३७
Friday, 6. February 2009, 14:59:29
मागच्याच पोस्टमध्ये मी सांगितलंच होतं की आमच्या ऑफिसमध्ये नविन कॉफी मशिन लावलं आहे म्हणुन. त्यातल्या कॉफीची चव तेव्हाच घेऊन झाली होती. पण ’लेमन टी’ पिण्याचं धाडस काही मी करु शकलो नव्हतो. या गेल्या दोन दिवसांत ते पण केलं...
होय, मी तो लेमन टी अखेर प्यालोच!
खुप काही वाईट नाही लागला.. म्हणजे, तो चहाचा काही प्रकार आहे असं जर मनात नाही ठेवलं तर चांगली लागते त्याची चव. पण जर तो कोणता तरी प्रकार आहे चहाचा असं जर गृहीत धरुनच प्याला तर मात्र सपशेल पोपट होणार हे मात्र नक्की! कारण त्याची चव दुर-दुर पर्यंत चहाच्या जवळपास पोहोचत नाही.
तर.. अशा प्रकारे.. मी त्या मशिनमधुन येणारी तीनही पेय यशस्वीरित्या पचवली आहेत. आणि त्याबद्दल मी स्वतःलाच शाबासकी सुद्धा देऊन टाकली आहे.
आता आज जरा निवांत झालेलो आहे. म्हणुन म्हटलं चला, ब्लॉगवर जाऊन बघावं कोण-कोण काय-काय म्हणतंय ते..
आता या दोन दिवसांत ’एव्हरीथींग यु डिझायर’ चं वाचन पुढे सुरु करेन म्हणतोय, बघुया काय करतो मी ते... नाहीतर दोनही दिवस नुसतेच लोळत पार पाडेन.. काही भरवसाच नाहीये माझा.
चला, आता जेवण करायला पळतो, जाम भुक लागली आहे..
भेटुच लवकर!

Anonymous # 7. February 2009, 04:57
Hi,
Chan lihita tumhi, Keep it up.
Prabhas Gupte # 7. February 2009, 05:50