Skip navigation.

३५०

, ,

गोड गोड मॉर्निंग!

यंदाचा विक-एन्ड खुपच चांगल्याप्रकारे पार पडला. हो ना! मागच्या पोस्टमधे म्हटल्याप्रमाणे ’यक्षप्रश्न’च होता तो माझ्यासमोरच्या. पण यावेळी खुप मजा-मस्तीमधे गेला विक-एन्ड. (सॉफ्टवेअर कंपनीमधे कामाला असल्यानं मला जरा अतिच कौतुक आहे त्या विक-एन्डचं.) शनिवारी तर मी थोडावेळ ऑफिसमधे येऊन गेलो, मग संध्याकाळी घरीच होतो. पण कंटाळा बिलकुल आला नाही बघा. त्या ’धनंजय’ मासिकातल्या काही विज्ञानकथा वाचुन काढल्या. बऱ्या वाटल्या. (कंटाळवाण्या नक्कीच नव्हत्या.) तर असा तो शनिवार व्यवस्थीत पार पडला. :smile:

रविवारी संध्याकाळी आमच्या त्रिकुटाची - मी, भरत आणि महेश - नेहेमीप्रमाणे भेट ठरलेलीच. संध्याकाळी पावणेसहाच्या सुमाराला मी आणि भरत भेटलो बालगंधर्वला. महेशला यायला वेळ होता म्हणुन तोवर एक-एक कप चहा ढोसला ’चहा+वडापाव+डोसा’च्या टपरीवर. टपरी तशी मोठी आहे, महाटपरी म्हणु पाहिजे तर. यावेळी परत एकदा भरतला ’मिरचीदार चहा’ पाजला. त्याचं काय झालं, महाटपरीवर पोचण्याआधी भरत एका दुकानात गेला. मी तोपर्यंत पुढं जाऊन दोघांसाठी चहा मागवला. चहा आला तरी भरत आलाच नव्हता. तेवढयात मला त्या ’मिरचीदार चहा’ची आठवण झाली! मग मी सरळ समोरच्या ताटलीतली एक मिरची उचलली आणि डायरेक्ट बुडवलीच भरतच्या कप मधे. थोडावेळ तशीच ठेवुन मग काढुन टाकली. पाठोपाठ भरत आलाच. मग आम्ही दोघांनी गप्पा मारता-मारता आपापले कप संपवले. चहा पिऊन झाल्यावर भरतला विचारलं, "कसा लागला चहा?" "चांगला लागला!", भरतचं उत्तर. "अरे मिरचीदार चहा होता तो... ते टपरीवाले काका आहेत साक्षीदार." "........." असा फ्लेवर्ड-चहा पिण्याची भरतची तशी दुसरी वेळ. या आधी नाशिकला असतांना त्यानी सॉस घातलेला चहा पिलेला. (तो महेश आणि माझा कारनामा होता.) पण तेव्हा त्याचा विश्वास बसत नव्हता. यावेळी मात्र बसला. ठेवावाच लागला, साक्षीदार होता ना या वेळी! :ko:

नंतर महेश आला. मग आम्ही तिघं जणं गेलो ’दोन सिमकार्डचा मोबाईल’ बघायला. म्हटलं नुसतंच चकाट्या पिटत बसण्यापेक्षा ते बरं! तीन दुकानं फिरलो आणि तीन वेगवेगळ्या किमती ऐकुन बाहेर पडलो. मस्त आहे पण तो मोबाईल. याच आठवड्यात घेऊन टाकेन. मग फारसं काही केलं नाही. संभाजी पार्कमधे बसुन थोड्या गप्पा मारल्या, एकमेकांच्या उडवल्या आणि परतलो घरी. स्नो-बॉलमधे आईसक्रिम खायचं ठरवलं होतं, पण घरी परतायच्या घाई-गडबडीत ते विसरुनच गेलो आम्ही. असो, पुढच्या विक-एन्डला खाऊ.

हुश्श्श...! अशाप्रकारे विक-एन्डची व्यवस्थीत सांगता! रविवार फुल्ल-टु एन्जॉय केल्यामुळं एकदम ताजंतवानं होऊनच सोमवारी कामावर जाणार! तसं सोमवार म्हटलं की काम नकोसंच वाटतं, पण सध्यातरी काही पर्याय नाही दुसरा. स्वतःचा व्यवसाय असला तर निराळी गोष्ट. पण होईल... ते पण होईल.

तुमचा कसा गेला या वेळचा विक-एन्ड? काही विशेष या वेळी? आहे? सांगा की मग! :smile::D

१५००० !!!३५१

Comments

Anonymous 15. December 2008, 05:29

Sunita writes:

god god morning prabhas,

chan mastch enjoylas tu ha weekend.... :)
ani jevdha weekendcha prashn tumhala asto tevdha amhala nastoch
karan amhala saturday working aste na,mag rahila prashn sundaycha
to tar keva starto n keva endto samjat pan nahi :(


bye bye
have a rocking day!!!!

Anonymous 15. December 2008, 06:50

भुंगा.. writes:

एकंदरीत हा विकेन्ड मस्त गेलेला दिसतोय ..! सही!
... आम्ही पण ट्रेकला गेलो होतो.. कोराईगडला... ट्रेक नाही म्हणता येणार.. वन - डे पिकनिक म्हणता येईल, हवं तर.. मस्त पाय-या आहेत चढायला.. त्या ऍम्बी वॅली वाल्यांची कृपा!

येता - येता पवना डॅम ... बोटिंग ... मजा आली... संडे मस्त आरामात काढला... अर्थात असा ट्रेक वगैरे झाला म्हणजे दुसरा दिवस असा लोळत काढण्यातच सौलिड मजा असते..!

... असो.. बाकी.. माझ्या ब्लौग वर लिहिन .. वेळ मिळाला तर ...

... भुंगा..
http://bhunga.blogspot.com

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

Type the two words displayed in the image below:


Smilies

July 2009
S M T W T F S
June 2009August 2009
1 2 3 4
5 6 7 8 9 10 11
12 13 14 15 16 17 18
19 20 21 22 23 24 25
26 27 28 29 30 31