
चांद्रयानाचे १०० दिवस!
Friday, 30. January 2009, 03:19:44
चांद्रयान, अभिमान, भारत
चंद्राभोवती १०० किलोमीटरच्या कक्षेतुन प्रदक्षिणा मारणाऱ्या चांद्रयानाच्या उड्डाणाला आज १०० दिवस पुर्ण होत आहेत.

या काळात यानानी चंद्राच्या पृष्ठभागाची चक्क ३० हजार पेक्षा जास्ती छायाचित्र काढली आहेत. चंद्राबाबतच्या अनेक रहस्यांवरचा पडदा ते उचलतील अशी शक्यता आहे.

चांद्रयानाच्या कामाचा आढावा घेणारी एक बैठक कालच बेंगळुरुमध्ये सुरु झाली आहे. जगभरातुन ७० शास्त्रज्ञ यात सहभागी झालेत. या सगळ्यांनीच यानाच्या कामाचं कौतुक केलंय.

"अपोलो याने खरोखरच चंद्रावर उतरलली होती का?" याची सत्यता सुद्धा पडताळली गेली आहे, आणि त्याचं उत्तर होकारार्थी आहे.

चांद्रयानाला चंद्राच्या विषुववृत्तावर मिळालेली खनिजांची माहिती आणि अपोलो यानांनी आणलेल्या दगडांमधल्या खनिजांची माहिती यात साम्य आहे.
जगभरातील नामवंत नियतकालीकांमध्ये चांद्रयानाने केलेलं संशोधन झळकायला आता सुरुवात होईल.
Anonymous # 12. April 2009, 15:35
your blog is very interesting, but much more large your blog.