवलेलं बरं! wink

पुढल्या काही दिवसांनी माझ्या लॅटपॉटचा पहिला वाढदिवस! party त्यासाठी पण काहीतरी ठरवायचंय मला. बघु काही सुचतं का ते..

काल रात्री ’धनंजय’ मासिक वाचलं. रहस्यकथा, भयकथा, विज्ञानकथा यासाठी प्रसिद्ध आहे ते. तीन भयकथा वाचल्या पण त्यातली एकही कथा वाचतांना भिती वाटली नाही. ’बेडर’ झालोय बहुतेक.. rolleyes असो.

बाकी विशेष काही नाही.
चला, बाय-बाय, टाटा! भेटु या लवकरचं..! bye

३४४.. थंडी.. आणि ’मिरचीदार चहा’काही नाही, डास चावला...

Comments

Anonymous Wednesday, December 10, 2008 4:31:37 AM

Sunita writes: god god morning prabhas, prabhas he tu barobar bollas gele varsh kase gele yacha magova tar ghyaylach hava,tyavrun aaplyala yenarya navin varshache planning neet tharvta yetin,jhalelya chuka durust karta yetin n je changle kele te continue hi karata yein :) sanklp varun athvle collegela astana(B.C.S.) decembercha shevtcha aathvda kimbhuna purn mahina mhatle tari chalen amhi(chaukat) kattyavar basun hech tharvaycho,agdi vyavsthit planning sudhha vayche kon kuthla sanklp karnaar yaache(he he he)....pan Feb start hota hota te kuthe gayab vayche he amhalahi kalayche nahi :P me tar vichar kelay ata kahi tharvayche nahi direct karunch dakhvayche...yess no planning direct action :) (baghuya kkay hote te :P) one more thing i hate horror stories(tyamule tyabaddle n bollelch bar....) bye bye, have a rocking day!!!! :)

Prabhas Gupteprabhas Wednesday, December 10, 2008 4:36:39 AM

pratyekachi tich katha asate.. thode far ikade tikade! p

mala just atta ek suchale, 'kahich na-karanyacha sankalpa' karayala pahije.
mhanaje, parampare nusar to pan follow honar nahi ani kahitari kele jail. p wink bigsmile cool happy

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies