५१
Friday, February 20, 2009 3:05:56 AM
संध्याकाळी तर इतकी गर्दी झालेली असते की विचारुच नका!! "स्लो सायकलींग" असतं तसं "स्लो ड्रायव्हींग"ची प्रॅक्टीस चालु असते प्रत्येकाची. त्यातुन "रिकाम्या जागा (लगेच) भरा" हा अलिखित नियम आहे वाटतं. जरा जागा झाली की कोण कुठुन कसा घुसेल काहीच सांगत येत नाही बघा. या भयंकर अशा गर्दीतुन आपण टुकुटुकू चाललेलो असतो, आणि मधुनच कोणी काकु आपले दोन्ही पाय विमानाच्या लॅंडींग गेअर प्रमाणे बाहेर काढुन आपल्या पुढे अचानक अवरततात. आपली गाडी सांभाळायची, त्यांची गाडी सांभाळायची की त्यांचे पाय वाचवायचे हा गहन प्रश्न पडतो.
त्या संतोष हॉल चौकातला सिग्नल तर असुन नसल्यासारखाच आहे. सनसिटीकडे जाणारे सगळेच तिथं बाजुला थांबत थांबत निम्म्यानी रस्ता व्यापतात, आणि पुढे वडगांव, धायरी कडे जाणारे त्या उरलेल्या निम्म्यातुन आपलं वाहन पुढे रेटण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. त्या सिग्नलच्या लाल दिव्याला बहुतेक कोणी जुमानतच नाही! मी एकदा तिथं लाल दिवा लागला म्हणुन थांबलेलो, तर मागच्या गाडीनी हॉर्न वाजवुन वाजवुन हैराण करुन सोडला. शेवटी मीच हार मानली आणि त्याला पुढे जायला जागा करुन दिली.
चालु कामांमुळं तयार झालेले अडथळे, वाहनांची गर्दी, मधुनच पायी चालणारे, रस्ता क्रॉस करणारी वाहनं, यामुळं मला "मोटोक्रॉस + स्लो ड्रायव्हींग" असं काहीतरी करत आहोत असंच वाटतं.
हा पण एक आहे, या ट्रॅफिकनी माझा पेशन्स मात्र बऱ्यापैकी वाढवलाय हं.. थॅंक यु पुणे ट्रॅफिक!

हो ना, काहीही करा, कितीही हॉर्न वाजवा, तडतड करा, तुम्हाला निवांतपणे पुढे जायला मिळणारच नाहीये.. काय करायचं ते करा..
मग मी एकदम शांत डोक्यानी मोबाईलवर गाणी ऐकत बसलेलो असतो. रस्ता मिळाला की पुढे चलायचं, अडला की परत थांबायचं. बिलकुल घाई करायची नाही. त्यामुळं पेशन्स ठेवण्याची चांगलीच प्रॅक्टीस चालु आहे माझी सध्या.

म्हणतात ना, जे होतं ते भल्यासाठीच होतं..

Anonymous # Friday, February 20, 2009 1:47:12 PM
Prabhas Gupteprabhas # Friday, February 20, 2009 1:53:44 PM
Anonymous # Friday, February 20, 2009 7:40:27 PM