कवडसा

माझा ब्लॉग मुक्तछंदात... बिलकुल नाही कोणत्या फंदात!

कवडसा बदलणार! कात टाकणार!!

,

मागच्याच आठवड्यात माझ्या ’’र-फ’ची भाषा’ या पोस्टला एक अगदी परखड प्रतिक्रिया मिळाली. माझ्या ब्लॉगवर मिळालेली ही पहिलीच परखड प्रतिक्रिया. निनावी वाचकानी दिली आहे ती. पण मला ती प्रतिक्रिया वाचुन खरंच खुप बरं वाटलं. इतके दिवस ज्या काही प्रतिक्रिया मिळत होत्या त्या बहुतेक सगळ्याच कौतुक करणाऱ्या. एखाद-दुसरी थोडी सिरीयस. पण परखड प्रतिक्रिया अशी नव्हती. ती कमतरता आता भरुन निघाली.

खरंतर सततच्या कौतुकानी मी सुद्धा थोडा कंटाळलोच होतो. तोच-तोच पणा आला होता ब्लॉगवर. पोस्ट पण सगळ्या तसल्याच. बहुतेक विक-एन्डवर तर, नाही तर असंच सटर-फटर. काहीच सुचत नव्हतं काय लिहावं, कशावर बोलावं.. तेवढ्यात ती ’र-फ’ची भाषा आठवली आणि तीच रखडुन टाकली. पण खरंच त्या पोस्टमधे विशेष असं, आवर्जुन वाचण्यासारखं काहीच नव्हतं. आणि त्या निनावी वाचकानी बरोब्बर त्यावरच बोट ठेवलं. पण मुद्दा अगदी बरोबर सांगितला त्यांनी. ही निनावी व्यक्ती रोजच ब्लॉग वाचते माझा. (सगळंच लिखाण त्यांना आवडतं असं मी म्हणत नाही, काही लिखाण परत वाचल्यावर मला सुद्धा नाही आवडत. पण माझा एक दंडक आहे, एकदा का ब्लॉगवर लिहीले की ते काढायचे नाही. त्यानुसार मग ते लिखाण मी तसंच ठेवतो.) आणि असलं फालतु काही लिहुन मी माझ्या वाचकांचा वेळ वाया घालवावा हे काही बरोबर नाही. उगाचच मारुन-मुटकुन, काहीतरीच लिहण्यापेक्षा एखादा दिवस न लिहिलेलं परवडेल. त्या प्रतिक्रियेनी खरंच मला विचार करायला भाग पाडलं. आणि मग मी यावर खुप विचार केला. नुसताच विचार नाही केला तर मी खरंच मागच्या तारखांचं लेखन परत एकदा वाचुन पाहीलं. मलाही ते काही खुप खास नाही वाटलेलं. म्हणजे माझ्या वयाच्या मानानं तरी ते साजेसं नाहीच.

मला काही खुप सिरीयस नाहीच लिहायचंय इथं. पण अगदीच उथळ पण नको ना! माझा स्वभाव काही खुप सिरियस नाहीये. पण याचा अर्थ ’मी इथं काहीही सटर-फटर लिहावं’ असा होत नाही. हो ना? आता काही लोक असंही म्हणतील की हा माझा ब्लॉग आहे, आणि मला वाटेल ते मी इथं लिहावं. त्यांचंही आहेच बरोबर. माझ्या ब्लॉग वर मी काय लिहावं याचं मला पुर्ण स्वातंत्र्य आहे. पण काहीतरी व्यवस्थीत लिहावं मी. ब्लॉग हे एक असं साधन आहे, की ज्याद्वारे मी संपुर्ण जगाशी संवाद साधु शकतोय. आणि त्यामुळंच माझा ब्लॉग मी व्यवस्थीत चालवावा ही जबाबदारी माझ्यावर येतेच. आणि म्हणुनच मी असं ठरवलंय की, अगदी रोज ब्लॉगवर काही लिहायलाच पाहीजे असं नाही. एखाद्या दिवशी नाही लिहिलं तरी काही होत नाही. (या गेल्या एक-दोन आठवड्यांत तसंच झालंय म्हणा.) पण जे काही लिहिन ते व्यवस्थीतच असेल. मी शक्यतो माझेच विचार इथं मांडेन. (जसं मी बऱ्याच वेळा केलंय.) पण आता ते अधिक परिपक्व असावेत ही माझी जबाबदारी. मी या बदलाला सामोरा जायचं ठरवलंय. आणि मला विश्वास आहे की हा बदल नक्कीच स्वागतार्ह असेल!

धन्यवाद निनावी वाचक! तुमची परखड प्रतिक्रिया आली नसती तर मी हा विचार करुच शकलो नसतो!!

’र-फ’ची भाषा...इंटरनेट केबल्स तुटल्यात..

Comments

Anonymous Monday, December 22, 2008 4:56:36 AM

Sunita writes: gud morning prabhas, tu evdha vichar kelach ahes tar changli gosht ahe... pan mala nahi vatat tya post madhe ase kahi vichitr hote mhanun, ani vyavsthit mhanje tari kay re.....ha blog ahech personal bolg mhanje to vachtanach apan ata prabhas baddle kahitari navin vachnar ase manat astech mag tyat vaeet kahich nahiye........ tujha blog kahi educational kiva kahi specific vishayacha nahich ahe, to pabhas cha personal bolg ahe,jithe to tyache anubhav,tyache vichar mandto.... ani vachkanna te aavdtaat hi.....ani BTW he changli gosht ahe ki tu saglyanchi matancha aadar kartoyes pan je lok tujhe kautuk kartaat tehi kahi ugichch nahich karat,je changel ahe te ahech ani tyache kautuk vaylach have,ase mala tari vaate... baki tu tharvlech ahes tar kar tu badal...... pan je vichar yapudhe yenaret tehi naturally eude...karan je manapasun yenar tech khare baki sajvun dhajvun ani kunala aavden ki nahi ha vichar karun ugich tujhya likhanat banavatpana nako anus mhanje jhale baki jase tu bollas tujha blog ahe,teva kay karayche te tuch tharvnaar..... pan majhe he ase vichar ahet, i like to read wat comes straight from heart afterall that makes you unique from others, the originality..... [punha sutlech..... :P] bye bye have a rocking day!!!!! :)

Anonymous Monday, December 22, 2008 6:36:19 PM

Anonymous writes: I really appreciate you taking my comments in good stride. Please keep writing...It has been a pleasure reading your blog! One reason besides others that brings me to your blog often is your spontaneous writing style and so was my comment(spontaneous) last week!.

chimanrao Tuesday, December 23, 2008 7:33:07 AM

"विचार अधिक परिपक्व असावेत"
"मी या बदलाला सामोरा जायचं ठरवलंय."



प्रभास,
अरेच्चा! एकदम गंभीर??
काय लग्न बिग्न ठरलंय का काय?bigsmile
(अजुन ब्रम्हचारी असशील असे गृहीत धरलंय. चू.भू.दे.घे.)

Prabhas Gupteprabhas Tuesday, December 23, 2008 7:40:11 AM

हो, चू.भू. द्यावी-घ्यावीच लागणार! bigsmile

chimanrao Wednesday, December 24, 2008 8:41:43 AM

स्वारी हां वाईच गफलत झाली. तुमचा फोटू पाहून वाटले नाही हो तसे.
पुन्यान्दा स्वारी.

Prabhas Gupteprabhas Wednesday, December 24, 2008 8:59:08 AM

baap re! maza photu baghun watal nahi mi bachelor aahe asa ???

chimanrao Tuesday, January 6, 2009 6:01:29 AM

अरे! ब्रम्हचारी असाल असेच गृहीत धरून म्हटले होते की लग्न ठरले की काय?
असो. फोटूत अगदी उपवर दिसताय.lol

जरा उशिराच पण नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!drunk

Prabhas Gupteprabhas Tuesday, January 6, 2009 6:09:42 AM

ओह.. doh

चु.भु.दे.घे... bigsmile

हा... अगदी नुकताच 'उपवर' कॅटेगरी मधे आलोय. p

नुकतेच ’रौप्य महोत्सवी वर्षात’ पदार्पण केले ना! happy

How to use Quote function:

  1. Select some text
  2. Click on the Quote link

Write a comment

Comment
(BBcode and HTML is turned off for anonymous user comments.)

If you can't read the words, press the small reload icon.


Smilies